आज शनिवार दिनांक 6 ऑगस्ट जाणून घेणार आहोत राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी. आज देखील राज्याच्या राजकारणात काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात. आजपासून दोन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे देखील दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्येच मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच गेले काही दिवस राज्यातून अचानक गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. राज्याच्या काही भागात रिमझिम ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. पावसाचे अपडेट्स देखील आपण जाणून घेणार आहोत.
विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी प्रसन्ना बिदरी यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्विकारला.
प्रभारी विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडून त्यांनी पदभार स्विकारला.
प्रतिक, उर्फ सनी राजेंद्र पवार या तरुणावर गुरुवारी झाला होता हल्ला
हल्ल्याप्रकरणात चौघांना अटक
अहमदनगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची माहिती
घडलेल्या घटनेची चौकशी सुरू असल्याची पोलिसांकडून माहिती
सनी पवार याच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात सुरू आहेत उपचार
युपीएच्या काळात अनेक महत्त्वाची कामं झाली – थोरात
रोजगार,बालहक्क,अन्न सुरक्षा कायद्यांबाब महत्त्वाचे निर्णय घेतले – थोरात
सध्या सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न – थोरात
दूध,दही यांच्यावरही कर लावला
बाळासाहेब थोरात यांची केंद्र सरकारवर जोरदार टीका
सध्या देशात लोकशाही राहते की नाही अशी परिस्थिती – थोरात
काँग्रेस हा फक्त पक्ष नाही तर विचारधारा – थोरात
आज विचारधारेलाच दिवस कठीण आले आहेत – थोरात
अडीच वर्ष जम्बो मंत्रिमंडळ पण काही उपयोग झाला नाही
पूर्वीच्या मंत्रिमंडळाने जे काम केले नाही ते दोन मंत्री असलेलं सरकार करत आहे
सरकारमध्ये केवळ दोनच मंत्री असले तरी घटनेची दखल तातडीने घेतली जाते
मंत्रिमंडळ विस्तारावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
नितेश राणेंची पत्रकार परिषद लाईव्ह
अमरावती कोल्हे प्रकरणासारखी घटना नगरच्या कर्जतमध्ये घडली
भाजप आमदार नितेश राणेंचा आरोप
मविआचं सरकार आता रहिलेलं नाही – नितेश राणे
कर्जमधील पोलिसांकडून प्रकरण दाबण्यााचा प्रयत्न – नितेश राणे
असे हल्ले वारंवार होत असतील तर आमचेही हात बांधलेले नाहीत – राणे
हिंदूंचा अपमान आता सहन केला जाणार नाही – राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाने झोडपले असून, कणकवली – बावशी गावात घर पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पाणी साचल्याने कणकवली- वरवडे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रात्रीपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे.
अडीच वर्षांत महाराष्ट्राला उद्धव ठाकरेंनी बुडवलं
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
ठाकरेंनी भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसला – राणा
संजय राऊतांचा आवाज स्वतःच्या स्वार्थासाठी
नवनीत राणांचा संजय राऊतांवरही निशाणा
चंद्रकांत खैरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय – संजय शिरसाट
चंद्रकांत खैरेंच्या आरोपांना संजय शिरसाट यांचे प्रत्युत्तर
लोकांनी एकनाथ शिंदेंची भूमिका स्विकारली
जनतेचा शिंदे यांच्यावर विश्वास – संजय शिससाट
मंत्र्यांचे अधिकार सचिवांना देणं म्हणजे महाराष्ट्राचं दुर्दैव
राज्य सरकारच्या निर्णयावर अजित पवारांचं टीकास्त्र
मंत्रीमंडळाचा विस्तार करण गरजेचं – अजित पवार
अमित ठाकरे इगतपुरीत दाखल
अमित ठाकरे यांचे जोरदार स्वागत
थोइयवच वेळात विद्यार्थ्यांशी साधणार संवाद
चंद्रकांत खैरे यांनी वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतमध्ये शिंदे गटाला मिळालेल्या विजयावर जोरदार निशाणा साधला आहे. शिंदे गटाला भरपूर रसद मिळाली, रसद वापरून शिंदे गटाने ग्रामपंचायतमध्ये विजय मिळवला. शिंदे गटाने ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार पळवले त्यामुळे त्यांचा विजय झाल्याचा आरोप खैरे यांनी केला आहे.
