वर्धा जिल्ह्यात आजपासून कडक निर्बंधात काहीशी शिथिलता, पॉझिटीव्हिटी रेट जास्त असलेल्या भागात मात्र निर्बंध कायम

| Updated on: Jun 01, 2021 | 12:37 PM

वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शहर आणि ग्रामीण भागासाठी काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्याचे आदेश जारी केले आहेत ( Lockdown restrictions relaxed).

वर्धा जिल्ह्यात आजपासून कडक निर्बंधात काहीशी शिथिलता, पॉझिटीव्हिटी रेट जास्त असलेल्या भागात मात्र निर्बंध कायम
Corona
Follow us on

वर्धा : कोव्हिड रुग्णसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यात निर्बंध शिथिल (Lockdown restrictions relaxed) करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. त्यानंतर वर्ध्याच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शहर आणि ग्रामीण भागासाठी काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार पॉझिटीव्हिटी रेट जास्त असलेल्या शहरांकरिता वेगळे आणि उर्वरित भागाकरिता वेगळे नियम आहेत (Lockdown restrictions relaxed in Wardha district).

आदेशानुसार, वर्धा नगरपालिका तसेच जवळच्या 11 ग्रामपंचायती, पुलगाव आणि लगतच्या दोन ग्रामपंचायती, हिंगणघाट नगरपालिका आणि जवळच्या चार ग्रामपंचायती क्षेत्रामध्ये सर्व अत्यावश्यक वस्तू आणि सेवा यांची दुकाने सोमवार ते शुक्रवार या दिवशी सकाळी 7 ते दुपारी 1 या कालावधीत सुरु राहणार आहे. तर इतर सर्व सेवा दुकाने सोमवार, मंगळवार, बुधवार या तीन दिवस सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरु राहतील.

जिल्ह्यातील उर्वरीत भागात सर्व अत्यावश्यक आणि इतर सेवा वस्तू दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र स्वतंत्र, एकल दुकान, मॉल्स आणि शॉपिंग सेंटर यांना निर्बंध शिथिल राहणार नाही. याशिवाय हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, शिवभोजन थाळी यांची घरपोच आणि पार्सल सेवा सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.

कोरोना अपडेट वर्धा

वर्ध्यात गेल्या 24 तासात 1,768 चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी 40 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज 2055 जण आयसोलेशनमध्ये आहेत. तर आतापर्यंत 362384 नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवलेले आहेत. त्यापैकी 310620 जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 48,144 वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासात 367 जण कोरोनातून बरे झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या 44,686 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासात 6 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यामध्ये चार महिला तर दोन पुरुषांचा समावेश आहे.

Lockdown restrictions relaxed in Wardha district

संबंधित बातम्या :

Nagpur Corona New Rules | नागपुरात रुग्णसंख्येत घट, 1 जूनपासून नवी नियमावली, काय बंद काय सुरु ?

दिव्यांगांना लसीकरण केंद्राबाहेर ताटकळत राहायची गरज नाही, नागपुरात स्वतंत्र लसीकरण केंद्र