लहान मुलांनाही कोरोनाचा वाढता धोका, राज्यात कोव्हिडग्रस्त चिमुरड्यांची संख्या दीड लाखांवर

| Updated on: May 07, 2021 | 12:22 PM

यंदा अनेक बालक हे घराबाहेर खेळत आहे. त्यामुळे त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत आहे. (Maharashtra children Corona infection increase)

लहान मुलांनाही कोरोनाचा वाढता धोका, राज्यात कोव्हिडग्रस्त चिमुरड्यांची संख्या दीड लाखांवर
small child corona
Follow us on

मुंबई : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान बालकांना विळखा घातला आहे. राज्यात आतापर्यंत 1 लाख 47 हजार बालकांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे यात सर्वाधिक 75 हजार मुलं गेल्या दोन महिन्यात संक्रमित झाले आहेत. (Maharashtra young children Corona infection increase)

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात दर दिवशी साधारण 500 लहान मुलांना कोरोनाची लागण होत आहे. राज्यात 11 ते 20 वर्षांचे 3 लाख 33 हजार 926 बालके आणि तरुणांना कोरोना झाला आहे. तर राज्यात 1 ते 10 वर्षांच्या 1 लाख 47 हजार 420 मुलं कोरोनाबाधित झाले आहेत.

घराबाहेर खेळल्याने संक्रमणाचे प्रमाण वाढल्याची शक्यता

कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतही लहान मुलांमध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्यावर्षी 0 ते 10 वर्ष वयाचे 11,080 मुले कोरोना संक्रमित आढळले आहेत. त्यातील 17 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.5 ते 2 टक्के जास्त आहे. तसेच ज्या बालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यातील अनेकांना न्युमोनिया होता. तर यंदा अनेक बालक हे घराबाहेर खेळत आहे. त्यामुळे त्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होत आहे.

मुंबईतील प्रसिद्ध रुग्णालयांची स्थिती काय?

दरम्यान मुंबईतील वाडिया रुग्णालयात मार्च आणि एप्रिल महिन्यात 5 मुलांचा मृत्यू कोरोनामुळे झाला होता. यात 2020 मध्ये केवळ 3 मुलांचे कोरोनामुळे निधन झाले होते. पहिल्या लाटेमध्ये म्हणजेच मे-जून 2020 दरम्यान 76 मुलं संक्रमित झाले होते. तर दुसऱ्या लाटेमध्ये 103 मुलं कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

तर मुंबईच्या नायर रुग्णालयात 30 एप्रिलपर्यंत 43 बालकांना कोरोना झाला होता. तर एप्रिल महिन्यात 4 बालकांचा मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये 3 नवजात बालकांचा समावेश होता. तर एकाचे वय 11 वर्षे होते. मृतांमध्ये 9 महिन्याच्या बालकाचाही समावेश होता. महालक्ष्मीमध्ये एसआरसीसी चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये पहिल्या बालकाचा मृत्यू मार्च महिन्यात झाला होता.

तसेच दुसऱ्या लाटेमध्येही पहिल्या लाटेप्रमाणे बालकांना कोरोनाची लागण होत आहे. सध्या दररोज 4-5 बालके रुग्णालयात दाखल होत आहेत. मात्र त्यांच्यात कोरोनाचे सौम्य लक्षण आढळतात. तात्काळ उपचार सुरू झाल्याने ते बरेही होतात. BMC आरोग्य विभागानुसार, मार्च महिन्यात 0 ते 10 वर्षांच्या 1285 आणि 11 ते 20 वर्षांचे 4045 तरुण कोरोना संक्रमित आढळले होते.

मुंबईतील कोरोनास्थिती

(Maharashtra young children Corona infection increase)

संबंधित बातम्या : 

Mumbai Model | काय आहे ‘मुंबई मॉडेल’, ज्याची सुप्रीम कोर्टानं स्तुती केली, केंद्राला दिल्लीसाठी राबवायला सांगितलं!

मुंबईकरांनो लक्ष द्या, ‘कोविन-ॲप’ नोंदणी आणि प्राप्त ‘अपॉइंटमेंट स्लॉट’नुसारच लसीकरण