tv9 Marathi Special Report | मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; महाराष्ट्रात गॅस सिलेंडरसाठी रांगा, ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवत असून घरगुती गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेवर ताण निर्माण झाला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा (ESMA) लागू केला आहे.
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवत असून घरगुती गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेवर ताण निर्माण झाला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा (ESMA) लागू केला आहे. काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली असून संबंधितांवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. 1968 साली करण्यात आलेल्या ESMA कायद्याचा उद्देश आपत्कालीन परिस्थितीत अत्यावश्यक सेवांचा सुरळीत पुरवठा कायम ठेवणे हा आहे. दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या वस्तू आणि सेवांचा या कायद्याच्या कार्यक्षेत्रात समावेश होतो. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे घरगुती गॅस सिलेंडरसाठी मोठ्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. तर नागपूरमध्ये जिल्हा प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.
हे पथक शहरातील विविध हॉटेल्स आणि आस्थापनांना भेट देऊन गॅस सिलेंडरचा वापर आणि उपलब्धता याची पाहणी करत आहे. तसेच निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक साठवणूक केली जात आहे का, याचीही तपासणी सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Published on: Mar 11, 2026 10:37 AM
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द

