मोठी बातमी! महापालिका निवडणुकीपूर्वीच गेम फिरला; ठाकरे गटाला मोठा धक्का, भाजपच्या विजयाचा मार्ग सोपा
राज्यता महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून मोठी बातमी समोर आली आहे.

राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचं टेन्शन वाढलं आहे. ऐन मोक्याच्या वेळी काही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे विरोधी पक्षाचे उमेदवार हे बिनविरोध विजयी झाल्याचं पहायला मिळत आहे. दरम्यान जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे. जळगावमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारानं शेवटच्या दिवशी माघार घेतल्यामुळे भाजपच्या उमेदवाराचा बिनविरोध विजय झाला आहे. हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जता आहे. प्रभाग क्रमांक 7 अ मधून भाजपच्या उमेदवार दीपमाला काळे या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. प्रभाग सातमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री हिवराळे यांनी माघार घेतल्याने भाजपच्या दीपमाला काळे या बिनविरोध विजयी झाल्या.
दरम्यान दुसरीकडे जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपची चौथी जागा देखील बिनविरोध आली आहे. प्रभाग क्रमांक 16 अ मधून डॉ. वीरेन खडके हे बिनविरोध विजयी झाले आहेत. विरोधात असलेल्या चार अपक्ष तसेच एका मनसेच्या उमेदवाराने माघार घेतल्याने डॉ. वीरेन खडके यांचा बिनविरोध विजय झाला आहे. जळगाव महापालिकेत आतापर्यंत भाजपच्या उज्वला बेंडाळे, दीपमाला काळे, विशाल भोळे आणि वीरेन खडके अशा चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर शिवसेना शिंदे गटाच्या देखील चार जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. आतापर्यंत जळगावर माहापालिकेत महायुतीचे एकूण 8 नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत, त्यामुळे जळगाव महापालिकेत भाजप, शिवसेना शिंदे गटाच्या युतीचा मार्ग आता आणखी सोपा झाला आहे.
दरम्यान जळगावच नाही तर अनेक ठिकाणी हेच चित्र पहायला मिळत आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी काही पक्षातील उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे त्याचा विरोधी पक्षांना मोठा फायदा झाला आहे. अनेक जण हे बिनविरोध निवडून आले आहेत, यामध्ये महायुतीनं आघाडी घेतल्याचं पहायला मिळत आहे.
