AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं भरभरुन कौतुक, एक प्लेयरचा विशेष उल्लेख म्हणाले, त्याने…

Devendra Fadnavis : टीम इंडियाने काल फायनलमध्ये न्यूझीलंडला हरवून तिसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज टीमच्या खेळाडूंच भरभरुन कौतुक केलं. विधानसभेत त्यांनी टीम इंडियाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला.

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं भरभरुन कौतुक, एक प्लेयरचा विशेष उल्लेख म्हणाले, त्याने...
Devendra Fadnavis
| Updated on: Mar 09, 2026 | 12:20 PM
Share

“टी20 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पुन्हा एकदा भारतीय टीमने भारताचा तिरंगा झेंडा फडकवलेला आहे. काल अनेक रेकॉर्ड तोडत न्यूझीलंडचा पराभव भारताने केला. टी20 सामन्याच्या इतिहासामध्ये फायनलमध्ये अशा प्रकारचा स्कोर करणं, अशा पद्धतीने गारद करणं हा नवीन रेकॉर्ड आहे. विशेषत: संजू सॅमसन, अभिषेक शर्मा यांनी ज्या प्रकारची बॅटिंग केली, त्यामुळे भक्कम फाऊंडेशन झालं. बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराह यांनी ज्या प्रकारे पूर्ण सीरीजमध्ये अतिशय इकोनॉमिक बॉलिंग केली. कालही ज्या प्रकार न्यूझीलंड टीमला गारद केलं ती विलक्षण पद्धतीची बॉलिंग पहायला मिळाली. एूकण टीमचा परफॉर्मन्स उत्तम राहिला” अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाचं कौतुक केलं.

“एक सामना आपण हरलो बाकी कुठल्या सामन्यात पराजित झालो नाही. एक मोठा विजय मिळवला. सूर्यकुमार यादव आणि संपूर्ण टीम या सर्वांच मनापासून अभिनंदन करतो आणि मुंबईचे खेळाडू देखील टीममधील त्यांनी उत्तम खेळ केला. शिवम असेल सूर्या असतील मनासापूसन अभिनंदन करतो. मी आज त्याच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडणार आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भारत ठामपणे उभा राहिला

“मोदी सरकारने भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित केली आहे. मोदींनी दाखवून दिलं, ज्यावेळी टॅरिफ वॉर झालं, त्यावेळी भारत झुकला नाही. भारत ठामपणे उभा राहिला. वेगवेगळ्या देशांसोबत टॅरिफ करार केले. टॅरिफ वॉर करणाऱ्यांना मागे हटावं लागलं. एका कुटुंबाची गुलामगिरी करणाऱ्यांनी यावर बोलणं हास्यास्पद आहे” असं फडणवीस म्हणाले.

कोणीही अफवा पसरवू नये

“केंद्र सरकार तेल, गॅस या गोष्टींची काळजी घेत आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे. कुठेही तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी उपायोजना चालू आहेत. कोणीही अफवा पसरवू नये. अफवांवर विश्वास ठेऊन साठे केले तर परिस्थिती खराब होईल. डिमांड आणि सप्लायचं सूत्र बिघडेल. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की, अफवांवर विश्वास ठेऊ नका. केंद्र सरकार या संदर्भात उचित काळजी घेत आहे. देशात युद्धामुळे जी परिस्थिती निर्माण झालीय, ती व्यवस्थित हाताळण्यांच काम मोदींजीच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार करत आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Follow Us
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?