AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Car Accident : वेळ आलेली, रात्री 2 च्या सुमारास अत्यंत भीषण अपघात, इनोव्हा कार दोन ते तीनवेळा पलटली

Car Accident : काही तरुण इनोव्हा कारने एका कार्यक्रमासाठी गेले होते. तिथून परत येत असताना काळाने काही जणांवर घाला घातला. वेळ खराब असेल आणि काळ आला असेल तर वाचणं खूप कठीण असतं.

Car Accident : वेळ आलेली, रात्री 2 च्या सुमारास अत्यंत भीषण अपघात, इनोव्हा कार दोन ते तीनवेळा पलटली
Innova car Accident
| Updated on: Feb 06, 2026 | 11:00 AM
Share

रात्रीच्यावेळी प्रवासाला निघाल्यानंतर काळजी घेणं खूप आवश्यक असतं. खासकरुन ड्रायव्हरची झोप पूर्ण झालीय ना? त्याला डुलकी येत नाहीय ना? त्याला कुठला त्रास होत नाहीय ना? हे तपासून घ्यावं लागतं. कारण गाडीच्या ड्रायव्हरवर इतरांचं आयुष्य अवलंबून असतं. अशाच एक भीषण अपघातात काहींनी आपला जीव गमावला. जळगावच्या पाचोर्‍याजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला. जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात राहणारे तरुण इनोव्हा कारने पाचोरा तालुक्यातील आसनखेडा येथे कार्यक्रमासाठी गेले होते. परत येत असताना पाचोरा–जळगाव रस्त्यावरील एका हॉटेलजवळ अचानक कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला.

दोन ते तीन वेळा पलटी

कार रस्त्याच्या कडेला जोरात धडकून दोन ते तीन वेळा पलटी झाली. या अपघातात श्रीरंग सुरेश पाटील आणि प्रसन्न रवींद्र निमजे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. इतर पाच जण जखमी झाले आहेत. काहींवर पाचोरा येथे उपचार सुरू आहेत.

पाचोरा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद

गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगावला हलवण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की इनोव्हा कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून महावितरणचा पोलही कोसळला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?