AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेचा THAAD निघाला फुसका! इराणच्या एका हल्ल्यात महासत्तेची नाचक्की, नुकसानाचा आकडा ऐकून थक्क व्हाल

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्ध आता टोकाला पोहोचले आहे. इराणने केलेल्या हल्ल्यात आता अमेरिकेचे 2 अब्ज डॉलर्स इतके नुकसान झाले आहे. नेमकं काय झालं चला जाणून घेऊया...

अमेरिकेचा THAAD निघाला फुसका! इराणच्या एका हल्ल्यात महासत्तेची नाचक्की, नुकसानाचा आकडा ऐकून थक्क व्हाल
डोनाल्ट ट्रम्पImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Mar 09, 2026 | 12:39 PM
Share

इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील वाढत्या संघर्षात एक मोठी धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा संघर्ष टोकाला पोहोचला आहे. आता ज्या अमेरिकन मिसाइल डिफेन्स सिस्टमचा जगभरात मोठा गाजावाजा होत होता, तीच इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांसमोर पूर्णपणे हतबल ठरली. संघर्षाच्या सुरुवातीच्या दिवसांतच अमेरिकेला सुमारे २ अब्ज डॉलर्सचे (अंदाजे १६,००० कोटी रुपये) लष्करी नुकसान झाले असून, यात अत्याधुनिक रडार सिस्टम आणि लढाऊ विमानांचा समावेश आहे.

अर्ली वॉर्निंग रडार उद्ध्वस्त

इराणच्या ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांनी कतारमधील अल उदीद एअर बेसवरील अमेरिकेची AN/FPS-132 अर्ली वॉर्निंग रडार सिस्टमला लक्ष्य केले. ही १.१ अब्ज डॉलर्सची (अंदाजे ९,००० कोटी रुपये) यंत्रणा पूर्णपणे नष्ट झाली असून, कतारनेही याची पुष्टी केली आहे. याशिवाय बहरीनमधील अमेरिकन नौदलाच्या फिफ्थ फ्लीट मुख्यालयावरही हल्ला झाला, ज्यात सॅटेलाइट कम्युनिकेशन टर्मिनल्स आणि महत्त्वाच्या इमारतींचे मोठे नुकसान झाले.

THAAD का अपयशी ठरली?

जगातील सर्वात प्रगत मानली जाणारी THAAD (Terminal High Altitude Area Defense) अँटी-बॅलिस्टिक मिसाइल सिस्टम इराणच्या हल्ल्यांसमोर पूर्णपणे अपयशी ठरली. जॉर्डनमधील मुवफ्फाक साल्टी एअर बेस आणि यूएईतील अल-रुवाइस येथील THAAD रडार (AN/TPY-2) यांना इराणच्या अचूक क्षेपणास्त्रांनी थेट टार्गेट केले. या रडारची किंमत सुमारे ३०० ते ५०० दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. त्यामुळे अमेरिकेच्या संपूर्ण डिफेन्स स्ट्रॅटेजीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सॅटेलाइट इमेजेस आणि विविध रिपोर्ट्सनुसार हे रडार उद्ध्वस्त झाले आहेत.

इराणच्या ‘स्मार्ट’ हल्ल्याची रणनीती

THAAD मुख्यतः उंचावरून येणाऱ्या बॅलिस्टिक मिसाइल्सना रोखण्यासाठी डिझाइन केलेली आहे. मात्र इराणने लो-अँगल क्रूझ मिसाइल्स, आत्मघाती ड्रोन्स आणि मल्टी-डायरेक्शनल (एकाच वेळी अनेक दिशांनी) हल्ल्यांची रणनीती अवलंबली. यामुळे THAAD सोबत असलेल्या पॅट्रियट आणि आयर्न डोम सारख्या सिस्टम्स एकत्रितपणे काम करूनही या हल्ल्यांना रोखण्यात अपयशी ठरल्या. इराणच्या स्वस्त ड्रोन्स आणि मिसाइल्ससमोर अमेरिकेच्या महागड्या इंटरसेप्टर्सची कमतरता दिसून आली.

भारताच्या S-400 ने दाखवले कौशल्य

माजी एअर मार्शल अनिल चोप्रा यांनी ‘युरेशियन टाइम्स’मध्ये लिहिलेल्या लेखात भारताच्या S-400 सिस्टमची तुलना केली आहे. २०२५ मध्ये पाकिस्तानने चिनी उपग्रहांच्या मदतीने S-400 चे लोकेशन शोधले होते, तरीही भारतीय हवाई दलाने सिस्टम वेगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवली (मोबिलिटी). यामुळे पाकिस्तानचे ड्रोन किंवा क्षेपणास्त्र S-400 जवळ पोहोचू शकले नाहीत. ही ‘ऑनियन स्किन’ रणनीती आणि क्रू मेंबर्सचे कौशल्य यामुळे भारताची सिस्टम यशस्वी ठरली, तर THAAD अपयशी ठरली.

नुकसानाचा आढावा

-कतार: १.१ अब्ज डॉलर्सचे AN/FPS-132 अर्ली वॉर्निंग रडार उद्ध्वस्त.

-बहरीन: फिफ्थ फ्लीट मुख्यालयातील सॅटेलाइट कम्युनिकेशन टर्मिनल्स निकामी (२० दशलक्ष डॉलर्स).

-जॉर्डन/यूएई: THAAD चे AN/TPY-2 रडार नष्ट (३००-५०० दशलक्ष डॉलर्स).

एकूण: पहिल्या ४-६ दिवसांत अमेरिकेला अंदाजे १.९ ते २ अब्ज डॉलर्सचे नुकसान.

हे नुकसान अमेरिकेच्या मिडल ईस्टमधील लष्करी उपस्थिती आणि डिफेन्स क्षमतेवर मोठा परिणाम टाकणारे आहे. इराणच्या अचूक आणि कमी खर्चाच्या हल्ल्यांनी महासत्तेच्या महागड्या तंत्रज्ञानाची मर्यादा उघडकीस आणली आहे.

Follow Us
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून
मोठी बातमी! कुणाल कामरा, सोनम वांगचुक, अभिजित दिपके अडचणीत; राम-सीता वक्तव्यावरून कोर्टात याचिका दाखल
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर