AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Santosh Deshmukh: ‘वाल्मिक कराडला फासावर लटकवेपर्यंत शांत बसणार नाही’, राष्ट्रवादीच्या नेत्याने केला पण, कृष्णा आंधळे जिवंत आहे का? व्यक्ती केली शंका

Santosh Deshmukh Murder Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येला आज एक वर्ष पूर्ण झाले. बीडमधील हैवान यानिमित्ताने पुढे आले. याप्रकरणातील कृष्णा आंधळे वगळता इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने एक मोठा पण केला आहे.

Santosh Deshmukh: 'वाल्मिक कराडला फासावर लटकवेपर्यंत शांत बसणार नाही', राष्ट्रवादीच्या नेत्याने केला पण, कृष्णा आंधळे जिवंत आहे का? व्यक्ती केली शंका
संतोष देशमुख, वाल्मिक कराड
| Updated on: Nov 29, 2025 | 11:45 AM
Share

Walmik Karad Beed: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्यावर्षी 29 नोव्हेंबर रोजी अपहर करून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली होती. याविषयीचे व्हिडिओ आणि फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्र हादरला. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील कृष्णा आंधळे हा आरोपी वगळता इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे. आज मस्साजोग येथे संतोष देशमुख यांचे पहिले पुण्यस्मरण आहे. त्यानिमित्ताने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे, उद्धव सेनेचे नेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित आहेत.

वाल्मिकला फाशी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही

जोपर्यंत वाल्मीक कराडला फाशी होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असे मोठे विधान आमदार संदीप क्षीरसागर यांनी मस्साजोग येथे केले. वाल्मिक कराडचा सीडीआर रिपोर्ट काढावा अशी मागणी आपण सुरुवातीपासून करत आहोत. सीडीआर काढल्यास कराड याला कोणी कोणी मदत केली याची माहिती समोर येईल असे संदीप क्षीरसागर म्हणाले. सगळ्यांना वाईट वाटतं, सगळ्या देशमुख कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू आहेत असे ते म्हणाले. याप्रकरणात सुरुवातीपासूनच क्षीरसागर हे देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी उभे ठाकल्याचे दिसते.

कृष्णा आंधळे जिवंत आहे का?

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून अत्यंत निर्घृण खून करण्यात आला. तेव्हापासून सर्व आरोपी फरार होते. वाल्मिक कराड पुण्यात शरण येताच इतर आरोपींना सुद्धा पुण्यातूनच अटक करण्यात आली होती. पण कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो कधी नाशिकमध्ये दिसला तर कधी पुण्यात दिसला अशा अफवा उठत राहिल्या. पण त्याला अद्यापही पोलीस अटक करू शकलेले नाही. त्याने पोलीस यंत्रणेला खुले आव्हानच दिले आहे. दरम्यान फरार आरोपी कृष्णा आंधळे हा जिवंत आहे की नाही याबाबत आमदार क्षीरसागर यांनी शंका व्यक्त केली.

12 डिसेंबरला दोषारोपपत्र दाखल

12 तारखेला या प्रकरणी दोषारोप पत्र दाखल होणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला आज एक वर्ष पूर्ण झाल्याने संदीप क्षीरसागर यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी याप्रकरणावर भाष्य केले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...