AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayushman Card : आयुष्मान कार्ड आहे म्हणून बिनधास्त राहू नका! आयुष्मान योजनेत ‘या’ उपचारांचा मिळत नाही खर्च

आयुष्मान कार्ड आहे म्हणून प्रत्येक आजारावर मोफत उपचार मिळते तसा अनेकांचा समज असतो. पण काही उपचारांचा खर्च या योजनेतून मिळत नाही. त्यामुळे आयुष्यमान कार्ड धारकांना कोणत्या उपचारांसाठी योजनेचा लाभ मिळत नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

| Updated on: Nov 19, 2026 | 4:00 PM
Share
आयुष्मान कार्ड आहे म्हणून प्रत्येक आजारावर मोफत उपचार मिळते तसा अनेकांचा समज असतो, मात्र प्रत्यक्षात या योजनेत आजार किंवा वैद्यकीय उपचाराचा समावेश नाही. केंद्र सरकारच्या आयुष्यमान प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंत रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्याची कॅशलेस सुविधा दिली जाते. पण काही उपचारांचा खर्च या योजनेतून मिळत नाही. त्यामुळे आयुष्यमान कार्ड धारकांना कोणत्या उपचारांसाठी योजनेचा लाभ मिळत नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

1 / 7
आयुष्मान भारत योजनेचा मुख्य उद्देश गंभीर आजारांवरील रुग्णालयीन उपचारांचा आर्थिक भार कमी करणे हा आहे कर्करोग, हृदयविकार, किडनीशी संबंधित समस्या आणि इतर अनेक गंभीर आजारांवरील ठराविक उपचारांचा यात समावेश आहे.  मात्र त्यासाठी सरकारने निश्चित केलेल्या वैद्यकीय पॅकेज आणि नियमांचे पालन करावे लागते

2 / 7
सर्वात आधी म्हणजे सर्दी खोकला ताप यांसारख्या सामान्य तक्रारींसाठी डॉक्टरांकडे जाणे नियमित तपासणी किंवा रूग्णालयात दाखल न होता घेतले जाणारे ओपीडी उपचार या योजनेत सामान्यतः समाविष्ट नाही. त्यामुळे केवळ डॉक्टरांचा सल्ला आणि नियमित औषध किंवा तपासण्याचा खर्च आयुष्यमान कार्डवर मिळेलच असे नाही

3 / 7
याशिवाय सौंदर्य वाढवण्यासाठी किंवा चेहऱ्याची आणि शरीराची ठेवण बदलण्यासाठी केल्या जाणाऱ्या कॉस्मेटिक शस्त्रक्रियांचाही खर्च योजनेतून दिला जात नाही त्याचप्रमाणे वंधत्यावर उपचार करण्यासाठी केल्या जाणाऱ्या IVF सारख्या अनेक प्रजनन उपचारांचाही सामान्यतः समावेश नाही दातांच्या सौंदर्य विषयक उपचार दात बसवणे, रूट कॅनॉल, यांसारखे अनेक दंतोपचाराला योजनेचे संरक्षण मिळत नाही. मात्र अपघात किंवा गंभीर आजारामुळे आवश्यक ठरणाऱ्या काही उपचारांना नियमानुसार अपवाद असू शकतो

4 / 7
अमली पदार्थांच्या व्यसनातून मुक्त होण्यासाठी केल्या जाणाऱ्या पुनर्वसन उपचारांचाही सामान्य योजनेत समावेश नाही तसेच राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाबाहेर  काही लसीकरणांचा खर्चही मिळत नाही.

5 / 7
महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यमान कार्ड असूनही कोणत्याही रुग्णालयात कोणत्याही उपचार मोफत मिळत नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालय योजनेची संलग्न असणे आणि संबंधित उपचाराचे पॅकेज उपलब्ध असणे आवश्यक आहे त्यामुळे उपचार करण्यापूर्वी रुग्णालयाच्या उपचाराचा समावेश आहे का? त्याची खात्री करून घ्या किंवा काढला आहे म्हणून प्रत्येक वैद्यकीय खर्च सरकार उचलणार असे नाही हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

6 / 7
Ayushman Card :  आयुष्मान कार्ड आहे म्हणून बिनधास्त राहू नका! आयुष्मान योजनेत ‘या’ उपचारांचा मिळत नाही खर्च

7 / 7
Follow Us
बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी....
Shaina NC : बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी
पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; दमदाटीचा व्हिडिओ..
Congress : पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रा...
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा
न्यायालयाचा आदेश तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा
kolhapur Balumama Devasthan : न्यायालयाचा आदेश आणि SIT ची मनाई तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा चर्चेत
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा BJP..
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा भाजपमध्ये प्रवेश
मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमान
Sanjay Nirupam : मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमानावरून संजय निरुपम आक्रमक
दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना
Dadar : दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना वेग!
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकर
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकरांचा थेट कोर्टात खेचणार असा इशारा!
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! PM नरेंद्र मोदी यांनी सांगितले...
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कर सुधारणांचे फायदे
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा थेट पुरावे दाखवत दावा