AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photos: फक्त एक चूक अन् 29 गाड्यांचा कोळसा, डोंबिवलीत अग्नितांडव, नेमंक काय घडलं?

डोंबिवली पूर्व येथील सागाव परिसरात पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत २९ दुचाकी जळून खाक झाल्या असून ५ रहिवासी जखमी झाले आहेत. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

| Updated on: Feb 15, 2026 | 9:10 AM
Share
डोंबिवली पूर्व येथील सागाव परिसरात आज पहाटे एका निवासी इमारतीच्या बेसमेंटमध्ये भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत तब्बल २९ दुचाकी आणि काही सायकली जळून खाक झाल्या. ही आग विझवण्याच्या प्रयत्नात इमारतीमधील ५ रहिवासी जखमी झाले आहेत. सुदैवाने, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली.

1 / 8
सागाव येथील चेडा नगर, जय भारत स्कूलजवळ असलेल्या 'राज अपार्टमेंट' आणि 'रविकिरण सोसायटी' या जोड इमारतींच्या बेसमेंट पार्किंगमध्ये आज पहाटे ४:१५ च्या सुमारास अचानक आग लागली.

सागाव येथील चेडा नगर, जय भारत स्कूलजवळ असलेल्या 'राज अपार्टमेंट' आणि 'रविकिरण सोसायटी' या जोड इमारतींच्या बेसमेंट पार्किंगमध्ये आज पहाटे ४:१५ च्या सुमारास अचानक आग लागली.

2 / 8
ज्या वेळी ही घटना घडली, त्या वेळी सर्व रहिवासी गाढ झोपेत होते. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका दुचाकीने पेट घेतला आणि काही क्षणांतच या आगीने रौद्र रूप धारण केले.

ज्या वेळी ही घटना घडली, त्या वेळी सर्व रहिवासी गाढ झोपेत होते. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका दुचाकीने पेट घेतला आणि काही क्षणांतच या आगीने रौद्र रूप धारण केले.

3 / 8
या आगीचा भडका इतका मोठा होता की, पार्किंगमध्ये रांगेत लावलेल्या इतर दुचाकींनीही पेट घेतला. आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले. धूर इमारतीच्या जिन्यांतून वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचल्याने रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

4 / 8
आगीचे लोळ आणि धुरामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली. जीव वाचवण्यासाठी लहान मुलांसह वृद्ध रहिवाशांनी तातडीने इमारतीबाहेर धाव घेतली. ही आग विझवण्यासाठी गेलेले इमारतीमधील पाच रहिवासी यामध्ये किरकोळ जखमी झाले आहेत.

5 / 8
आगीच्या झळा आणि धुरामुळे त्यांना त्रास झाला असून, तातडीने त्यांना स्थानिक ऑप्टिलाईट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या आगीत रहिवाशांच्या २९ दुचाकींचे सांगाडे उरले असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

6 / 8
या घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

या घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

7 / 8
प्राथमिक तपासानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून सविस्तर पंचनामा केला जात आहे.

प्राथमिक तपासानुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र, नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून सविस्तर पंचनामा केला जात आहे.

8 / 8
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा