शाळा 9 नंतर भरणार का ? अंमलबजावणी कधी ? शिक्षण मंत्री दिपक केसरकर काय म्हणाले ?

| Updated on: Apr 24, 2024 | 1:12 PM

महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळच्या सत्रामध्ये तर माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारच्या सत्रामध्ये भरतात. परंतु आता ही परंपरा संपणार असून शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी शाळांच्या वेळा बदलण्याची घोषणा विधीमंडळात केली होती. शाळेच्या वेळेते केलेल्या या बदलाची अंमलबजावणी कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यासंदर्भातच आता केसरकर यांनी उत्तर दिलंयं.

शाळा 9 नंतर भरणार का ? अंमलबजावणी कधी ? शिक्षण मंत्री दिपक केसरकर काय म्हणाले ?
Follow us on

महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळच्या सत्रामध्ये तर माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारच्या सत्रामध्ये भरतात. परंतु आता ही परंपरा संपणार असून शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी शाळांच्या वेळा बदलण्याची घोषणा विधीमंडळात केली होती. शाळेच्या वेळेते केलेल्या या बदलाची अंमलबजावणी कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यासंदर्भातच आता केसरकर यांनी उत्तर दिलं आहे. शाळेच्या वेळेत केलेल्या बदलाची अंमलबजावणी आता पुढच्या वर्षी सुरू होणार आहे. सकाळी लवकर उठल्यामुळे मुलांची झोप पूर्ण होणार नाही म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात काही अडचणी असतील तर आचारसंहिता संपल्यानंतर संस्था चालकांशी चर्चा करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

बदलत्या जीवनशैलीमुळे पहाटे शाळा असेल तर लहान मुलांची झोप पूर्ण होत नाही. यामुळे लहान मुलांच्या शाळांची वेळ बदलण्याची सूचना राज्यापाल रमेश बैस यांनी केली होती. येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी ९ वाजल्यानंतरच सुरू करण्यात येईल,अशी घोषणा दीपक केसरकर यांनी केली होती. त्यामुळे पहाटे लवकर उठण्याचा मुलांचा त्रास कमी होणार असून पालकानांही दिलास मिळणार आहे. पुढल्या वर्षी या निर्णयाची अंमलबाजवणी होईल, असे केसरकर यांनी नमूद केले.

तोडगा काढू

नव्या वेळापत्रकामुळे कोणकोणत्या घटकांच्या समस्या आहेत त्यांनी त्या मांडाव्यात. त्यावर निश्चितपणे तोडगा काढला जाईल असंही त्यांनी नमूद केलं. या बदलामुळे पालक, बसचालक यांच्यावर काही परिणाम होत असेल तर त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जातील. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने मला यावर बोलता येणार नाही. पण, ती संपल्यानंतर त्यांच्या समस्या ऐकून निश्चितपणे यावर तोडगा काढला जाईल असे केसरकर म्हणाले.

मोठ्या मुलांच्या शाळा सकाळच्या सत्रात भरणार ?

वर्गात जर विद्यार्थ्यांना जागा बसण्यासाठी जागा पुरणार नाही, त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकते असे निदर्शनास आणून देण्यात आले. तेव्हा ‘लहान मुलांनीच सकाळी सात वाजता का यायचं? मोठी मुले येऊ शकतात ना’ असे म्हणत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा पुरली नाही किंवा वर्गखोल्यांचे प्रश्न उपस्थित होत असेल तर मोठ्या मुलांच्या शाळा सकाळच्या सत्रात भरवू असे केसरकर म्हणाले.

पालकांच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवल्या जातील. शिक्षण पद्धतीत मोठा बदल येणाऱ्या शैक्षणिक वर्षात होईल. शासकीय शाळांमधील मुलांची वेगाने घटणाऱ्या संख्येला आळा घालावा लागेल. शासकीय शाळांचा दर्जा सुधराव्या लागतील मग मुलांची सख्या वाढेल, असेही केसरकर यांनी नमूद केलं.

शालेय शिक्षण विभागात चोरी प्रकरण

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या बँक खात्यातून 47 लाख रुपये बेकायदेशीरपणे काढण्यात आले आहेत. त्यासंदर्भातही केसरकर यांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा ‘ हे पैसे शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून गेलेले नाहीत तर क्रीडा खात्यातून गेलेले आहेत. दोन्ही खात्याचे वेगवेगळे मंत्री आहेत. बोगस चेक व सह्या करून रक्कम वळविली आहे. अशी रक्कम जर वळवली असेल तर त्याला बँक भरपाई करत असते. मात्र हा गुन्हा आहे तो दाखल झालेला आहे त्यामुळे त्याच्यावर कारवाई होईल’ असे केसरकर यांनी स्पष्ट केलं.