AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमात ठाकरेंच्या बड्या नेत्याची हजेरी, थेट...

सरसंघसंचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमात ठाकरेंच्या बड्या नेत्याची हजेरी, थेट…

| Updated on: Aug 08, 2026 | 3:15 PM
Share

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत एका आदिवासी निवासी शाळेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे आमदार

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत एका आदिवासी निवासी शाळेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

मोहन भागवत हे या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी भाजपा आमदार श्वेता महाले आणि आमदार संजय कुटे यांच्यासोबत अंबादास दानवे हेही उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

विशेष म्हणजे, अंबादास दानवे हे ठाकरे गटाचे आमदार असून भाजप आणि संघाच्या भूमिकेवरून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सातत्याने टीका केली जाते. अशा परिस्थितीत संघाच्या प्रमुखांच्या कार्यक्रमात दानवे यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.

आता या उपस्थितीवर उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दानवे यांच्या या उपस्थितीमागे नेमके कारण काय, याबाबतही विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Published on: Aug 08, 2026 03:15 PM

Follow Us