Naxal attack in Bihar: नक्षलवाद्यांकडून 4 जणांना घराबाहेर फाशी, घर उडवले

Naxal attack in Bihar: नक्षलवाद्यांकडून 4 जणांना घराबाहेर फाशी, घर उडवले
माओवाद्यांनी घराबाहेर लावलेली चिट्ठी/Bihar Gaya Naxal attack

शनिवारी रात्री बिहारमधील गया येथे नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला चढवला. गयापासून 70 किमी अंतरावर असलेल्या डुमरिया ब्लॉकच्या मौनवर गावात माओवाद्यांनी दोन महिलांसह चार जणांना त्यांच्या घराबाहेरील खड्ड्यात फाशी देऊन लटकवले. मिळालेल्या माहितीनुसार, मृत एकाच घरातील दोन पती-पत्नी आहेत.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Devashri Bhujbal

Nov 14, 2021 | 2:05 PM

गडचिरोलीत नक्षलवाद्यांविरोधात जोरदार कारवाई करण्यात आली आहे. यानंतर, शनिवारी रात्री बिहारमधील गया येथे नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला चढवला. गयापासून 70 किमी अंतरावर असलेल्या डुमरिया ब्लॉकच्या मौनवर गावात माओवाद्यांनी दोन महिलांसह चार जणांची हत्या केली आहे. चौघांनाही त्यांच्या घराबाहेरील खड्ड्यात फाशी देऊन लटकवण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, मृत एकाच घरातील दोन पती-पत्नी आहेत. नक्षलवाद्यांनी त्यांच्या गावात बॉम्बनेपण हल्ल केला.  (After Gadchiroli action Naxals Attacked in Bihar Gaya Naxalites hanged 4 people in the house bomb attack in village)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी रात्री घडली. यावेळी नक्षलवाद्यांनी एक घर बॉम्बने उडवले आणि मोटारसायकला आग लावली. याप्रकरणी एसएसपी आदित्य कुमार म्हणाले, निवडणुकीत आपले वर्चस्व दाखवण्यासाठी नक्षलवाद्यांनी हे भ्याड कृत्य केले आहे. ज्या ठिकाणी चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले होते त्याच ठिकाणी ही हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली सुरू केली आहे.

माओवाद्यांनी लावली चिट्ठी

पोलिसांनी सांगितले की, मृतांमध्ये सतेंद्र सिंग, महेंद्र सिंग, मनोरमा देवी आणि सुनीता सिंग यांचा समावेश आहे. माओवाद्यांनी लावलेल्या चिट्ठीत म्हटले आहे की, खुनी, देशद्रोही आणि विश्वासघात करणाऱ्यांना फाशीशिवाय पर्याय नाही. घटनास्थळी लावलेले चिट्ठी जनमुक्ती छापाकार सेना, मध्य विभाग झारखंड, सीपीआय (माओवादी) यांच्या नावाची आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. गया मुख्यालयातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत.

हे ही वाचा

गडचिरोलीत नक्षलविरोधी कारवाईत मिलिंद तेलतुंबडेसह ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे आली समोर , वाचा ठार झालेल्यांची संपूर्ण यादी

खरंच ‘हिंदू खतरे में है’ तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा, मोदी-शहांना जाब विचारावा; संजय राऊत यांचं आव्हान

राजकारण पेटलेः 93 च्या दंगलीत बाळासाहेबांचा पुढाकार नसता तर मुंबईत हिंदू जिवंत नसता, आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार बोलणार नाहीत का, चंद्रकांत पाटलांचा सवाल

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें