AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राफेल जेट फायटर खरेदीत भारताला तोटा आणि इंडोनेशियाला फायदा ? काय आहे नेमके गणित

भारत फ्रान्सकडून एकूण ११४ राफेल जेट खरेदी करणार आहे.ज्यातील ९६ विमानांची निर्मिती नागपूरातच फ्रान्स कंपनी डसॉल्ट करणार आहे. जर १८ जेटची निर्मिती फ्रान्समध्ये होणार आहे.

राफेल जेट फायटर खरेदीत भारताला तोटा आणि इंडोनेशियाला फायदा ? काय आहे नेमके गणित
Rafale jet fighter purchase
| Updated on: Feb 17, 2026 | 7:08 PM
Share

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रो मंगळवारी (१७ फरवरी, २०२६) तीन दिवसांच्या दौऱ्यावर भारत भेटीवर आले आहेत. १६ फेब्रुवारी रोजी सुरु होणाऱ्या एआय इम्पॅक्ट समिटमध्ये ते भाग घेणार आहेत. या भेटीत अनेक मेगा डीलवर मोहर लागणार आहे. ज्या अंतर्गत ११४ राफेल खरेदी करण्याची भारताची योजना आहे. हे राफेल टप्प्या टप्प्याने साल २०३० पर्यंत भारतील सैन्यात सामील होणार आहेत.

भारत या ११४ राफेल खरेदीसाठी ३.२५ लाख कोटी रुपये मोजणार आहे. किंमतीकडे पाहता भारताची ही आतापर्यंतचा सर्वात मोठा सैन्य करार मानला जात आहे.अलिकडेच इंडोनेशियाने देखील फ्रान्सकडून ४२ राफेल जेट खरेदी केले आहेत. साल २०२२ मध्ये तत्कालिन प्रोबावो सुबियांतो यांच्या सरकारने फ्रान्स एअरोस्पेस कंपनी डसॉल्ट एव्हीएशन सोबत करार केला होता.

इंडोनेशियाने ८.१ अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ६८ हजार कोटी रुपयांत ४२ राफेल खरेदी केले होते. या हिशेबाने एका राफेलची किंमत १,७४७ कोटी रुपयांना पडली आहे. भारत करारावर ३.२५ लाख कोटी रुपये खर्च करु शकतो. आणि त्या हिशेबाने भारताला एक राफेल विमान २,८५० कोटी रुपयांना पडणार आहे.त्यामुळे लोकांना फ्रान्स भारताला का महागड्या दरात राफेलची विक्री करत आहे असा प्रश्न निर्माण होणे सहाजिकच आहेत.

काय आहे सत्य ?

भारत एका राफेल विमानासाठी २,८५० रुपये यासाठी देत आहे, कारण तो एअरक्राफ्टसोबत मेटियोर आणि स्कॅल्प सारखी मिसाईल, हॅमर सारखे प्रिसीजन गाईडेड बॉम्ब, ट्रेनिंगसाठी फूल मिशन सिम्युलेटर, दीर्घकाळासाठी मेटेनन्स आणि राफेलचे स्पेअर पार्ट्स आणि टेक्नॉलॉजी ट्रान्सफरला देखील खरेदी करीत आहे.ही राफेल विमानांची संपूर्ण लाईफ सायकल कॉस्ट आहे आणि त्यामुळे या हिशेबाने ही विमाने रास्त दरात खरेदी केल्याचे समजले जाते.

भारतात बनणार राफेल

साल २०१६ मध्ये भारताने ३६ राफेल जेट फायटर खरेदी केले होते आणि गेल्या वर्षी राफेलची नौदल आवृत्ती खरेदी केली होती. या हिशेबाने वायूसेनेजवळ ३६ आणि नौदलाकडे विमानवाहू नौका आयएनएस विक्रांतसाठी २६ राफेल खरेदी केले आहेत.

ही डील यासाठी देखील खास आहे की यावेळी ९६ राफेलची निर्मिती भारताच्या नागपूरात डसॉल्ट रियालन्स एअरोस्पेस लिमिटेड (DRAL)मध्ये केला जाऊ शकतो. तर १८ राफेलची निर्मिती फ्रान्समध्ये होणार आहे. सध्या भारतीय सैन्याकडे असलेल्या राफेलची निर्मिती फ्रान्समध्ये झालेली आहे. साल २०३०पासून २०३५ पर्यंत भारताजवळ राफेल विमानांची संख्या १७६ इतकी होणार आहे. भारत वायूसेनेला फायटर जेटची सर्वाधिक गरज आहे. आता भारताकडे २९ स्क्वॉड्रन आहेत. मात्र ४२ स्क्वॉड्रनची प्रत्यक्षात गरज आहे. एका स्क्वॉड्रनमध्ये १६ ते १८ फायटर जेट असतात.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?