AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut Press | हा आयोग चोर आहे... संजय राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर खोचक टीका

Sanjay Raut Press | हा आयोग चोर आहे… संजय राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर खोचक टीका

| Updated on: Apr 02, 2026 | 11:47 AM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टातील पक्ष आणि निशाणी संदर्भातील सुनावणी पुढे ढकलल्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पन्यायालयीन प्रक्रियेवर तोंडसुख घेतल्यासारखे वागले जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुप्रीम कोर्टातील पक्ष आणि निशाणी संदर्भातील सुनावणी पुढे ढकलल्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पन्यायालयीन प्रक्रियेवर तोंडसुख घेतल्यासारखे वागले जात आहे. गेल्या चार वर्षांपासून तारखांवर तारखा दिल्या जात आहेत, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खटल्यांवर सुनावणी पूर्ण होत नाही. अंतिम सुनावणीसाठी वेळ मागितला जातो, पण अशा संवैधानिक पेचाच्या प्रसंगातही सर्वोच्च न्यायालय हे खटले गांभीर्याने घेत नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होतो. कोणाचा दबाव आहे? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. “शिवसेनेचा खटला शोवसेना पक्ष या संदर्भातला खटला चालवू नये, यासाठी आमच्यावर दबाव आहे. सरन्यायाधीशांनी हिमतीने हे स्पष्ट करावे,” असंही ते म्हणाले. तसेच, त्यांनी देशातील निवडणूक आयोगावर थेट टीका करत म्हटले की, “हा अयोग चोर आहे.” या वक्तव्यांमुळे निवडणूक आयोग आणि न्यायालयीन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेला सुरुवात झाली आहे.

Published on: Apr 02, 2026 11:47 AM
Follow Us