ईडीच्या कारवाया शिवसेनेवरच झाल्या असं नाही
काँग्रेसच्या काळात काँग्रेस नेत्यांच्याही चौकशा सुरू होत्या
आमच्या लोकांवर कारवाई झाली तेव्हा आम्ही कायद्याने लढलो
मात्र शिवसेनेतील लोक तोंडाने लढतात
ईडीची कारवाई कायद्याने झाली असून, त्यामागे राजकारण नाही
संजय राऊत प्रकरणावर रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया
गोरेगाव पत्राचाळ प्रकरण
संजय राऊतांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न – सुनिल राऊत
संजय राऊत बाळासाहेबांचे निष्ठावान शिवसैनिक – सुनिल राऊत
संजय राऊत भ्रष्टाचार करणे शक्य नाही – सुनिल राऊत
भंडारा जिल्ह्यात महिलेवर सामूहिक अत्याचार
मदत करण्याच्या बहान्याने आरोपींचा महिलेवर अत्याचार
दोन संशयित आरोपींना अटक, एक फरार
नागपुरातील एका रुग्णालयात पीडितेवर सुरू आहे उपचार
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत इडी चौकशीसाठी रवाना
वर्षा राऊत आणि संजय राऊत यांची समोरासमोर चौकशी होण्याची शक्यता
ईडीचे पत्राचाळ घोटाळा प्रकरणी वर्षा राऊत यांना समन्स
वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून कोट्यावधीचे व्यवहार झाल्याचा ईडीचा आरोप आहे.
आज ईडी करणार चौकशी
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार यांचा कोकण दौरा लांबणीवर
7 ऑगस्टपासून अजयकुमार होते रत्नागिरी, सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर
मात्र दौऱ्याला तुर्तास स्थगिती
आता दहा ऑगस्टपासून केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या कोकण दौऱ्याला सुरुवात
पिंपरी चिंचवडमध्ये स्वाइन फ्ल्यूची साथ आल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या आठ दिवसांत तब्बल 14 जणांना स्वाइन फ्ल्यूची लागण झाली आहे. तर दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून, योग्य ते खबरदारीचे उपाय राबवण्यास सुरुवात झाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यातून मुंबई इयरपोर्टकडे रवाना
फडणवीस यांचा एकनाथ शिंदेंसह दोन दिवसांचा दिल्ली दौरा
राज्यपाला भगतसिंह कोश्यारिही जाणार दिल्लीला
संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांची आज ईडीकडून चौकशी
वर्षा राऊत आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहणार
सकाळी 11 वाजता वर्षा राऊत बेलार्ड पियर येथील ईडी कार्यालयात पोहोचणार
ईडीने चौकशीला उपस्थित राहण्यासाठी समन्स
माधुरी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यामधील बँक व्यवहारांबाबत चौकशी
धुळे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील कुमार नगर परिसरात करण्यात आलेल्या गोळीबारात तरुणाचा मृत्यू झाला आहे. चिनू उर्फ चंदन राजेंद्र पोपली असे मृत तरुणाचे नाव आहे. आर्थिक कारणावरून तरुणाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
राज्यातील मंकीपॉक्सचे 17 संशयित निगेटिव्ह
एन.आय व्ही. पुणे, कस्तुरबा रुग्णालयात संशयित रुग्णांच्या नमुन्यांची तपासणी
तपासणीनंतर सर्व नमुने निगेटिव्ह असल्याची नोंद
पश्चिम विदर्भातल्या 27 मध्यम प्रकल्पांपैकी दहा प्रकल्प ओव्हरफ्लो
तर दोन प्रकल्पांमध्ये 95 टक्क्यांच्यावर जलसाठा
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरण 87 टक्के भरले
पश्चिम विदर्भात अकोला ,अमरावती यवतमाळ, बुलढाणा, वाशीम जिल्ह्यात एकूण 27 लघुप्रकल्प
नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूची दहशत वाढली असून, आतापर्यंत 75 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 46 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत स्वाईन फ्लूमुळे 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आकडेवारीतून समोर आली आहे. एकीकडे कोरोनाचं संकट कमी झालं नसताना दुसरीकडे आता जिल्ह्यात स्वाईन फ्लूची साथ आल्याने नागपूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे.
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान
सकाळी नऊ वाजल्यापासून होणार मतदानाला सुरुवात
एनडीएकडून जगदीप धनखड आणि यूपीएकडून मार्गारेट अल्वा या उमेदवार
राष्ट्रपतीपदासाठी भाजपला पाठिंबा देणाऱ्या शिवसेनेचा उपराष्ट्रपतीपदासाठी अल्वा यांना पाठिंबा