बिलासपूर : अल्पवयीन पालकांनीच नवजात बालकाला झुडुपात फेकले, पोलीस तपासात प्रकरणाचा उलगडा

हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील तलाई पोलीस ठाण्याअंतर्गत घंडीर ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेल्या महिन्यात 2 ऑक्टोबर रोजी एक नवजात बालक सापडले होते. घंडीर गावातील शेतात एक झाडीत निळ्या कपड्यात रक्ताने माखलेले नवजात बालक आढळल्याने परिसरात खळबळ माजली होती.

बिलासपूर : अल्पवयीन पालकांनीच नवजात बालकाला झुडुपात फेकले, पोलीस तपासात प्रकरणाचा उलगडा
अमानुष ! पश्चिम बंगालमध्ये तृतीयपंथियाचा कहर
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 9:46 PM

बिलासपूर : गेल्या महिन्यात हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील घंडीर गावात एका झुडुपात नवजात अर्भक सापडले होते. गेले महिनाभर पोलीस या अर्भकाच्या आई-वडिलांचा शोध घेत होते. अखेर महिनाभरानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला असून अल्पवयीन पालकांनीच या अर्भकाला झाडीत फेकले असल्याची लाजीरवाणी घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या अर्भकाचे आई-वडील दोघेही चुलत भाऊ-बहिण आहेत. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई सुरू केली आहे.

गेल्या महिन्यात झुडुपात सापडले होते नवजात बालक

हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील तलाई पोलीस ठाण्याअंतर्गत घंडीर ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेल्या महिन्यात 2 ऑक्टोबर रोजी एक नवजात बालक सापडले होते. घंडीर गावातील शेतात एक झाडीत निळ्या कपड्यात रक्ताने माखलेले नवजात बालक आढळल्याने परिसरात खळबळ माजली होती. या बालकाला तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात नेल्यानंतर काही वेळात बालकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करीत बालकाच्या पालकांचा शोध सुरु केला होता.

पोलीस तपासात अल्पवयीन भावंडांनी दिली गुन्ह्याची कबुली

पोलीस गेले महिनाभर या प्रकरणाचा तपास करीत होते. पोलिसांनी आतापर्यंत अनेकांची चौकशी केली. घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात पोलीस कसून तपास करीत होते. या तपासादरम्यान पोलिसांची संशयाची सूई या दोघांवर फिरली. त्यानुसार पोलिसांनी आज या दोघा अल्पवयीन भावंडांना चौकशीसाठी बोलावले होते. पोलीस चौकशीमध्ये दोघा भाऊ-बहिणीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. दोघेही नात्याने चुलत भाऊ-बहिण आहेत. दोघा भावंडांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

अल्पवयीन मुलगी दहावीची विद्यार्थीनी

सदर अल्पवयीन मुलगी इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आहे. तिच्या चुलत भावाचीच तिच्यावर वाईट नजर होती. या भावानेच तिच्यासोबत अनधिकृत संबंध प्रस्थापित केले. यातून ती गरोदर राहिली. मात्र या संबंधाबाबत आणि गरोदरपणाबाबत कुटुंबियांना काहीच माहिती नव्हती. या प्रकरणाची पुष्टी करताना, एसपी बिलासपूर साजू राम राणा यांनी सांगितले की, दोघेही अल्पवयीन भावंडे असून ते पोलिसांच्या ताब्यात आहेत. दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे. (Arrest of minor parents for throwing a newborn baby in bilaspur himachal pradesh)

इतर बातम्या

Pune Crime| …अन लोणावळ्यात खासगी बंगल्यावर छापा टाकत17 जणांना अटक; पोलिसांची कारवाई

संपत्तीचा हव्यास, जन्मदात्याचाच घात; पश्चिम बंगालमध्ये डोक्यात वीट घालून मुलीकडून पित्याची हत्या

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.