Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra LIVE | महाबळेश्वरच्या वाई मतदारसंघात 6 ग्रामपंचायतींपैकी 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा काँग्रेस आणि शिवसेना, भाजपचा धुव्वा

| Updated on: Jan 18, 2021 | 10:59 PM

Maharashtra Grampanchayat nivadnuk nikal 2021 : महाराष्ट्र ग्राम पंचायत निवडणूक निकालाचे सुपरफास्ट अपडेट पाहा लाईव्ह.

Gram Panchayat Election Results 2021 Maharashtra LIVE | महाबळेश्वरच्या वाई मतदारसंघात 6 ग्रामपंचायतींपैकी 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा काँग्रेस आणि शिवसेना, भाजपचा धुव्वा
ग्रामपंचायत निवडणूक निकाल LIVE

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 Latest News and Updates: महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर होत आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या.  या सर्व ग्रामपंचायत निवडणुकांची मतमोजणी होते आहे. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. राज्यातील पहिला निकाल सकाळी पावणे नऊच्या सुमारास जाहीर झाला. हातकणंगले तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांच्या पॅनेलने पाडळी गावात विजय मिळवला. (Gram Panchayat Election Results 2021 Live updates).

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Jan 2021 10:51 PM (IST)

    जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या उमेदवाराचा रावेरमध्ये विजय

    जळगाव : नाशिक जेलमध्ये असलेला उमेदवार रावेर तालुक्यातील बक्षिपुर ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाला आहे. स्वप्नील मनोहर महाजन या उमेदवाराने जेलमधून निवडणूक लढली होती. रावेर शहरात जनता कर्फ्यूवेळी दोन गटात झालेल्या दंगलीमध्ये बक्षिपुर येथील माजी सरपंच स्वप्नील महाजन हे अटक झाले होते. तेव्हापासून ते जेल मध्येच आहेत. त्यांच्या भावाने त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

  • 18 Jan 2021 10:45 PM (IST)

    पुणे जिल्ह्याची तालुकानिहाय आकडेवारी

    मावळ तालुका

    57/57 (जाहीर निकाल/एकूण ग्रामपंचायतती)

    काँग्रेस-00

    राष्ट्रवादी काँग्रेस-28

    भाजप-25

    मनसे-02

    स्थानिक आघाडी-02

    आंबेगाव तालुका

    29 /29 ( जाहीर निकाल/एकूण ग्रा.पंचायती )

    काँग्रेस -00 राष्ट्रवादी -16 शिवसेना,08 भाजप -00 मनसे -00 स्थानिक आघाडी -05 महाविकास आघाडी 00

    शिरूर तालुका

    71/71 (जाहीर निकाल/ एकूण ग्रा.पंचायती)

    राष्ट्रवादी-45

    भाजप-19

    शिवसेना-05

    मनसे -00

    काँग्रेस-00

    स्थानिक आघाडी -02

    खेड तालुका

    90/90( जाहीर निकाल/एकूण ग्रा.पंचायती )

    काँग्रेस -02 राष्ट्रवादी -29 शिवसेना-15 भाजप-31 मनसे-01 स्थानिक आघाडी-12

  • 18 Jan 2021 10:40 PM (IST)

    महाबळेश्वरच्या वाई मतदारसंघात 6 ग्रामपंचायतींपैकी 4 ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा

    महाबळेश्वर : राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असणाऱ्या सातारा जिल्हयातील वाई विधानसभा मतदारसंघात महाबळेश्वर पश्चिम तालुक्यात शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय शेलार यांनी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकांमध्ये चांगलीच मुसंडी मारली आहे. तालुका प्रमुख संजय शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाबळेश्वर पश्चिम तालुक्यातील एकूण 6 ग्रामपंचायतीपैकी 4 ग्रामपंचायतीवर शिवसेना पक्षाचा झेंडा फडकला आहे. यामध्ये 17 सदस्य शिवसेना पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेले आहेत. पहिल्या टप्प्यात महाबळेश्वर पश्चिम तालुक्यात एकूण 26 ग्रामपंचायतीपैकी 20 ग्रामपंचायती या बिनविरोध निवडून आल्या होत्या. यामध्येही शिवसेना पक्षाने 15 ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवत बाजी मारली होती.

