AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kiran Mane : अजितदादांच्या प्रकरणातच एवढी गुप्तता का? कोण महत्त्वाचा माणूस…किरण मानेंचा संताप, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Kiran Mane Post : किरण माने यांनी सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

Kiran Mane : अजितदादांच्या प्रकरणातच एवढी गुप्तता का? कोण महत्त्वाचा माणूस...किरण मानेंचा संताप, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
| Updated on: Nov 20, 2026 | 9:26 PM
Share

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या अपघाताच्या परिस्थितीबाबत आणि शेवटच्या दिवसातील घडामोडींबाबत पारदर्शक माहिती मिळावी, अशी मागणी ॲड. नितीन यादव यांनी केली आहे. यावर आता अभिनेते किरण माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अजित पवार यांच्या शेवटच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करण्याच्या मागणीवरून सरकारला धारेवर धरलं आहे. माहिती अधिकारांतर्गत हे फुटेज मागवण्यात आलं असताना ते देण्यास नकार देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावरून त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

किरण माने यांची पोस्ट

किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, ‘माझा जिवलग मित्र आणि अजितदादांचा अतिशय निष्ठावान कार्यकर्ता ॲड. नितीन यादव याने माहिती अधिकारात अजितदादांच्या शेवटच्या दिवसाचे, देवगिरी बंगला ते मुंबई विमानतळ आणि विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज मागितले. व्यवस्थेने ते देण्यासाठी नकार दिला. त्यासाठी दिलेल्या कारणांवरून काही प्रश्न उपस्थित होतात.’ यानंतर त्यांनी थेट जनतेशी संवाद साधत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. उपमुख्यमंत्र्यांचा मृत्यू हा सार्वजनिक हिताचा विषय नसेल, तर सार्वजनिक हिताचा विषय नेमका कोणता, असा सवाल त्यांनी केला.

किरण माने यांनी पुढे लिहिलं, ‘सरकारी बंगला, सरकारी गाडी, सरकारी सुरक्षा आणि सरकारी दौरा. यात ‘खाजगी’ नेमकं काय आहे? ज्यांच्या खाजगीपणाचे कारण तुम्ही देता, ते आज हयात नाहीत. मग तुम्ही नेमका कोणाचा खाजगीपणा जपत आहात?’ सीसीटीव्ही फुटेज अस्तित्वात असल्याचं मान्य केलं जातं आणि ते पोलिसांना देण्यात आल्याचंही सांगितलं जातं, तर मग सर्वसामान्य जनतेला ते दाखवण्यास अडचण काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सत्य स्वच्छ असेल, तर ते लपवण्याची गरज का पडते, असा सवालही किरण माने यांनी केला आहे.

आपल्या पोस्टमध्ये किरण माने यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खरात प्रकरणाचाही उल्लेख केला. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते, तर खरात प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजही सार्वजनिक झाल्याचा दाखला त्यांनी दिला. मग अजित पवार यांच्या प्रकरणातच एवढी गुप्तता का ठेवली जात आहे, असा सवाल त्यांनी केला. यामागे कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी लिहिलं, ‘असा कोण महत्त्वाचा माणूस अडकला आहे यामागे?‘

किरण माने यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी लोकशाहीचा संदर्भ देत सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, ‘आम्ही आरोप करत नाही. आम्ही फक्त प्रश्न विचारतो. आणि प्रश्नांना उत्तरं देणं ही लोकशाहीत सरकारची जबाबदारी आहे. तसंच, नुकत्याच झालेल्या ‘लोकतंत्र बचाव’ आंदोलनाचाही उल्लेख करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला. ‘वही लोकतंत्र हम बचा रहे है!’ असं म्हणत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर निशाणा साधला. ‘क़ातिल ने किस सफ़ाई से धोई है आस्तीं… उसको ख़बर नहीं, कि लहू बोलता भी है!’ असं किरण माने यांनी शेवटी लिहिलं आहे.

Follow Us
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर