मोठी बातमी ! अखेरच्या क्षणी अजित पवारांना धक्का, तडकाफडकी राजीनाम्याने राष्ट्रवादीत खळबळ
Jalgaon Municipal Corporation Election : जळगावमध्ये अजित दादांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची आज शेवटची तारीख आहे. त्यामुळे ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळाली आहे ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यात व्यस्त आहेत. मात्र काही इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले आहे. काही नेत्यांनी बंडखोरीचा निर्णय घेतला आहे, तर काही नेत्यांनी पक्षांतराचा पर्याय निवडला आहे. अशातच आता जळगावमध्ये अजित दादांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अभिषेक पाटील यांचा तडकाफडकी राजीनामा
जळगावमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. महापालिका निवडणुकीत जागा लढण्यावरून जिल्हाध्यक्ष संजय पवार आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासोबत मतभेद झाल्याने राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये दुफळी निर्माण झाली असून अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. याचा फटका पक्षाला आगामी निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे.
समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू
अभिषेक पाटलांच्या आई तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या महिला पदाधिकारी कल्पनाबाई पाटील यांची पदाधिकाऱ्यांकडून समजूत काढण्याची प्रयत्न सुरू आहे.जिल्हाध्यक्ष संजय पवार, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनीष जैन हे पाटील यांनी समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची जी काही नाराजी असेल ती दूर होईल अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिली आहे. त्यामुळे आता पाटील यांनी नाराजी दूर करण्यात पदाधिकाऱ्यांना यश येते का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जळगावमध्ये महायुतीची घोषणा
जळगाव महानगरपालिकेसाठी महायुतीची घोषणा करण्यात आली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. जळगावमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सहा जागा मिळणार असल्याची माहिती देवकर यांनी दिली आहे, तर उर्वरित जागा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष लढवणार आहे. त्यामुळे राज्य सरकारप्रमाणे आता जळगावमध्ये महायुती पहायला मिळत आहे.
