AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Google Maps आपल्याला रस्ता कसा दाखवतो? जाणून घ्या 6 मुद्द्यांमध्ये

आजच्या डिजिटल युगात अनोळखी शहरात जायचे असो किंवा ऑफिसला जाण्यासाठी कमी वेळेचा मार्ग शोधायचा असो, आपण oogle Maps चा वापर करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, Google Maps आपल्याला रस्ता कसा दाखवतो?

| Updated on: Nov 19, 2026 | 1:33 PM
Share
GPS सॅटेलाइटद्वारे मिळते लोकेशनची माहिती: Google Maps मध्ये लोकेशन शोधण्यासाठी GPS (Global Positioning System) तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. पृथ्वीपासून सुमारे 20 हजार किलोमीटर उंचीवर अनेक GPS सॅटेलाइट फिरत असतात. हे सॅटेलाइट सतत रेडिओ सिग्नल पृथ्वीवर पाठवत असतात. आपण मोबाईलमधील लोकेशन ऑन केल्यावर फोन या सिग्नलच्या मदतीने आपले स्थान शोधतो.

1 / 6
ट्रायलेटरेशन तंत्रज्ञानाने समजते अचूक ठिकाण: तुमचे अचूक लोकेशन शोधण्यासाठी GPS रिसीव्हर साधारणपणे चार किंवा त्यापेक्षा जास्त सॅटेलाइटचे सिग्नल वापरतो. सिग्नल फोनपर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या वेळेवरून सॅटेलाइटपासूनचे अंतर मोजले जाते. या प्रक्रियेला ट्रायलेटरेशन  म्हणतात. याच तंत्रज्ञानामुळे काही सेकंदांत तुमच्या मोबाईलवर लोकेशनची अचूक पिन दिसू लागते.

2 / 6
लाईव्ह ट्रॅफिकची माहिती कशी मिळते?: रस्त्यावर कुठे ट्रॅफिक जाम आहे, हे सॅटेलाइट थेट पाहत नाहीत. त्यासाठी Google Maps क्राउडसोर्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करते. अनेक लोक Google Maps वापरत असताना त्यांच्या मोबाईलमधून मिळणारी लोकेशन आणि वेगाची माहिती एकत्रित केली जाते. एखाद्या रस्त्यावर वाहनांचा वेग कमी झाल्याचे दिसल्यास त्या भागात वाहतूक कोंडी असल्याचा अंदाज लावला जातो. त्यामुळे नकाशावर रस्ते हिरव्या, नारंगी किंवा लाल रंगात दिसतात.

3 / 6
स्ट्रीट व्ह्यू आणि युजर अपडेट्सची मदत: Google Maps अधिक अचूक ठेवण्यासाठी स्ट्रीट व्ह्यू कारचा वापर केला जातो. या गाड्यांवर विशेष कॅमेरे बसवलेले असतात, जे रस्ते, इमारती आणि परिसराचे फोटो घेतात. याशिवाय स्थानिक प्रशासनाकडून मिळणारी माहिती आणि वापरकर्त्यांनी दिलेले अपडेट्स यांचाही उपयोग केला जातो. त्यामुळे नवीन रस्ते, बंद मार्ग आणि बदललेले पत्ते नकाशावर अपडेट करता येतात.

4 / 6
सॅटेलाइट इमेजरीमुळे दिसतात घरे आणि रस्ते: Google Maps वरील Satellite View मध्ये दिसणारी घरे, इमारती, झाडे आणि रस्त्यांची छायाचित्रे वेगवेगळ्या कमर्शियल अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाइट्स आणि विमानांद्वारे घेतलेल्या हवाई छायाचित्रांमधून मिळतात. या प्रतिमांच्या मदतीने पृथ्वीवरील विविध भागांचे डिजिटल चित्र तयार केले जाते. मात्र ही छायाचित्रे नेहमीच लाईव्ह नसतात; ती वेळोवेळी अपडेट केली जातात.

5 / 6
 AI आणि मशीन लर्निंगमुळे तयार होतो स्मार्ट मॅप:  Google Maps अधिक स्मार्ट बनवण्यासाठी AI आणि Machine Learning तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. या तंत्रज्ञानाच्या मदतीने सॅटेलाइट आणि हवाई छायाचित्रांमधून रस्ते, इमारती, पूल, नद्या आणि इतर ठिकाणे ओळखली जातात. वेगवेगळ्या प्रतिमा एकत्र करून डिजिटल नकाशा तयार केला जातो. नवीन रस्ते, फ्लायओव्हर आणि इमारतींची माहिती मिळाल्यानंतर नकाशात आवश्यक बदल केले जातात.

6 / 6
Follow Us
मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमान
Sanjay Nirupam : मालाडमध्ये शिंदेसेनेचं सोनिया गांधींविरोधात आंदोलन; सावरकरांच्या अपमानावरून संजय निरुपम आक्रमक
दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना
Dadar : दादर रेल्वे स्थानकाला मिळणार नवी ओळख? चैत्यभूमी नामकरणाच्या हालचालींना वेग!
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकर
सोनिया गांधींच्या पुस्तकात सावरकरांवर आक्षेपार्ह मजकूर; सात्यकी सावरकरांचा थेट कोर्टात खेचणार असा इशारा!
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! PM नरेंद्र मोदी यांनी सांगितले...
करदात्यांसाठी मोदी सरकारचे मोठे बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले कर सुधारणांचे फायदे
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांवरच SRA प्रकल्पांतून फायदा घेतल्याचा आरोप, नवनाथ बन यांचा थेट पुरावे दाखवत दावा
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी नको, कारवाई करा! शायना एनसी यांच्या विरोधात ठाकरे गट आक्रमक
पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारलं थेट...
Sanjay Raut : पुस्तक फाडायचं होतं तर फोटो का आणले होते; संजय राऊतांनी विचारला नेमका प्रश्न...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय...
बाळासाहेबांच्या फोटो प्रकरणी माफी मागत शायना एन.सी. यांचा राजकीय विरोधकांना थेट इशारा
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाहांना पत्र
अजितदादांच्या अपघातामागचं सत्य... रोहित पवार यांचे अमित शाह आणि राहुल गांधींना पत्र!
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची...
सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता