AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Khadse:…किती नगरसेवक फुटू शकतात? प्रचाराच्या धुराळ्यात एकनाथ खडसेंचा एकनाथ शिंदेंवर मोठा बॉम्ब

Eknath Khadse on Eknath Shinde: महापालिका निवडणुकीसाठी राज्यात तोफा धडाडत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रचाराच्या तोफा थंडावतील. पण त्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या फोनबाबत मोठा खुलासा केला आहे.

Eknath Khadse:...किती नगरसेवक फुटू शकतात? प्रचाराच्या धुराळ्यात एकनाथ खडसेंचा एकनाथ शिंदेंवर मोठा बॉम्ब
एकनाथ खडसे एकनाथ शिंदेImage Credit source: गुगल
| Updated on: Jan 13, 2026 | 11:04 AM
Share

किशोर पाटील /प्रतिनिधी/ जळगाव: जळगाव महापालिका निवडणुकीसाठी सर्वच धुरंधर मैदानात उतरले आहे. जळगाव महापालिकेच्या आखाड्यात सर्वच जोर बैठकांवर जोर देत आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सर्वच महापालिकेत राजकीय वातावरण तापले आहे. तर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडेस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या त्या फोनबाबत खळबळजनक दावा केला आहे. ऐन प्रचार थंडावत असताना खडसेंच्या (Eknath Khadse on Eknath Shinde)आरोपांनी स्थानिक राजकारण ढवळून निघाले आहे. भाजप या आरोपांकडे कसं बघत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

भाजपवर खडसेंचे तोंडसूख

जळगाव महापालिका निवडणुकीच्या एका सभेत एकनाथ खडसे यांनी अनेक आरोप केले. तर जळजळीत टीका केली. हे चोर उच्चक्याचं सरकार आहे. भाजप जळगावमध्ये गुंड वृत्तीच्या लोकांना तिकीट देण्यात आलं आहे. भाजप आता पहिल्यासारखी स्वच्छ प्रतिमेची राहिली नाही. माजी महापौरांवरून खडसेंनी ही टीका केली. जळगावमध्ये भ्रष्टाचार बोकळल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.

एकनाथ खडसेंचं स्फोटक वक्तव्य

पाच वर्षाच्या आधी जळगावचा महापौर बनवण्यासाठी आपली मदत घेण्यात आल्याचा किस्सा त्यांनी सांगितला. जळगावच्या महापालिकेच्या जागेसाठी मागील पंचवार्षिक निवडणुकी वेळी मला एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. जळगावच्या संदर्भात काय करायचा आहे, अशी विचारणा त्यांनी केली. पालिकेचे किती नगरसेवक फुटू शकतात का? असं त्यांनी मला विचारलं. त्यांना मी म्हटलं तुम्ही पाकिटे पाठवा, तीस ते पस्तीस नगरसेवक हे फुटू शकतात. मात्र हा विषय कोणाला सांगू नका? गुलाबराव पाटलांना तर मुळीच नाही गुलाबराव पाटील आणि सुरेश दादा जैन यांचं चांगलं जमतं. त्यामुळे मागील पंचवार्षिक निवडणूक मध्ये फोडाफोडीच राजकारण झालं या विषयावर खडसे भाषणात गौप्यस्फोट खडसेंनी केला.

भाजपवर पैसे वाटपाचा आरोप

सध्या महाराष्ट्रात काय राजकारण सुरू आहे. अजित पवार हे केव्हा शरद पवारांसोबत असतात तर शिंदे हे काँग्रेस सोबत राष्ट्रवादी सोबत असतात काय चाललंय? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा हे सत्तेसाठी काही करायला तयार आहेत आणि सरकारमध्ये एकत्र आहेत, अशी टीका खडसे यांनी केला. लाडक्या बहिणीला पैसे दिले. मात्र भाई हा कसाई निघाला. या सरकारने पंधराशे रुपये दिले मात्र राज्यात महागाई वाढवली. या महापालिका निवडणुकीत सर्व पैशाचे पाकीट वाटल्या जात आहे आणि ते पाकीट भाजपकडून येत आहे, असा गंभीर आरोप खडसेंनी केला.

“लाव रे तो व्हिडीओ” म्हणत फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर सभेत थेट हल्लाबोल
“लाव रे तो व्हिडीओ” म्हणत फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर सभेत थेट हल्लाबोल.
संजय राऊतांकडून लुंगी नेसलेला रवींद्र चव्हाणांचा 'तो' फोटो टि्वट
संजय राऊतांकडून लुंगी नेसलेला रवींद्र चव्हाणांचा 'तो' फोटो टि्वट.
डोंबिवलीत पैसे वाटल्यावरुन राडा, नेमकं काय घडलं?
डोंबिवलीत पैसे वाटल्यावरुन राडा, नेमकं काय घडलं?.
मातोश्रीचं दार, ते अदानी; फडणवीसांकडून ठाकरेंची सगळीच पोलखोल
मातोश्रीचं दार, ते अदानी; फडणवीसांकडून ठाकरेंची सगळीच पोलखोल.
...पण आम्ही 16 तारखेला जिंकणार, अमित ठाकरे यांचा विश्वास
...पण आम्ही 16 तारखेला जिंकणार, अमित ठाकरे यांचा विश्वास.
Love You बोल... कार्यकर्त्याला दादांचं उत्तर अन् एकच हस्यकल्लोळ
Love You बोल... कार्यकर्त्याला दादांचं उत्तर अन् एकच हस्यकल्लोळ.
माझ्या आई-वडिलांवर बोललात, शरम.. CM फडणवीस यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात
माझ्या आई-वडिलांवर बोललात, शरम.. CM फडणवीस यांचा ठाकरे बंधूंवर घणाघात.
घरी आदानी येऊन गेले म्हणून पापं झाकायची का? राज ठाकरे यांचे थेट प्रत्य
घरी आदानी येऊन गेले म्हणून पापं झाकायची का? राज ठाकरे यांचे थेट प्रत्य.
तुम्ही म्हणजे मुंबई, महाराष्ट्र नाही... फडणवीस यांचा ठाकरेंवर घणाघात
तुम्ही म्हणजे मुंबई, महाराष्ट्र नाही... फडणवीस यांचा ठाकरेंवर घणाघात.
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांचं वादळी भाषण
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे यांचं वादळी भाषण.