नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक… नेमकं काय घडलं?
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीवरून साधू-महंतांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये पार पडलेल्या संत समितीच्या बैठकीत कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा घेताना प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात आले. कामे नियोजित वेळेत पूर्ण होतील का, असा सवालही साधू-महंतांनी केला आहे.

कुंभमेळ्याच्या कामाबद्दल आम्ही उदासीन आहोत, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्री यांना मी स्वतः सांगितले होते लक्ष घाला, असेही सांगण्यात आले. आमच्या कुंभाची परिस्थिती दयनीय करून ठेवली आहे, अशी नाराजी साधू-महंतांनी व्यक्त केली. अखिल भारतीय साधू संत समितीतील काही महंतांनी नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे.
त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमधील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे नाशिकचे हाल करून ठेवले आहेत, असा आरोप बैठकीत करण्यात आला. यावेळी एका साधू-महंतांनी आपण भाजप समर्थक असल्याचे सांगत आता खरं बोलल्याशिवाय गत्यंतर नाही, असे स्पष्ट केले.
नाशिकचा कुंभमेळा फेल गेला आहे पूर्णतः फेल, असे म्हणत सरकारची माफी मागून हे विधान करतो आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे कुंभमेळ्याच्या तयारीवरून प्रशासनासमोरील आव्हाने वाढली आहेत.
Published on: Aug 08, 2026 04:49 PM
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही