Amravati Gram Panchayat Election Results 2021: रवी राणांच्या बडनेरा मतदारसंघात महाविकासआघाडीची 12 ग्रामपंचायतीवर जोरदार मुसंडी

| Updated on: Jan 18, 2021 | 2:06 PM

Maharashtra gram panchayat election results 2021 : अपक्ष आमदार रवी राणा यांच्या बडनेरा मतदारसंघात महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारली आहे. (MVA Ravi Rana Badnera)

Amravati Gram Panchayat Election Results 2021: रवी राणांच्या बडनेरा मतदारसंघात महाविकासआघाडीची 12 ग्रामपंचायतीवर जोरदार मुसंडी
रवी राणा
Follow us on

अमरावती: अपक्ष आमदार रवी राणा यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. बडनेरा मतदारसंघात महाविकास आघाडीनं जोरदार मुसंडी मारलीय. भातुकली तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींपैकी 12 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. (Maharashtra gram panchayat election results 2021 MVA wins 12 Gram Panchayat in Badnera constituency of Ravi Rana)

बडनेरा मतदार संघात महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी

बडनेरा विधानसभा मतदारसंघात अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या वर्चस्वाला जोरदार धक्का बसला आहे. भातुकली तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींपैकी 12 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीनं मिळवलेला विजय अपक्ष आमदार रवी राणा यांना जबर धक्का मानला जात आहे. आमदार रवी राणा यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या गावांमध्ये महाविकास आघाडीचा कब्जानं केला आहे.

यशोमती ठाकूर यांच आपल्या गावात वर्चस्व कायम

राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या गावातील सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवलं आहे. अमरावती जिल्हात ग्रामपंचायत निवडणूकीत मोझरी गावाच्या निवडणूकीकडे सर्वांच लक्ष लागले होते. कारण, मोझरी गाव हे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच गाव आहे. या मोझरी गावात यशोमती ठाकूर यांच्या ग्रामविकास पॅनलने 13 पैकी 7 जागा जिकंल्या. त्यामुळे मोझरी गावात मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा केला गेला. मात्र, यावेळी यशोमती ठाकूर यांच्या गटाला सत्ता काबीज करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला.

भाजपा आमदार प्रताप अड्सड यांना धक्का बसला असून सावंगा विठोबा येथे काँग्रेसचे अमोल होलेप्रणित पॅनल 7 पैकी 7 जागी विजयी झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितिन गोंडाने यांना जबर धक्का बसला आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितिन गोंडाने यांच्या गावात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. पाळसखेळ गावात भाजपने 9 जागेवर मिळवला विजय तर काँग्रेस फक्त 2 विजयी झाले.

संबंधित बातम्या:

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | भादली ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निकाल, तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटीलवर गुलाल

अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : हिवरेबाजारमध्ये पोपटराव पवारांची सत्ता कायम, आदर्श ग्राम पॅनलचा दणदणीत विजय

(Maharashtra gram panchayat election results 2021 MVA wins 12 Gram Panchayat in Badnera constituency of Ravi Rana)