महामार्गावरून ती जात होती, वाहनाची धडक बसली, वनविभागाने प्रयत्न केले पण घडली दुर्दवी घटना

| Updated on: Nov 19, 2022 | 1:04 PM

नाशिक परिसरात महामार्गावर विविध ठिकाणी वाहने हळू चालवा, बिबट्याचा वावर असल्याचे फलक लावण्यात आले असले तरी वाहनांची नेहमीच बिबट्याला धडक दिल्याच्या घटना समोर येतात.

महामार्गावरून ती जात होती, वाहनाची धडक बसली, वनविभागाने प्रयत्न केले पण घडली दुर्दवी घटना
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे मंदिरांची नगर, वाईन सिटी अशा वेगवेगळ्या नावाने नाशिक ओळख असतांना आता लेपर्ड सिटी म्हणून नवी ओळख बनत आहे. बिबट्याचा वावर वाढत चालला असल्याने महामार्गावर बिबट्याला वाहनांकडून धडक दिल्याच्या घटना समोर येत आहे. मागील आठवड्यात नाशिकच्या औरंगाबाद महामार्गावरील चितेगाव फाट्याजवळ मादी बिबटला वाहनाने धडक दिली होती, त्यात मादी बिबट गंभीर जखमी झाली होती. ही घटना ताजी असतांनाच मुंबई-आग्रा महामार्गावर वाडीवऱ्हेजवळ शुक्रवारी रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान बिबट मादी रस्ता ओलंडत असतांना गंभीर जखमी झाली होती. वनविभागाची रेस्क्यू टीम आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. साडे तीन वर्षांची मादी गंभीर जखमी झाली होती.

साडे तीन वर्षांची बिबट मादीला वाडीवऱ्हे या शिवारात एका अज्ञात वाहनाने धडक दिली होती, मादी बिबट मुक्त संचार सुरू असतांना महामार्गावरून बिबट मादी दुसऱ्या बाजूला जात होती.

गौळाणे, रायगडनगर, वाडीवऱ्हे या शिवारात महामार्गावर बिबट्याचा रात्रीचा संचार असतो , या परिसरात बिबट्याचा आदिवास असल्याने संपूर्ण परिसर कॉरिडोर म्हणून घोषित केला आहे.

हे सुद्धा वाचा

नाशिक परिसरात महामार्गावर विविध ठिकाणी वाहने हळू चालवा, बिबट्याचा वावर असल्याचे फलक लावण्यात आले असले तरी वाहनांची नेहमीच बिबट्याला धडक दिल्याच्या घटना समोर येतात.

बिबट्यांसाठी हा 10-15 किलोमीटर चा परिसर ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जात असून शुक्रवारी देखील बिबट्याला वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

वन विभागाने रेस्क्यू टीमसह बिबट मादीला उपचारासाठी हलविले होते, मात्र, धडक जोरात असल्याने तासाभरानंतर बिबट मादीचा मृत्यू झाला असून हळहळ व्यक्त केली जात आहे.