Congress on Eknath Shinde- PM Modi | जोडे का नाही काढले?; मोदी-शिंदेंचा विठ्ठलाच्या मूर्तीसोबतच्या फोटोवर काँग्रेसची बोचरी टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हातात विठ्ठलाची मूर्ती घेतलेला एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या फोटोवरून काँग्रेसने मोदी आणि शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हातात विठ्ठलाची मूर्ती घेतलेला एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या फोटोवरून काँग्रेसने मोदी आणि शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
काँग्रेसने हा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत, स्वतःला भारतीय संस्कृतीचे रक्षक म्हणवणारे मोदी आणि शिंदे विठ्ठलाची मूर्ती हातात घेतानाही पायातील जोडे काढू शकले नाहीत, असा टोला लगावला आहे.
“स्वतःला भारतीय संस्कृतीचे रक्षक म्हणवणारे विठ्ठलाची मूर्ती हातात घेतानादेखील जोडे काढू शकत नाहीत,” अशा आशयाची टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
या फोटोवरून काँग्रेसने भाजपच्या हिंदुत्व आणि भारतीय संस्कृतीच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे मोदी-शिंदे यांच्या या फोटोवरून आता काँग्रेस आणि भाजपमध्ये नवा राजकीय वाद रंगण्याची शक्यता आहे.
Published on: Aug 08, 2026 03:17 PM
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

