Eknath Khadse: भाजपात सुधीरभाऊंचा नाथाभाऊ होतोय का? एकनाथ खडसे यांचे एकदम चपखल उत्तर
Eknath Khadse on Sudhir Mungantiwar: गेल्या एक वर्षापासून भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या तिखट प्रतिक्रियेने अधुनमधून राजकीय वादळं येतात. पण या हिवाळी अधिवेशनात त्यांच्या जहाल वक्तव्याने भाजप कोंडीत सापडले. सुधीरभाऊंना कोंडीत पकडल्याचा आरोप होत असताना त्यावर एकनाथ खडसे यांनी चपखल उत्तर दिले आहे.

किशोर पाटील/प्रतिनिधी/जळगाव: गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकहाती झंझावात आणला. महायुतीचे सरकार आले. पण सरकारमधील काही जुन्या जाणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. विदर्भातील अनुभवी नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रकरणी त्यांची नाराजी अनेकदा वेगळ्या पद्धतीने बोलून दाखवली. अनेक विषयांवर त्यांच्या प्रतिक्रिया या भाजपसाठी डोकेदुखी वाढवणाऱ्या ठरल्या. तर हिवाळी अधिवेशनात त्यांच्या जहला वक्तव्याने भाजप कोंडीत सापडली. मंत्र्यांच्या अंगावर बिबट्या सोडा असे जहाल वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे त्यांची नाराजी समोर आली. तर सुधीरभाऊंचा नाथाभाऊ करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोपही होत आहे. त्यावर एकनाथ खडसे(Eknath Khadse on Sudhir Mungantiwar) यांची चपखल प्रतिक्रिया आली आहे.
अंतर्गत विरोधकांचा सामना करणं अवघड
सुधीर मुनगंटीवार यांचा एकनाथ खडसे पक्षात होतोय का? यावर पूर्वाश्रमीचे भाजप नेते एकनाथ खडसे यांनी मोठे भाष्य केले आहे. सुधीर मुनगंटीवार हे विरोधकांशी सामना करू शकतात, मात्र पक्ष अंतर्गत विरोधकांचा सामना करणं त्यांना अवघड आहे अशी चपखल प्रतिक्रिया खडसे यांनी दिली आहे.चंद्रपूरमध्ये त्यांना जे अपयश आलं याचं कारण म्हणजे पक्ष अंतर्गत विरोधकामुळे हे अपयश आल्याचे दिसतंय असा आरोपही खडसे यांनी केला.
माझ्यासारखाच त्यांचा संघर्ष सुरू
पक्षविरोधात कोणत्या कोणत्या प्रवृत्ती काम करत आहेत, याविषयी ते वांरवार बोलत आहेत. माझ्या कालखंडात मी केलेला संघर्ष तसा संघर्ष त्यांचा पक्षात सुरू झाल्याचे दिसते.सुधीर मुनगंटीवार यांचं भाजप पक्ष वाढवण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे.त्यांच्याबाबत काही विषय घडतात आणि काही अनावधानांनी घडून आणला जातात.त्यामुळे घडून आणलेल्या परिस्थितीत ते अडकून पडले आहेत, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.
तो निर्णय त्यांच्या अंगलट
सुधीर मुनगंटीवार यांनी प्रदेशाध्यक्ष बदलवण्याबाबत संमती दिली नसती तर यावेळेस राजकीय परिस्थिती वेगळी असती, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. सुधीर मुनगंटीवार यांची चंद्रपूर मध्ये जे परिस्थिती झाली त्यामुळे असं वाटतं असेही खडसे म्हणाले. मुनगंटीवार हे जन्मापासून संघाचे आणि भाजप विचारांचे आहेत. त्या संस्कारात वाढलेले आहेत. काही गोष्टी अनावधानाने घडतात.काही गोष्टी घडवून आणल्या जातात.काहीमध्ये आपली चूक असते.अश्या परिस्थितीत ते अडकले आहेत, असे खडसे यांना वाटते.
