AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्नॅपचॅटवर धमकी! नंतर थेट अंगावर घातली कार, मुंबईतील हायप्रोफाइल एरियात धक्कादायक घटना, CCTV समोर

नुकताच मुंबईतील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात मॉडेलच्या अंगावर थेट एक व्यक्तीने कार घातली आहे. तिला वाचवण्यासाठी धावलेल्या आणखी दोन व्यक्तींवर देखील आरोपीने कार अंगावर घालण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा CCTV फुटेज समोर आला आहे.

स्नॅपचॅटवर धमकी! नंतर थेट अंगावर घातली कार, मुंबईतील हायप्रोफाइल एरियात धक्कादायक घटना, CCTV समोर
| Updated on: Feb 04, 2026 | 12:14 PM
Share

मुंबईच्या लोखंडवाला परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २९ वर्षीय व्यक्तीने मॉडेल तरुणीच्या अंगावर थेट कार घालण्याचा प्रयत्न केला होता. पण तेवढ्यात काहीजण त्या मॉडेलच्या मदतीला धावून आले. आरोपीने त्यांच्या अंगावर देखील गाडी घालण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून चौकशी सुरु आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जोगेश्वरी पश्चिमेकडील लोखंडवाला येथील अरीना बिल्डिंगच्या गेटजवळ ही घटना घडली. पीडित मॉडेल (नाव: डायना सईद डेबस्तानी) इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ उभी असताना आरोपी मोहम्मद शकील शेख याने स्कोडा कार अचानक तिच्या दिशेने वेगाने नेली. कारचा जोरदार धक्का बसल्याने मॉडेल कारच्या बोनेटवर आदळली आणि काही अंतर फरफटत गेली. या हल्ल्यात तिला किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेदरम्यान तिच्या मदतीला धावलेल्या दोन व्यक्तींच्या अंगावरही आरोपीने कार घालण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना धोका टळला.

मॉडेलला मिळाली होती धमकी?

पोलिस तक्रारीनुसार, आरोपी गेल्या नऊ महिन्यांपासून मॉडेलबद्दल तिच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांमध्ये अफवा पसरवत होता. यामुळे दोघांमध्ये दीर्घकाळ वाद सुरू होता. ३ फेब्रुवारी रोजी पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण आरोपीला सामोरे जाण्यासाठी गेल्या होत्या. आरोपी समोर न आल्याने त्याला मोठ्याने हाक मारत होत्या. दुसऱ्या दिवशी आरोपीने मैत्रिणीच्या स्नॅपचॅट अकाउंटवरून ‘ॲसिड अटॅक’ची धमकी दिली. या धमकीमुळे रागावलेल्या आरोपीने दुसऱ्या दिवशी हे हिंसक कृत्य केले, असा आरोप आहे.

पोलिस कारवाई

पीडित मॉडेलने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी मोहम्मद शकील शेख (वय २९) याच्याविरोधात भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, सखोल तपास सुरू केला आहे. आरोपी अद्याप फरार असल्याचे सांगितले जात आहे. ही घटना मुंबईतील लोखंडवाला सारख्या हायप्रोफाईल परिसरात घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी सर्व पैलूंवरून तपास करून लवकरात लवकर आरोपीला अटक करण्याचे आश्वासन दिले आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी