Eknath Khadse: हे सर्व मांजरं, कुत्रे, डुकरं मला म्हणायचे की… नाथाभाऊ संतापले, कुणावर साधला निशाणा?
Eknath Khadse Angry: आपल्यावर विरोधक घराणेशाहीचा आरोप लावत होते. पण आता त्यांनीच घरात तिकीट वाटप केल्याचा गंभीर आरोप नाथाभाऊंनी केला आहे. त्यांनी विरोधकांवर शेलक्या भाषेत टीका केली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत वादाला फोडणी बसली आहे.

नाथाभाऊ आणि खानदेशमधील त्यांच्या विरोधकांमध्ये विस्तवही जात नाही. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पाठीमागे शुक्लकाष्ट लागलेले आहे. गेल्याच महिन्यात त्यांच्या जळगावमधील घरात चोरी झाली. त्यावरून चर्चा रंगली. तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या शेलक्या टीकेने वादंग पेटण्याची शक्यता आहे. पुन्हा नवीन वादाला फोडणी बसण्याची शक्यता आहे. आता त्यांनी घराणेशाहीवरुन त्यांच्यावर टीका करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. काय म्हणाले एकनाथ खडसे?
गिरीश महाजन यांच्यासह विरोधकांवर खडसे यांनी खडसावले. त्यांनी त्यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. हे सर्व मांजर, कुत्रे, डुकरं मला म्हणायचे की नाथाभाऊंच्या घरात घराणेशाही आहे गिरीश महाजन यांनी त्यांच्या बायकोला तिकीट दिलं तर इतरांनी पण तसंच केल्याचा आरोप नाथाभाऊंनी केला आहे. तुम्ही मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणार आहात की नाही? संजय सावकारे हे राज्याचे मंत्री आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भुसावळमध्ये प्रचारासाठी यावे लागते असा चिमटा एकनाथ खडसे यांनी काढला. हे सर्व मांजर कुत्रे डुकरं मला म्हणायचे की नाथाभाऊंच्या घरात घराणेशाही आहे. मग आता तुम्ही काय करताय असा सवाल खडसे यांनी केला.
आता लाडकी बायको योजना आणली
तुमच्या बायकांना तिकीट देऊन आता तुम्ही कोणती शाई निघाली. गिरीश महाजन यांनी त्यांच्या बायकोला तिकीट दिलं. सावकारांनी पण तेच केलं. किशोर पाटलांनी मुक्ताईनगरचे आमदार आणि घराणेशाही केली. ही घराणेशाही नाही का? असा सवाल त्यांनी विचारला. लोक आता लाडकी बहीण योजना आता विसरत चालले आहेत. आता यांनी लाडकी बायको नवीन योजना काढली असा मोठा टोला नाथाभाऊंनी लगावला.
अपशब्दाचा वापर, नंतर सावरासावर
एकनाथ खडसेंकडून भाषणात अपशब्दाचा वापर झाल्यानंतर सावरासावर केली. आज सरकार मधले म्हणतात मत नाही दिलं तर निधी देणार नाही, हा काय माज चाललाय? हीकाय तुमची प्रॉपर्टी आहे का? असे खडसे यांनी खडसावले. भुसावळमधील एका प्रचार सभेत खडसे बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली.
