एचआयव्हीग्रस्त बालकांना शाळेतून हाकलले, बीडमधील धक्कादायक प्रकार, पालकमंत्र्यांकडे तक्रार

| Updated on: Feb 04, 2021 | 10:48 AM

बीडच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत एचआयव्हीग्रस्त बालकांना शाळेतून हाकलल्याची गंभीर तक्रार पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. | HIV Student Expelled From ClassRoom

एचआयव्हीग्रस्त बालकांना शाळेतून हाकलले, बीडमधील धक्कादायक प्रकार, पालकमंत्र्यांकडे तक्रार
Student
Follow us on

बीड : एकीकडे सरकार आणि प्रशासन HIV वर जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी हजारो कोटी खर्च करत असताना दुसरीकडे बीडच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत एचआयव्हीग्रस्त बालकांना शाळेतून हाकलल्याची गंभीर तक्रार पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. (HIV Student Expelled From Class beed pali Infant india Director Cmplaint)

एचआयव्हीग्रस्त बालकांना धीर देण्याची गरज असताना किंवा त्यांच्याशी प्रेमाने वागण्याची गरज असताना बीडच्या पालीतील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी मात्र एचआयव्हीग्रस्त बालकांना शाळेतून हाकलून लावल्याचा आरोप होतोय. एचआयव्हीग्रस्त मुलांकडून संसर्ग होईल म्हणून पीडित मुलांना शाळेबाहेर काढल्याचा आरोप करण्यात आलाय.

पाली येथील जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकाराने बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकाराला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी होत आहे.

इनफंट इंडिया या संस्थेत एचआयव्हीग्रस्त अनाथ मुलांचे संगोपन होते. या संस्थेत अनेक एचआयव्हीग्रस्त मुलं आहेत. तिथे त्यांचं पालन पोषण केलं जातं. याच संस्थेतील मुलांबरोबर असा गंभीर प्रकार घडला आहे. संस्थेचे अध्यक्ष दत्ता बारागजे यांची जिल्हा प्रशासनाकडे कारवाईची मागणी केली आहे. जे कुणी या घटनेला जबाबदार असतील त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आमच्याविरोधात झालेले आरोप खोटे

मात्र दुसरीकडे झालेल्या आरोपाचं खंडन करत या मुलांचा प्रवेशही आमच्याकडे नाहीय. आम्ही त्यांना हाकलून वगैरे दिलेलं नाहीय. याच संस्थेतील 6 वी ते 10 वर्यंतचे विद्यार्थी आमच्याकडे शिकायला आहेत. आम्ही दुजाभाव करणार नाही. आमच्याविरोधात झालेले आरोप खोटे आहेत, असं स्पष्टीकरण जि.प. शाळेचे मुख्याध्यापक के.एस. लाड यांनी दिलंय.

(HIV Student Expelled From Class beed pali Infant india Director Cmplaint)

हे ही वाचा :

मंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांचा बीडला जनता दरबार, कारण काय?