AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिनधास्त करा लग्न… 8 ग्रॅम सोनं आणि रेशमी साडी घेऊन जा… नागरिकांची चांदी; शेजारच्या राज्यात मोठी घोषणा

तामिळनाडू सरकारने 'अन्नान सीर' योजना लागू केली आहे. या अंतर्गत ₹2.5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील वधूंना लग्नात 8 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे नाणे आणि एक रेशमी साडी दिली जाईल. गरिबांसाठी ही दिवाळीपूर्वीच दिवाळी आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. या योजनेचा पहिला हप्ता मंजूर झाला असून, लाखो वधूंना याचा लाभ मिळेल.

बिनधास्त करा लग्न... 8 ग्रॅम सोनं आणि रेशमी साडी घेऊन जा... नागरिकांची चांदी; शेजारच्या राज्यात मोठी घोषणा
marriageImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 05, 2026 | 11:21 PM
Share

दाक्षिणात्य राज्यांमध्ये गोरगरिबांसााठी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तामिळनाडू सरकारने अन्नान सीर योजना लागू केली आहे. या योजनेचा 812 कोटीचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत ज्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये आहे, अशा कुटुंबातील महिलांना सरकारकडून लग्नात 8 ग्रॅम सोन्याचं नाणं आणि रेश्मी साडी देण्यात येणार आहे. सरकारच्या या मोठ्या निर्णयाने गरीबांची दिवाळीपूर्वीच दिवाळी झाली आहे.

अन्नान सीर ही तमिळ परंपरेशी जोडलेली योजना आहे. तमिळ परंपरेत लग्नाच्या दरम्यान मोठ्या भावाकडून दिल्या जाणाऱ्या सीरला प्रेम, स्नेह, संरक्षण आणि जबाबदारीचं प्रतिक मानलं जातं. तामिळनाडूत दरवर्षी 5 लाख लग्न होतात. याच भावनेतून लग्नानंतर नवीन आयुष्य सुरू करणाऱ्या मुलींना 8 ग्रॅम सोन्याचं नाणं आणि एक रेश्मी साडी देण्याचा निर्णय घेतल्याचं सरकारचं म्हणणं आहे.

त्याच लोकांना लाभ

या बाबत 2026-2027च्या दुरुस्ती बजेटमध्ये तरतूद करण्यात आली होती. त्याशिवाय समाज कल्याण संचालकाने सरकारकडे दरवर्षी अन्ना सीर योजना लागू करण्याची आणि त्यासाठी बजेट ठेवण्याची विनंती केली होती. यावर विचार केल्यानंतर सरकारने ही योजना लागू केली आहे. त्यामुळेच ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये आहे, अशा कुटुंबाला ही योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शुद्ध सोनं आणि साडी

सोन्याचं नाणं 22 कॅरेटचं असणार आहे. तसेच सोन्याचं नाणं आणि रेशमी साडीची खरेदी निविदा प्रक्रियेतून होणार आहे. तामिळनाडू पारदर्शी कायदा, 1998 आणि नियम 2000च्या अंतर्गत खरेदीची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. योग्य बोली लावणाऱ्यांकडूनच सोन्याचं नाणं आणि रेशमी साडी खरेदी केली जाणारा आहे. ही योजना सरकारी आदेश जारी झाल्याच्या तारखेपासून लागू होणार आहे. आदेश लागू झाल्याच्या तारखेनंतर लग्न झालेल्या जोडप्यांनाच त्याचा फायदा होणार आहे. त्या आधी लग्न झालेल्यांना त्याचा लाभ मिळणार नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे. सरकारच्या या घोषणेचं स्थानिक नागरिकांनी स्वागत केलं आहे. या योजनेमुळे गरिबांना मोठा आधार मिळणार असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?