शिवसेना-भाजपने एकत्रं यायला हवं, त्याशिवाय पर्यायच नाही; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं रोखठोक मत

ज्या कारणाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे.

शिवसेना-भाजपने एकत्रं यायला हवं, त्याशिवाय पर्यायच नाही; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं रोखठोक मत
vikram gokhale
Follow us
| Updated on: Nov 14, 2021 | 2:14 PM

पुणे: ज्या कारणाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली, त्या बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याचा प्रत्यय मला आहे. सध्याचं जे गणित आहे ते चुकलेलं आहे. हे सुधारायचं असेल तर शिवसेना आणि भाजप एकत्रं आल्याशिवाय पर्याय नाहीच, असं रोखठोक मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं.

अभिनेते विक्रम गोखले यांनी मीडियाशी संवाद साधताना हे मत व्यक्त केलं. शिवसेना-भाजप एकत्र यावेत म्हणून माझे प्रयत्न सुरू आहेत. तुमचं तरी काय बिघडलं असतं. ती चूक झाली. ज्यांना फॉलोअर्स असतील त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या आघाडीसाठी पुढाकार घाययला हवा, मी घेतोय पुढाकार, असं विक्रम गोखले म्हणाले. यावेळी त्यांनी एसटीच्या संपावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना-भाजप युतीबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. तेव्हा चूक झाली असं उत्तर फडणवीसांनी दिलं होतं. दोन्ही पक्षांनी अडिच अडिच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेतलं असतं तर काय बिघडलं असतं? असा सवालही त्यांनी केला. एसटी महामंडळाचा मी ब्रँड अॅम्बेसिडर होतो. एअर इंडिया आणि एसटीला राजकारण्यांनी गाळात घातलं आहे, अशी टीका त्यांनी केली.

कंगना जे म्हणाली ते खरं आहे

यावेळी त्यांनी अभिनेत्री कंगना रणावतच्या वक्तव्याचं समर्थन केलं. कंगना जे म्हणाली ते खरं आहे. मी समर्थन करतो तिच्या वक्तव्याचे. कोणाच्या मदतीने हे स्वातंत्र्य मिळालं आहे? आपले स्वातंत्र्यवीर जेव्हा फाशीवर जात होते. तेव्हा त्यांना फाशीपासून कोणी वाचवलं नाही. हे चुकीचं आहे, असं ते म्हणाले. मतपेट्यांचं राजकारण करणाऱ्यांमुळेच हिंदू, मुस्लिम, ब्राह्मण, दलित असा वाद होत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

आर्यन हिरो नाही, शाहरुख वाकडं करू शकत नाही

यावेळी त्यांनी आर्यन प्रकरणावरही भाष्य केलं. मी अत्यंत स्पष्ट सांगतो. शाहरुख खान आणि आर्यन माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. देशाच्या बॉर्डरवर 21 वर्षाचा जवान गोळी लागून मरतो तेव्हा तो खरा हिरो असतो. आर्यन हिरो नाही, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Naxal attack in Bihar: नक्षलवाद्यांकडून 4 जणांना घराबाहेर फाशी, घर उडवले

Bengal Violence: बंगालमध्ये राजकीय हिंसाचार सुरूच, मेदिनीपूरमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या, तृणमूलवर आरोप

MP: पंतप्रधान मोदींच्या स्वागतापूर्वी राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह 110 मंत्री, आमदारांचा RT-PCR निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य

या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.