AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojana: करुणा मुंडे यांनी लाडकी बहीण योजनेची केली पोलखोल, भरसभेत म्हणाल्या, मी तुम्हाला हजार रुपये देते…

Ladki Bahin Yojana: करुणा मुंडे यांनी जळगावमध्ये शक्ती सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहिर सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी लाडकी बहिण योजनेवरुन सरकारवर निशाणा साधला. त्या नेमकं काय म्हणाल्या जाणून घ्या...

Ladki Bahin Yojana: करुणा मुंडे यांनी लाडकी बहीण योजनेची केली पोलखोल, भरसभेत म्हणाल्या, मी तुम्हाला हजार रुपये देते...
Ladki Bahin YojanaImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jan 12, 2026 | 1:58 PM
Share

राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकीसाठी अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे प्रचार देखील अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. जळगावमध्ये स्वराज्य शक्ती सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी करुणा मुंडे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत करुणा मुंडे यांनी भाषणात जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी लाडकी बहिण योजनेची देखील पोलखोल केली आहे. करुणा मुंडे भरसभेत काय म्हणाल्या वाचा…

लाडकी बहिण योजनेवरुन सरकारावर निशाणा

लाडकी बहिण योजनेविषयी बोलताना करुणा मुंडे यांनी सरकारावर निशाण साधला. ‘लाडक्या बहिणीसाठी पंधराशे रुपये आहेत मात्र लाडक्या बहिणीसाठी शौचालय नाही अशी परिस्थिती आहे. पंधराशे रुपये घेण्यासाठी रांगेत भरावा लागतं त्यामुळे रोजंदारी पुढचे हातात फक्त हजार रुपये मिळतात. देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या पत्नीला मी हजार रूपये देते, त्यांनी त्यात घर चालवून दाखवाव.. माझा त्यांना चॅलेंज आहे. चांगल्या व्यक्तींच्या हातात तिजोरीची चावी द्या कारण चोरांच्या हातात तर तुम्ही चाबी दिलीच आहे 70 हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्याच्या हातात तिजोरीची चाबी देऊन तुम्ही बसले आहे’, असे करुणा मुंडे म्हणाल्या.

पुढे करुणा मुंडे म्हणाल्या की, ‘जळगावच्या जनतेवर मला विश्वास आहे मला तुमची गरज आहे आणि तू मला माझी गरज आहे. माझे सासरे मंत्री होते ..माझे पती पण मंत्री होते आणि माझी ननंद पण मंत्री आहे तरीपण मला दारोदार भटकावं लागत आहे. मला पण तीन-तीन वेळा जेलमध्ये टाकलं सत्ताधाऱ्यांना एवढा माज आहे की त्यांच्या विरोधात बोललं की तुम्हाला पण ते जेलमध्ये टाकतील. मात्र तरी पण मी घाबरली नाही या सत्ताधाऱ्यांच्या छातीवर उभे भरून राजकारण करायचं मी ठरवलं आणि आता पूर्ण महाराष्ट्रात फिरते आहे. सत्ताधाऱ्यांनी अक्षरशः गुंडांना टिकीट दिल. ड्रग्स माफिया यांना टिकीट दिल. हरामाचे पैसे हरामात जातात. मतदानाचे आम्ही कधी पैसे घेतले नाही. मतदानाचे पैसे केले म्हणजे आम्ही आमच्या भूमातेचा आईचा सौदा करण्यासारखा आहे. अनेक उमेदवार यांनी बिनविरोध केले हे गु तर खातात पण गु हाच्या खालचे माती देखील खातात. अशा पद्धतीने यांनी लोकशाही संपून टाकली आहे.’

“शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत”

सत्ताधाऱ्यांकडे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत पीक विमा देण्यासाठी पैसे नाहीत मात्र आमदार खरेदी करण्यासाठी पैसे आहेत. नगरसेवकांना विकत घेऊन बिनविरोध करण्यासाठी त्यांना जिंकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडे पैसे आहेत असे देखील करुणा मुंडे म्हणाल्या.

कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?
कोस्टल रोडचं श्रेय ते राज ठाकरेंना नो स्पेस...फडणवीस काय-काय म्हणाले?.
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्...
फडणवीस यांचे मुंबई लुटीच्या आरोपांना प्रत्युत्तर, आरोप फेटाळले अन्....
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं
ठाकरेंनी शिंदेंना वाळीत टाकलं होतं अन्...फडणवीसांनी सगळंच सांगून टाकलं.
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य
लवकरच मोठा मित्र पक्षप्रवेश करणार, रवींद्र चव्हाण यांचं मोठं वक्तव्य.
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर...
राज ठाकरेंच्या लाकुडतोड्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं प्रत्युतर....
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ
भाजपच्या 15 पदाधिकाऱ्यांवर कारवाई, थेट पक्षातून काढलं! अमरावतीत खळबळ.
कोण तो रसमलाई...भXXXव्या तुझा काय...राज ठाकरेंकडून अण्णामलाईंवर निशाणा
कोण तो रसमलाई...भXXXव्या तुझा काय...राज ठाकरेंकडून अण्णामलाईंवर निशाणा.
'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरेंकडून थेट मुंबईकरांना इशारा
'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरेंकडून थेट मुंबईकरांना इशारा.
....तरच नवऱ्याला जेवण द्या, पंकजा मुंडे यांचे मतदारांना अनोखे आवाहन
....तरच नवऱ्याला जेवण द्या, पंकजा मुंडे यांचे मतदारांना अनोखे आवाहन.
भाजप आमदार भिकाऱ्यांसारखे दारोदारी... प्रतिभा धानोरकरांची घसरली जीभ
भाजप आमदार भिकाऱ्यांसारखे दारोदारी... प्रतिभा धानोरकरांची घसरली जीभ.