AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा…; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

| Updated on: Oct 05, 2026 | 8:41 PM
Share

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. पेपरफुटी, नोकरीच्या संधींचा अभाव आणि मराठी तरुणांवरील अन्याय यावर त्यांनी आवाज उचलला. जाती-धर्माच्या राजकारणात अडकून न पडता, नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले, तसेच खाजगीकरण आणि शासकीय धोरणांवरही टीका केली.

पुण्यात सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला. पेपरफुटी आणि प्रशासकीय गलथान कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनात राज ठाकरे सामील झाले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या आणि त्यांच्या संघर्षाचे कौतुक केले.

आंदोलक विद्यार्थ्यांनी MPSC परीक्षेतील ५०० गुणांचे मराठी साहित्य वैकल्पिक विषय काढणे, तसेच ड्रग इन्स्पेक्टर, ग्रुप बी, ग्रुप सी आणि राज्यसेवेच्या परीक्षांचे पेपर फुटल्याने झालेल्या अन्यायाबाबत राज ठाकरेंना माहिती दिली. “आमदार फुटले, खासदार फुटले, पक्ष फुटला, पण जेव्हा आमचा पेपर फुटला तेव्हा आभाळ फाटल्यासारखं वाटलं,” अशा तीव्र शब्दांत विद्यार्थ्यांनी आपली भावना व्यक्त केली.

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मराठी तरुणांना जाती-धर्माच्या राजकारणात अडकू नका असे आवाहन केले. पालकांनी कर्ज काढून मुलांना शिकवले असताना, पेपरफुटीमुळे त्यांचे भविष्य अंधारात असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रातील नोकऱ्या मराठी तरुणांनाच मिळाव्यात, अशी आपली गेली २५ वर्षांची मागणी असल्याचे त्यांनी पुनरुच्चारले. सरकारी नोकऱ्या कमी होत असून खाजगीकरण वाढत असल्याबद्दल आणि खाजगी क्षेत्रात आरक्षणाची सोय नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

Published on: Oct 05, 2026 08:41 PM

Follow Us