… तर ड्रग्जप्रकरणी विवेक ओबेरॉयचीही चौकशी करू; अनिल देशमुख यांचा इशारा

| Updated on: Oct 17, 2020 | 12:49 PM

एनसीबीने विवेक ओबेरॉय प्रकरणाची चौकशी केलेली नाही. त्यामुळे आम्ही एनसीबीला निवेदन देणार असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्याची विनंती करणार आहोत. एनसीबीने या प्रकरणाची चौकशी केली नाही तर मुंबई पोलीस विवेक ओबेरॉयची चौकशी करेल, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं. ड्रग्ज प्रकरणात विवेक ओबेरॉय यांचा काय संबंध आहे? याची माहिती बाहेर आलीच पाहिजे,असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

... तर ड्रग्जप्रकरणी विवेक ओबेरॉयचीही चौकशी करू; अनिल देशमुख यांचा इशारा
Follow us on

मुंबई: अभिनेता विवेक ओबेरॉय याचं ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बंगळुरू पोलीस मुंबईत आली आहे. मात्र, एनसीबीने या प्रकरणाची अद्यापही चौकशी सुरू केलेली नाही. विवेक ओबेरॉयचीही या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आम्ही एनसीबीला निवेदन देणार आहोत. त्यांनी जर या प्रकरणाची चौकशी केली नाही, तर मुंबई पोलीस विवेक ओबेरॉयची चौकशी करेल, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज स्पष्ट केलं. (anil deshmukh reaction on Vivek Oberoi drug connection)

प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. विवेक ओबेरॉय हे भाजपचे स्टारप्रचारक आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील 27 भाषेतील बायोपिकमध्ये काम केलं आहे. तर संदीप सिंह हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. विवेक ओबेरॉय यांच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि इतर काँग्रेस नेत्यांनी केली आहे. विवेक ओबेरॉयची चौकशी करण्यासाठी बंगळुरू पोलीस मुंबईत आले आहेत. मात्र, एनसीबीने अद्यापही या प्रकरणाची चौकशी केलेली नाही. त्यामुळे आम्ही एनसीबीला निवेदन देणार असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्याची विनंती करणार आहोत. एनसीबीने या प्रकरणाची चौकशी केली नाही तर मुंबई पोलीस विवेक ओबेरॉयची चौकशी करेल, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं. ड्रग्ज प्रकरणात विवेक ओबेरॉय यांचा काय संबंध आहे? याची माहिती बाहेर आलीच पाहिजे, असंही ते म्हणाले.

काय म्हणाले होते सावंत?

सचिन सावंत यांनी काल देशमुख यांची भेट घेऊन या संपूर्ण ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. भारतीय जनता पक्षाच्या बॉलिवूड ड्रग कनेक्शन संदर्भातील सर्व पुरावे हे राज्य सरकारतर्फे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणांकडे सोपवले होते परंतु या माहिती अन्वये एनसीबीने अद्याप चौकशी केलेली नाही. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपीक निर्मात्याचे नाव येत होते. त्या निर्मात्याची चौकशी करण्याची मागणी भाजपा नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांनी देखील केली होती. परंतु त्या दिशेने तपासच केला गेला नाही. राज्य सरकारने विनंती करुनही याचा तपास केला गेला नाही. या संदर्भात संदीप सिंह व विवेक ओबेरॉय यांचे नाव येत होते. ड्रग कनेक्शन संदर्भात बंगळूरु पोलिसांनी मुंबईत येऊन अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी छापे मारले परंतु राष्ट्रीय तपास यंत्रणांना वेळ मिळत नाही हे आश्चर्याचे आहे. (anil deshmukh reaction on Vivek Oberoi drug connection)

संबंधित बातम्या:

Anil Deshmukh | विवेक ओबेरॉयची NCB चौकशी करावी : अनिल देशमुख

Sachin Sawant | सचिन सावंतांनी घेतली अनिल देशमुखांची भेट

(anil deshmukh reaction on Vivek Oberoi drug connection)