AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026: सुपर 8 फेरीपर्यंत झिम्बाब्वेचा प्रवास कसा राहिला? कोणते विक्रम नोंदवले? जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत मोठा उलटफेर करण्यात झिम्बाब्वे आघाडीवर राहिली. बलाढ्या ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर काढलं आणि सुपर 8 फेरीत जागा मिळवली. या स्पर्धेत झिम्बाब्वेचा प्रवास कसा राहिला ते जाणून घ्या

| Updated on: Feb 17, 2026 | 6:53 PM
Share
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झिम्बाब्वे सुपर 8 फेरीत जागा मिळवेल असं कोणी सांगितलं असतं तर विश्वास ठेवला नसता. पण आता झिम्बाब्वेने सुपर 8 फेरीत जागा मिळवली आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाच्या आशेवर पाणी टाकत एन्ट्री मारली आहे. श्रीलंकेनंतर ब गटातून झिम्बाब्वे सुपर 8 फेरीसाठी पात्र ठरला आहे.  साखळी फेरीत शेवटचा सामना श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात होणार आहे. पण दोन्ही संघ पात्र ठरलेत. (Photo- Zimbabwe Cricket Twitter)

1 / 5
साखळी फेरीत आयर्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आणि झिम्बाब्वेला सुपर 8 फेरीचं तिकीट मिळालं. झिम्बाब्वेच्या खात्यात 5 गुण झाले असून ऑस्ट्रेलियाला मागे टाकत सुपर 8 फेरीत जागा पक्की केली आहे. झिम्बाब्वेने पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात सुपर 8 फेरीत जागा मिळवली आहे. (Photo- Zimbabwe Cricket Twitter)

2 / 5
गट ब मध्ये श्रीलंका, झिम्बाब्वे, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया आणि ओमान हे संघ होते. टी20 वर्ल्डकप स्पर्धेत  झिम्बाब्वेचा पहिलाच सामना ओमानशी झाला. हा सामना झिम्बाब्वेने सहज जिंकला. खरं तर वॉर्मअप सामन्यात ओमानचा संघ वरचढ होता. पण साखळी फेरीत तसं घडलं नाही. ओमानने विजयासाठी 103 धावांचं आव्हान दिलं होतं. झिम्बाब्वेने ओमानला 8 गडी आणि 39 चेंडू राखून पराभूत केलं. (Photo- Zimbabwe Cricket Twitter)

3 / 5
झिम्बाब्वेचा दुसरा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी झाला. या सामन्यात झिम्बाब्वेने 20 षटकात 2 गडी गमवून 169 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 19.3 षटकात सर्व गडी गमवून 146 धावा करू शकला. हा सामना झिम्बाब्वेने 23 धावांनी जिंकला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेने पराभूत केलं. त्यामुळे गणित जर तर वर आलं होतं. पण यातही झिम्बाब्वेने बाजी मारली. (Photo- Zimbabwe Cricket Twitter)

4 / 5
झिम्बाब्वेचा संघ आता सुपर 8 फेरीत पोहोचला आहे. या गटात भारत, वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका हे संघ आहेत. झिम्बाब्वेचा पहिला सामना 23 फेब्रुवारीला वेस्ट इंडिजशी , दुसरा सामना भारताशी 26 फेब्रुवारीला आणि तिसरा सामना दक्षिण अफ्रिकेशी 1 मार्चला होणार आहे.  (Photo- Zimbabwe Cricket Twitter)

5 / 5
Follow Us
8 तास ड्युटी, अन्...; पोलिसांच्या कामाच्या तासांवर राऊतांच फडणवीसांना
Sanjay Raut : 8 तास ड्युटी, अन् 16 तास...; पोलिसांच्या कामाच्या तासांवर संजय राऊतांचं थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत..
MVA : वर्धा पदवीधर मतदार संघात मविआला मोठा झटका; त्या नेत्याची बंडखोरी करत थेट मैदानात एंट्री
10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील....
Sangli : 10 बाटल्या भरल्या अन् खळबळ उडाली; विहिरीतून पेट्रोलसदृश ज्वलनशील पदार्थ, व्हिडिओ बघाच
ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई
Gyanesh Kumar Hearing Update : ज्ञानेश कुमारांना दिलासा की पुढे संकट?; सुप्रीम कोर्टाने अंतरिम कारवाई नाकारली, कारण...
लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
Chitra Wagh vs Rohit Pawar : लाज आम्हाला नाही, तर...; चित्रा वाघ यांचा रोहित पवारांवर थेट पलटवार
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच...
MPSC च्या आंदोलनासाठी बारामतीतून गाड्या आणल्या म्हणत थेट व्हिडीओच दाखवला; रोहित पवारांवर गंभीर आरोप
नवरात्रीचा खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 18 लाख...
इतर खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांसाठी मोठी मदत; 11 लाख देण्याचा निर्णय, भाजप नेत्याचा पुढाकार
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी...
बोरिवलीतील सावरकर उद्यानात गुजराती बॅनरवरून मनसेचे आंदोलन, मराठी-गुजराती मुद्द्यावरून वाद
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं...
भोरमध्ये भातशेती संकटात; पावसाअभावी जमिनीला भेगा, हातातोंडाशी आलेलं पीक करपलं
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील; नितेश राणेंचं विधान
रोहित पवार आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये मंत्री होतील अन्... नितेश राणेंचं मोठं विधान चर्चेत