AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अचानक चुकीच्या ठिकाणी शिरला उंदीर, तरुणांनी त्याच्यासोबत जे केलं ते पाहून नेटकरी संतापले, Video Viral

सध्या सोशल मीडियावर एका उंदराचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो अचानक एका रुममध्ये घसतो आणि पुढे विद्यार्थी त्याच्यासोबत जे करतात ते पाहून तुम्हाला देखील बसेल धक्का.

अचानक चुकीच्या ठिकाणी शिरला उंदीर, तरुणांनी त्याच्यासोबत जे केलं ते पाहून नेटकरी संतापले, Video Viral
| Updated on: Jul 28, 2026 | 7:34 PM
Share

सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कॉमेडी आणि भावनिक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच आता असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे. मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये काही तरुणांनी एका उंदरासोबत केलेली क्रूर वागणूक पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका खोलीत उंदीर शिरल्याचे दिसते आहे. खोलीत काही तरुण बसलेले दिसत असून, त्यांनी उंदराला बाहेर काढण्याऐवजी त्याच्याशी अमानुष वागणूक दिल्याचे दिसून येत आहे. एका तरुणाने चप्पलने उंदरावर वार केल्याचे दिसत आहे. त्यानंतर दुसरा तरुण उंदराची शेपटी पकडून त्याला हवेत उचलतो आणि चेंडूप्रमाणे दूर फेकतो. संपूर्ण व्हिडिओमध्ये उंदराला पुन्हा पुन्हा मारणे आणि फेकणे असे प्रकार सुरू असल्याचे दिसत आहे.

काही तासांमध्ये मिळाले हजारो व्ह्यूज

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे किंवा तो कधी शूट करण्यात आला, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र, हा व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्याला मोठ्या प्रमाणात शेअर देखील केलं जात आहे. त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे.

हा व्हिडिओ एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @Shibyash_17 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओसोबत जेव्हा एखादा सोलो प्लेयर एखाद्या इव्हेंटमध्ये घुसतो असे विनोदी कॅप्शन देण्यात आले आहे. या व्हिडिओला 32 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडिओवर चाहत्यांकडून प्रतिक्रिया

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. एका यूजरने, बिचारा चुकीच्या ठिकाणी अडकला, अशी प्रतिक्रिया दिली. दुसऱ्या यूजरने, हे तर आयटी कॉर्पोरेट कल्चरच आहे अशी उपरोधिक टिप्पणी केली. तर आणखी एका यूजरने आपल्या घरीही असा अनुभव आल्याचे सांगत प्रतिक्रिया व्यक्त केली.

टीप : या घटनेबाबतची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि दाव्यांवर आधारित आहे. व्हिडिओची सत्यता, ठिकाण किंवा वेळ याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी