AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमात दगाफटका, तृतीयपंथीयाने विचारला जाब, अखेर तरुणाने केले भयानक कांड

प्रेमप्रकरणातून तृतीयपंथीयाची हत्या झाल्याने जळगाव हादरले आहे. आपल्याशी बेवफाई केल्याचा संशय आल्याने तृतीयपंथीयाने जाब विचारल्याने रागाच्या भरात एका तरुणाने कांड केले आहे.

प्रेमात दगाफटका, तृतीयपंथीयाने विचारला जाब, अखेर तरुणाने केले भयानक कांड
Jalgaon crime
| Updated on: Feb 07, 2026 | 12:08 PM
Share

जळगावच्या एरंडोल तालुक्यातील पद्मालय येथील जंगलात तृतीयपंथीयाला जाळून त्याची निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृतदेहाचे केवळ हात आणि पाय मिळाल्याने मयताची ओळख पटविण्याचा कुठलाही मार्ग नसताना अवघ्या ४८ तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक करीत या घटनेचा पर्दापाश करण्याची मोठी कामगिरी केली आहे.

जळगावात दोन दिवसांपूर्वी अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर ही व्यक्ती तृतीयपंथीय असल्याचे समोर आले होते. तरुणासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून या तृतीय पंथीयाची निघृण हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. दोन दिवसांपूर्वी जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलेली मयत तृतीयपंथीय असल्याचे समोर आलेले असून तरुणासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून तिची निघृण हत्या झाल्याची माहिती उघडकीस आली आहे.

आकांक्षा उर्फ अजय गेंद्रे असे मयत २६ वर्षीय तृतीयपंथीयाचे नाव असून त्याचे स्वप्नील पाटील (२१) या तरुणाशी प्रेम होते. घटनेच्या दिवशी दोघांनी सोबत मद्यप्राशन केले होते.जंगलात गेल्यावर स्वप्नील पाटील याने डोक्यात बिअरची बाटली मारून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर तरुणाने तिची जाळून हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. स्वप्नील आपल्याशी असलेले प्रेमसंबंध तोडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय तृतीय पंथीय आकांक्षा उर्फ अजय गेंद्रे याला आला होता. त्यामुळे आकांक्षाने स्वप्नीलची गावी तसेच वेगवेगळ्या ठिकाणी बदनामी केली होती. बदनामी झाल्याच्या तसेच आकांक्षाकडून होत असलेल्या त्रासाच्या रागातूनच स्वप्नील याने नियोजनबद्ध रित्या आकांक्षा हिची निर्घुणपणे हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

Follow Us
अजबच! लग्नसोहळ्यात बूट चोरीचा खेळ पडला महाग....
अजबच! लग्नसोहळ्यात बूट चोरीचा खेळ पडला महाग.....
मुलींचे नको तसले व्हिडीओ काढायचा अन्... निदा खानला आसरा देणाऱ्या MIM..
मुलींचे नको तसले व्हिडीओ काढायचा अन्... निदा खानला आसरा देणाऱ्या MIM...
मोठी अपडेट! चौकशी दरम्यान भोंदू खरात चवताळला, चक्क... नेमकं काय घडलं?
मोठी अपडेट! चौकशी दरम्यान भोंदू खरात चवताळला, चक्क... नेमकं काय घडलं?.
आमच्या घराघरात वाढते मराठी? सर्वात जास्त विद्यार्थी मराठी विषयात नापास
आमच्या घराघरात वाढते मराठी? सर्वात जास्त विद्यार्थी मराठी विषयात नापास.
पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजी महाग; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजी महाग; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले.
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.