AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gulabrao Patil: दोन्ही शिवसेना एकत्र येणार? गुलाबराव पाटलांचं सर्वात मोठं वक्तव्य, राज्याच्या राजकारणात महाभूकंप?

Gulabrao Patil on Shivsena: दोन्ही शिवसेना एकत्र येणार का? असा सवाल सातत्याने विचारला जातो. प्रत्येकाची उत्तरं वेगळी असतात. पण त्यातून एक विचार समोर येतोच. शिंदे सेनेचे शिलेदार मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रश्नावर मोठं भाष्य केलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात महाभूकंप येणार का?

Gulabrao Patil: दोन्ही शिवसेना एकत्र येणार? गुलाबराव पाटलांचं सर्वात मोठं वक्तव्य, राज्याच्या राजकारणात महाभूकंप?
गुलाबराव पाटील एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेImage Credit source: गुगल
| Updated on: Jan 23, 2026 | 1:55 PM
Share

Gulabrao Patil on Shivsena: 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर या दोन्ही शिवसेनेतील वाद सातत्याने पुढे आला. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे जहरी बाण भात्त्यातून निघत असतात. पण त्याचवेळी दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी भावनिक सादही घातली जाते. तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेत. गेल्या वर्षी राज्याच्या राजकारणाने नवीन वळण घेतले. या नवीन वर्षात दोन्ही शिवसेना एकत्र येतील का, याची चर्चा रंगली आहे. राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू अथवा कायमचा मित्र नसतो असे म्हणतात. त्याचीच प्रचिती राज्याला पुन्हा एकदा येईल का?

दोन्ही शिवसेना एकत्र?

भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येतील का, यावर पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठे वक्तव्य केलं आहे. आता दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत. प्रत्येकाचा विचार आहे. राजकारणात काहीही होऊ शकते, कोण कधी कुणाबरोबर जाईल हे सांगता येत नाही. आता आपण बघतो आहे, एमआयएमची कुणासोबत युती..त्यामुळे कोणी कोणासोबत जाऊ शकते कन्फर्म सांगू शकत नाही. शिवसेना एकत्र होतील का ? तर राजकारणात काहीही होऊ शकते, असे मोठे संकेत शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. दोन्ही भाऊ एकत्र आले, भविष्यात दोन्ही शिवसेना एकत्र येतील का? या प्रश्नांवर मंत्री गुलाबराव पाटलांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

केडीएमसी शिंदेसेना-मनसे युतीवर भाष्य

कल्याण आणि डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिंदे सेना आणि मनसे यांच्यात युती झाल्याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.त्यांची भूमिका लवचिक आणि टणक आहे. भूमिका प्रत्येकाला वेगवेगळी घेता येते. त्यांची कधी भूमिका घ्यावी हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. कोणत्या भूमिकेमुळे त्यांना फायदा हा राज ठाकरे यांचा व्यक्तिगत विषय आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले. मीरा भाईंदर शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येत असल्यावर त्यांनी भाष्य केले. आता काहीही होत आहे, असे ते म्हणाले. अंबरनाथ मध्ये 11 नगरसेवक आज आले आणि हळद फिटत नाही तोच दुसरा नवरदेव पकडला. अशी परिस्थिती आहे, अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली. राजकारणात कोणीही स्पृश्य-अस्पृश्य नसतो. सत्ता स्थापनेसाठी काहीही होऊ शकते याची प्रचिती राज्याच्या राजकारणात येत असताना आता दोन्ही शिवसेना एकत्र येतील का यावरही सकारात्मक प्रतिक्रिया समोर येत आहे.

लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.