AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन आमदारांना ठार मारण्याचा कट होता, एकाला इंजेक्शन देऊन, दुसऱ्याच्या अंगावर ट्रक… राऊत यांचा मोठा दावा

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सुरतला गेलेल्या तीन आमदारांना ठार मारण्याचा कट रचल्याचा खळबळजनक दावा केला आहे. एका आमदाराला इंजेक्शन देऊन, तर दुसऱ्याच्या अंगावर ट्रक घालून मारण्याचा प्रयत्न होता असे राऊत म्हणाले. यात नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांच्या नावांचा उल्लेख करत, ही महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी धक्कादायक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

तीन आमदारांना ठार मारण्याचा कट होता, एकाला इंजेक्शन देऊन, दुसऱ्याच्या अंगावर ट्रक... राऊत यांचा मोठा दावा
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 24, 2026 | 10:51 AM
Share

सुरतहून परतणाऱ्या एका आमदाराचं रामनाम सत्य होणार होतं, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. शिरसाट यांच्या या गौप्यस्फोटाने मोठी खळबळ उडालेली आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. एक दोन नव्हे तर सुरतला गेलेल्या तीन आमदारांना ठार मारण्याचा कट होता. एकाला इंजेक्शन देऊन मारण्यात येणार होतं. तर दुसऱ्याच्या अंगावर ट्रक घालण्यात येणार होता, असा खळबळजनक दावाच राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी केलेल्या या दाव्याने मोठी खळबळ उडाली आहे.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. तसेच या तिन्ही आमदारांची नावेही राऊत यांनी जाहीर केली आहेत. सुरतहून परत येणाऱ्या तीन आमदारांना ठार मारण्याचा कट होता. आता मंत्री असलेले प्रकाश आबिटकरही परत येणार होते. त्यांनी सुरुवातीला परत येण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांच्यावर दबाव आला आणि त्यांना अडकवून ठेवलं गेलं. नितीश देशमुख यांना हार्ट अटॅक येईल अशा प्रकारचे त्यांच्यावर उपचार करण्यात आले आणि इंजेक्शन देण्यात आले होते. ते कसे मारले जातील हा डाव होता. हा एक कट होता, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न

कैलास पाटीलही सुरतहून पळून जात होते. तेव्हा त्यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. अप्रत्यक्षपणे शिरसाट यांनी तेच सांगितलं. माझ्याकडे हे तीन उहादरण आहेत. अकोल्याचे नितीन देशमुख यांनी तिथून पळ काढला. ते बाहेर पडले संघर्ष करून. कैलास पाटील काही मैल चालत आले. त्यांच्या जीवाला अपाय करण्याची शक्यता होती. तरीही ते आले. हे तीन प्रकरण माहीत आहेत. बाकीच्यांना इतर आमदारांना जबरदस्तीने कोंडून ठेवलं, असा दावाही राऊत यांनी केला.

तो नेता कोण?

दरम्यान, शिंदे सेनेच्या कुलाब्यातील एका शाखाप्रमुखाने नोटांचा बॉक्स दाखवला होता. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. कुलाब्यातील महायुतीचा मोठा नेता कोण? शिंदे गटाच्या लोकांबाबत सहानभूतीने बोलण्याची गरज नाही. हे पैशाने विकलेले लोक आहेत. त्यांना पाच पन्नास लाख दिले असेल. पण पैसे देणारी कुलाब्यातील व्यक्ती कोण? ज्याचं महापालिका निवडणुकीशी संबंध होता. ज्याचं कुटुंब निवडणुकीत उतरलं होतं. ते लोक कोण आहेत? मला फक्त 50 लाखाच्या अधिकृत व्यवहारावरून तुरुंगात टाकलं होतं. कुलाब्यातील व्यक्तीला जर 50 लाख दिले असेल तर त्याची दखल घेऊन कारवाई केली पाहिजे. कोणी पैसे दिले आणि लाभार्थी कोण आहे हे शोधलं पाहिजे, असं ते म्हणाले.

Follow Us
50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा ने
Sanjay Raut : 50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा नेता कोण?
शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
Shinde Sena Meeting : शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; संतोष पवारांचा व्हिडिओ....
Sandip Deshpande : Shinde Sena : 50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; शाखाप्रमुख संतोष पवारांचा व्हिडिओ संदीप देशपांडेंकडून व्हायरल
आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्ट बोलले
Satej Patil : आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये..
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये धडक तपासणी
रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
Rohit Pawar : NCP : रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले CCTV....
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; नागपूरच्या रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले 20 हून अधिक CCTV कॅमेरे हटवले
व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा..
WhatsApp Web : व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा काय?
घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..; दरेकरांचा रोहित....
Pravin Darekar on Rohit Pawar : घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..;  दरेकरांचा रोहित पवारांना खोचक टोला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन