गवंडयाच्या मुलाची फिनिक्स भरारी, मुलाचं यश पाहून आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदश्रु

| Updated on: Nov 17, 2022 | 11:00 AM

संपूर्ण भारतातून 30 उत्तम सैनिकांमधून जे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून विविध परीक्षांचे स्तर पूर्ण करतील अशा 12 सैनिकांची पॅरा कमांडो म्हणून निवड करण्यात येणार होती, त्यात जयदीपचा सहभाग झाला आहे.

गवंडयाच्या मुलाची फिनिक्स भरारी, मुलाचं यश पाहून आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदश्रु
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : आई-वडिलांची हालाकीची परिस्थिती आणि कष्ट यशाला गवसणी घालण्यासाठी पुरेसे असतात असं म्हंटलं जातं. याशिवाय जितना बडा संघर्ष होगा, उतनी ही शानदार जीत होगी या उक्तीचा प्रत्यय नाशिकच्या ग्रामीण भागात आला आहे. नुकतीच देशातील भारतीय सैन्य दलातील पॅरा कमांडोची यादी करण्यात आली आहे. विविध बटालियन मधील फक्त बारा जणांची यामध्ये निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिकच्या ग्रामीण भागातील एका गवंडयाचा मुलगा मराठा बटालियनच्या माध्यमातून खडतर प्रशिक्षणाच्या माध्यमातून पॅरा कमांडोच्या टीममध्ये सहभागी झाला आहे. पोरानं कष्टाचे चीज केल्याने आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदश्रु आले होते. जयदीप जाधव असं त्याचे नाव असून चांदवड तालुक्यातील वाकी खुर्द या गावचा तो रहिवासी आहेत. या निवडीनंतर गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार करत कौतुक केले आहे.

चांदवड तालुक्यातील वाकी खुर्दचे जयदीप जाधव हे भूमिपुत्र आहेत. भारतीय सैन्यदलातील अतिशय खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करत पॅरा कमांडो होण्याचा जयदीप यांनी बहुमान पटकावला आहे.

संपूर्ण भारतातून 30 उत्तम सैनिकांमधून जे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून विविध परीक्षांचे स्तर पूर्ण करतील अशा 12 सैनिकांची पॅरा कमांडो म्हणून निवड करण्यात येणार होती, त्यात जयदीपचा सहभाग झाला आहे.

हे सुद्धा वाचा

जयदीप जाधवचे वडील हे लासलगाव पंचक्रोशीत गवंडी काम करतात, आई अंगणवाडीमध्ये मदतनीस आहे, घरची परिस्थिती तशी बेताचीच असून जयदीपच्या यशाने आई वडिलांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

जयदीपच्या यशाबद्दल वाकी खुर्द येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात गावकरी, मित्रपरिवार आणि पंचक्रोशीत लोकप्रतिनिधी यांनी कौतुक करत सत्कार केला आहे.