AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोर्टाचा सवाल अन् भोंदू खरातने थेट हातच जोडले; सुनावणीवेळी काय घडलं न्यायालयात? कोठडी सुनावली

आज 2 एप्रिल रोजी अशोक खरात प्रकरणी पुन्हा एकदा कोर्टात VC द्वारे सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान, खरातने थेट हात जोडले असल्याचे समोर आले आहे. आज कोर्टात नेमकं काय झालं? चला जाणून घेऊया...

कोर्टाचा सवाल अन् भोंदू खरातने थेट हातच जोडले; सुनावणीवेळी काय घडलं न्यायालयात? कोठडी सुनावली
अशोक खरातImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Apr 02, 2026 | 1:10 PM
Share

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपी अशोक खरात याला ८ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आजच्या सुनावणीसाठी अशोक खरात याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (VC) द्वारे उपस्थित करण्यात आले होते. त्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव SIT ने व्हीसीद्वारे हजर करण्याचा अर्ज केला होता, जो न्यायालयाने मान्य केला. न्यायालयात ही ऑनलाइन सुनावणी पार पडली. कोर्टरूममध्ये यासाठी ४ स्क्रीन्स लावण्यात आल्या होत्या.

आजच्या सुनावणीत काय घडले?

सुनावणी सुरू झाल्यावर न्यायाधीशांनी अशोक खरात यांना नाव विचारले. आवाज कमी येत असल्याने न्यायाधीशांनी त्यांना मोठ्याने बोलण्यास सांगितले. त्यानंतर न्यायाधीशांनी विचारले, “तुमचे वकील म्हणून भाटे वकील इथे बाजू मांडत आहेत, ते तुमचे वकील आहेत का?” यावर अशोक खरात यांनी “हो” असे उत्तर दिले. सुनावणीच्या शेवटी न्यायाधीशांनी आरोपीला विचारले, “तुम्हाला काही बोलायचे आहे का?” यावर अशोक खरातने हात जोडून “काही नाही” असे सांगितले.

कोर्टात काय घडलं?

-आरोपीने पीडितेवर अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली.

-त्याने दिलेल्या गोळ्यांमुळे गर्भपात झाला.

-लग्नाचं आमिष दाखवून आणि मराणाची भीती घालून महिलेवर अत्याचार

-पीडितेच्या मुलांनाही धमकी दिली

-गोळ्या आणि औषध कुठून आणले, त्यात काय होते याचा तपास अद्याप बाकी आहे.

-आरोपी पीडितेकडून आधारकार्ड आणि पॅनकार्ड मागत होता, हे कशासाठी होते याचा तपास करायचा आहे.

-तपासासाठी ७ दिवसांची पोलिस कोठडी आवश्यक असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

आरोपीचे वकील भाटे यांचे म्हणणे:

-हा आरोपीचा दुसरा गुन्हा आहे.

-यापूर्वी १४ दिवस पोलिस कोठडी झालेली आहे.

-अद्याप त्यांच्याकडे फिर्याद प्रत आलेली नाही.

-गर्भपात झाल्याचे सांगितले जात आहे, त्याचा कालावधी किती होता?

-सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच