AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena Symbol Hearing : शिवसेना कुणाची? सिब्बल यांनी वाढवलं शिंदे गटाचं टेन्शन, त्या दोन मुद्द्यांवरच सवाल

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षचिन्हावरील सुनावणीत कपिल सिब्बल यांनी शिंदे गटाला अडचणीत आणले. सिब्बल यांनी शिंदे यांच्या राजकीय पक्षाचे अस्तित्त्व आणि व्हिपच्या वैधतेवर जोरदार युक्तिवाद केला. गुवाहाटीतील निर्णय चुकीचे ठरवत, सिब्बल यांनी शिंदे गटाची स्थापना आणि कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ज्यामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.

Shivsena Symbol Hearing : शिवसेना कुणाची? सिब्बल यांनी वाढवलं शिंदे गटाचं टेन्शन, त्या दोन मुद्द्यांवरच सवाल
| Updated on: Nov 19, 2026 | 4:14 PM
Share

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी रिजॉइंडर घेऊन शिंदे गटाचं टेन्शन वाढवलं आहे. सिब्बल यांनी आजच्या युक्तिवादात शिंदे गटाचे मुद्दे खोडून काढले आहेत. तसेच या दोन मुद्द्यांवरून सिब्बल यांनी शिंदे गटाला घेरलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या राजकीय पक्षाचं अस्तित्त्व आणि व्हिप या दोन मुद्द्यांवरून सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. त्यामुळे कोर्ट त्यावर काय भाष्य करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिंदे गटाचे वकील ध्रुव मेहता यांचा काल युक्तिवाद संपला. त्यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी रिजॉइंडर मागितला. त्यानुसार आज त्यांचा युक्तिवाद सुरू झाला. यावेळी त्यांनी अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला. युक्तिवादाच्या सुरुवातीलाच सिब्बल यांनी अध्यक्षांचे अधिकार काय आहेत? असा सवाल केला. विधानसभा अध्यक्षांच कार्यक्षेत्र काय आहे? त्यांचा संविधांनाशी काही संबंध नाही. राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळे आहेत, असं कपिल सिब्बल यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं.

वादग्रस्त सत्य ठेवलं नाही

आम्हाला कोर्टात याव लागलं. कारण हे प्रकरण विधानसभा होईपर्यंत ऐकलं गेलं नव्हतं, असं सांगतानाच सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराचा कायदेशीर आढावाच घेतला. विधीमंडळातीळ बहुमत म्हणजे चिन्ह हे सांगितलं गेलं. हे अकॅडमिक नाही. पक्ष कोण आहे हे निवडणूक आयोगाने ठरवलं, असं सांगतानाच मी तुमच्यासमोर कोणतेही वादग्रस्त सत्य ठेवल नाही, असंही सिब्बल यांनी कोर्टाला स्पष्ट केलं.

गुवाहाटीत बसून ठरवू शकत नाही

यावेळी त्यांनी व्हिपच्या मुद्द्यावरून शिंदे गटाला घेरलं. व्हिप कोण असेल हे एकनाथ शिंदे गुवाहाटीत बसून ठरवू शकत नाही. शिंदे गुवाहाटीत बसून विधीमंडळ नेताही ठरवू शकत नाहीत. या सगळ्या प्रकरणात आधी वाद तयार करणं, त्यानंतर निवडणूक आयोगात येणं आणि चिन्ह घेणं असा क्रम झाला आहे. या सगळ्याबाबत गुवाहाटीत बसून इशारा दिला गेला आणि मग व्हिप नेमला गेला, असा युक्तिवाद त्यांनी केला.

नियुक्ती चुकीची

भरत गोगावले यांची व्हिप म्हणून केलेली नियुक्ती चुकीची आहे, कारण ती नियुक्ती राजकीय पक्षाने केलेली नव्हती. भारत गोगावले यांना व्हिप नियुक्त करणे आणि सुनील प्रभू यांना व्हिप म्हणून काढणे हे कोणत्या कायद्यानुसार आहे? हे ठरवण्याचा कोणालाही अधिकार नाही, असा युक्तिवादही त्यानी केला.

म्हणजे पक्ष आम्हीच

त्यानंतर सिब्बल यांनी शिंदे यांच्या राजकीय पक्षाच्या अस्तित्त्वावरही युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने पक्ष कोण आहे? याचा निर्णय दिला आहे. त्याची तारीख महत्त्वाची आहे. त्या तारखेपासूनच शिंदे हे राजकीय पक्ष आहेत. ती तारीख म्हणजे फेब्रुवारी 2023 ही आहे. म्हणजे त्यापूर्वी आम्हीच पक्ष होतो, असा मुद्दाही त्यांनी मांडला.

Follow Us
बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी....
Shaina NC : बाळासाहेब माझे दैवत, मी त्यांचा अपमान करूच शकत नाही; शायना एनसी यांनी मागितली महाराष्ट्राची माफी
पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; दमदाटीचा व्हिडिओ..
Congress : पत्रकाराच्या अंगावर धावले काँग्रेस नेते ऋषिकेश लाड; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी दमदाटीचा व्हिडिओ व्हायरल
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रा...
बुलेटवर स्वार होत एकनाथ शिंदेंची पंढरपुरात पाहणी; कार्तिकी यात्रेच्या तयारीचा घेतला आढावा
न्यायालयाचा आदेश तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा
kolhapur Balumama Devasthan : न्यायालयाचा आदेश आणि SIT ची मनाई तरीही 324 बकऱ्यांची विक्री? बाळूमामा देवस्थान पुन्हा चर्चेत
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा BJP..
शिंदे सेनेला पालघरमध्ये मोठा धक्का! माजी आमदार श्रीनिवास वनगांचा भाजपमध्ये प्रवेश
मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमान
Sanjay Nirupam : मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमानावरून संजय निरुपम आक्रमक
दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना
Dadar : दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना वेग!
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकर
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकरांचा थेट कोर्टात खेचणार असा इशारा!
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! PM नरेंद्र मोदी यांनी सांगितले...
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कर सुधारणांचे फायदे
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा थेट पुरावे दाखवत दावा