एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; जळगाव विभागात 22 कर्मचारी बडतर्फ

| Updated on: Dec 28, 2021 | 7:48 AM

कामावर न येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता प्रशासनाकडून बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. जळगाव विभागामध्ये मंगळवारी 22 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. यामध्ये जळगाव आगारातील 8 तर भुसावळ आगारातील 14 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; जळगाव विभागात 22 कर्मचारी बडतर्फ
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

जळगाव : एसटी कामगारांचा संप चिरघळताना दिसून येत आहे. संपाची मुदत संपून देखील कामावर न येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता प्रशासनाकडून बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. जळगाव विभागामध्ये मंगळवारी 22 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. यामध्ये जळगाव आगारातील 8 तर भुसावळ आगारातील 14 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांच्या वतीने देण्यात आली आहे.

आतापर्यंत 350 कर्मचारी निलंबित

एसटी महामंडळाचे  राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून राज्यासह जळगाव जिल्ह्यात एस.टी. कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. राज्य शासनाकडून कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र तरीही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. बस कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटीची सेवा ठप्प झाली आहे. कारवाईच्या इशाऱ्यानंतर जळगाव आगारातील 35 चालक आणि 35 वाहक कामावर रुजू झाले असून, काही मार्गावरील बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जळगाव विभागातील एकूण 350 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र तरी देखील अद्यापही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनिकरण करून, एसटी कर्मचाऱ्यांना क वर्गाचा दर्जा द्यावा, ही त्यांची मुख्य मागणी आहे. सोबतच वेतनवाढ करावी, थकित वेतन मिळावे, महागाई भत्ता आणि घर भाडे भत्त्यात वाढ करावी अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत. यातील अनेक मागण्या आतापर्यंत राज्य सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. मात्र तरीदेखील एसटी कर्मचारी अद्यापही संप मागे घेण्यास तयार नसून, ते विलिनिकरणाच्या मुद्द्यावरच अडून बसले आहेत.

संबंधित बातम्या 

धाकधूक वाढली! ठाण्यातील ओमिक्रॉनबाधितांची संख्या सात वर; घाणामधून आलेल्या चार जणांना लागण

तुम्ही आयटीआर भरलात का?; जाणून घ्या आयटीआर भरण्याचे ‘हे’ महत्त्वपूर्ण फायदे

Auranagabad: ख्रिश्चन धर्माचा त्याग करून 53 जणांचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश, पैठणमध्ये नाथवंशजांच्या हस्ते स्वीकृती