Pune Crime| …अन लोणावळ्यात खासगी बंगल्यावर छापा टाकत17 जणांना अटक; पोलिसांची कारवाई

कार्ला गावातील एमटीडीसीजवळमी असलेल्या दुर्गा सोसायटीतील तन्वी बंगल्यात हा कार्यक्रम सुरु होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर, लोणावळा उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला. एकूण १७ जणांना ताब्यात घेत अटक केली.

Pune Crime| ...अन लोणावळ्यात खासगी बंगल्यावर छापा टाकत17 जणांना अटक; पोलिसांची  कारवाई
प्रातिनिधिक फोटो

पुणे – कर्कश आवाजात डीजे लावून अश्लील हावभाव करत, हिडीस नृत्य करणाऱ्या 17 जणांना  लोणावळा पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले आहे. लोणावळ्यातील कार्ला गावाच्या हद्दीतील एमटीडीसी जवळच्या एका खासगी बंगल्यात हा प्रकार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्या 17 मध्ये 9  पुरुष व 8 महिलांचा समावेश आहे. घटना स्थळावरून वाहने, फोन असा 74 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

असा टाकला छापा कार्ला गावातील एमटीडीसीजवळमी असलेल्या दुर्गा सोसायटीतील तन्वी बंगल्यात हा कार्यक्रम सुरु होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर, लोणावळा उपविभागीय अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकला. एकूण १७ जणांना ताब्यात घेत अटक केल्याची माहिती लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली.

या गोष्टी केल्या जप्त यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. खासगी बंगल्यात गैरकृत्य करताना ऋषिकेश संजय पठारे, अमित कृष्णा मोरे, योगेश संदेश काशिद, विकास रामचंद्र पारगे, कैलास मारुती पठारे, स्वप्निल जगदीश तापकीर, विनोद रमेश डख, प्रसाद बाळासाहेब वीर, नागेश कुंडलीक थोरवे (सर्व रा. चऱ्होली व भोसरी परिसर) यांच्यासह 8 महिलांना अटक केली आहे. तेथून रोख रक्कम, मोबाईल फोन, चारचाकी ५ वाहने, स्पीकर असा एकूण 74 लाख 27 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्या 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, पोलीस उप अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर, सहायक फौजदार युवराज बनसोडे, पोलीस नाईक प्रणयकुमार उकिर्डे आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

हेही वाचा

शिवसेना-भाजपने एकत्रं यायला हवं, त्याशिवाय पर्यायच नाही; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं रोखठोक मत

2014 नंतर काय मिळालं?, पेट्रोल महंगा, गॅस महंगा… छगन भुजबळांनी उडवली कंगनाच्या विधानाची खिल्ली

भूमिहीन शेतकऱ्याच्या घरी जन्म, उच्च शिक्षणानंतर कार्पोरेट कंपनीत नोकरी, तरीही नक्षलवादी झाला; कोण आहेत मिलिंद तेलतुंबडे?

Published On - 6:54 pm, Sun, 14 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI