AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीड येथे गोळीबारात मजूराची हत्या, अखेर सीसीटीव्ही फुटेज आले समोर

बीड येथे एका मजूराची भरदिवसा गोळीबारात हत्या झाली होती. त्यानंतर आरोपी बिनधास्त पसार झाला होता. या प्रकरणात आरोपीचा शोध सुरु असतानाच आता या घटनेचे सीसीटीव्ही समोर आले आहेत.

बीड येथे गोळीबारात मजूराची हत्या, अखेर सीसीटीव्ही फुटेज आले समोर
| Updated on: Jan 09, 2026 | 10:28 PM
Share

बीड : बीड शहरात एका पाईपलाईनसाठी खड्डा खणणाऱ्या मजुराची गोळीबारात ६ जानेवारी रोजी हत्या करण्यात आली होती. जुन्या वादातून ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात होते. भर दिवसा अशा प्रकारे एका मजूराची हत्या झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. आता या हत्येचे सीसीटीव्ही फूटेज समोर आले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये गोळीबार करणारा पळून जाताना दिसत आहे.

बीड शहरावरचा गुन्हेगारीचा डाग पुसला जातच नाहीए. मंगळवार ६ जानेवारी रोजी बीड येथील अंकुशनगर भागात एका पाईपलाईनचे काम करणाऱ्या मजुरावर अत्यंत जवळून गोळीबार झाल्याची घटना घडली होती. गोळीबारानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले होते. नगर परिषदेत रोजंदारीवर मजूरी करणारे हर्षद शिंदे यांची हत्या झाल्याचे नंतर उघडकीस आले. दिवसाढवळ्या एका मजूरावर गोळीबार झाल्याने बीड शहरात घबराट पसरली होती.

हर्षद शिंदे यांचा गोळीबारात मृत्यू

बीड शहरातील अंकुश नगरात नगरपरिषदेचे पाईपलाईनसाठी खड्डा खोदण्याचे काम सुरु होते. त्या दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरानी हर्षद शिंदे यांच्या अत्यंत जवळजाऊन त्याच्यावर गोळीबार केला. त्यामुळे हर्षद शिंदे यांचा गोळीबारात मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी विशाल सुर्यवंशी हा घटना स्थळावरुन पसार झाला. घटनेची माहिती मिळ्यानंतर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. या घटनेनंतर पंचनामा करण्यात आला. पोलिसांना हर्षद शिंदे याचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी दवाखान्यात पाठवून दिला. या प्रकरणात आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती सापडले आहेत. दिवसा ढवळ्या झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे बीडमधील कायदा-सुव्यवस्था पुन्हा चर्चेत आली आहे.

सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल
सामंतांच्या बॅगेची आयोगाकडून तपासणी, बॅगेत काय-काय? मंत्र्यानच सांगितल.
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्...
...मग आम्ही काय बांगड्या भरल्यात का? अजितदादांवर ऐकरी भाषा अन्....
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा
नितेश राणेंचे व्हिडीओ 11 तारखेला व्हायरल करू, सचिन अहिर यांचा निशाणा.
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल
मी टोपी फेकली, राऊतांनी दोघांच्या डोक्यात घातली... फडणवीसांचा हल्लाबोल.
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास
कल्याण-डोंबिवलीचा महापौर महायुतीचाच... शिंदेंकडून विजयाचा विश्वास.
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला
घरच्या माणसांनी घरच्यांसाठीच... फडणवीसांचा ठाकरेंच्या मुलाखतीवरून टोला.
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात
..म्हणून मी काँग्रेस सोबत गेलो होतो, ठाकरेंचा भाजपच्या युतीवरून घणाघात.
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं
1500 रूपये कुठ टिकणार? लाडकी बहीण योजनेवरून राज ठाकरेंनी सरकारला घेरलं.
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?
मला आज आनंद होतोय, कारण माझा भाऊ...उद्धव ठाकरे सभेत नेमकं काय म्हणाले?.
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला
लाकूडतोड्या बरा होता, तपोवनवरून राज ठाकरे यांचा गिरीश महाजनांना टोला.