    आज ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा निकाल जाहीर होताच शिवसेना पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेल्या 4 ग्रामपंचायतीमधील तसेच बिनविरोध झालेल्या शिवसेनेच्या 15 ग्रामपंचायतीमधील सर्व सदस्यांनी जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र कुंभारदरे, डी. एम. बावळेकर, हरिभाऊ सकपाळ यांची भेट घेतली.

  • 18 Jan 2021 10:18 PM (IST)

    कोल्हापुरात राष्ट्रवादीची 134 ग्रामपंचायतींवर मुसंडी, त्यापाठोपाठ काँग्रेस आणि शिवसेना, भाजपचा धुव्वा

    कोल्हापूर : कोल्हापुरात राष्ट्रवादीची 134 ग्रामपंचायतींवर मुसंडी, त्यापाठोपाठ काँग्रेसला 102 ग्रामपंचायतींवर विजय, शिवसेनेचा 68 ग्रामपंचायतींवर विजय तर भाजपचा धुव्वा

    433/433

    राष्ट्रवादी : 134

    काँग्रेस: 102

    स्थानिक आघाडी : 72

    शिवसेना ; 68

    भाजप :39

    जनसुराज्य : 18

  • 18 Jan 2021 10:03 PM (IST)

    भिवंडी : विजयी उमेदवारांवर उधळला JCB मधून गुलाल

    भिवंडी : विजयी उमेदवारांवर उधळला JCB मधून गुलाल, खारबाव या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विरोधातील शिवसेना, भाजपा, मनसे आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा पराभव करत सर्व 11 जागा निवडून एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांकडून खारबाव गावात राष्ट्रवादी पॅनलचे प्रमुख महेंद्र पाटील आणि विजयी उमेदवारांवर JCB मधून गुलाल उधळून जल्लोष साजरा केला आहे

  • 18 Jan 2021 09:19 PM (IST)

    चंद्रपुरात 50 तर गोंदियात 20 ग्रामपंचायतींवर घवघवीत विजय, भाजपच्या गडात शिवसेनेला चांगलं यश

    भाजपच्या गडात शिवसेनेचंही चांगलं यश

    - चंद्रपूर, गोंदिया, भंडाऱ्यात शिवसेनेची मुसंडी

    - चंद्रपूर, गोंदिया, भंडाऱ्यात सेनेच्या ग्रामपंचायती वाढल्या

    - सेनेनं कॅबिनेटमंत्री एकनाथ शिंदेंकडे सोपवली होती जबाबदारी

    - चंद्रपूर जिल्ह्यात 50 ग्रामपंचायतीत सरपंच बसवणार'

    - 'गोंदिया जिल्ह्यात 20 ग्रामपंचायतीत सरपंच बसवणार'

    - संपर्कमंत्री एकनाथ शिंदेंच्या रणनितीचा सेनेला फायदा

    - चंद्रपूर जिल्ह्यात गेल्यावेळेस सात गावात होती सेनेची सत्ता

    - गेल्या निवडणूकीच्या तुलनेत सेनेला मोठा फायदा

  • 18 Jan 2021 08:32 PM (IST)

    सांगलीत मन सुन्न करणारी घटना, क्रिकेट खेळताना उमेदवाराचं निधन, मृतक अतुल पाटील यांचा विजय जाहीर

    सांगतील मन सुन्न करणारी घटना घडली आहे. सांगलीच्या ढवळी ग्रामपंचायत निवडणुकीचे उमेदवार अतुल पाटील यांचा काल रविवारी (17 जानेवारी) क्रिकेट खेळताना मृत्यू झाला. त्यांना अचानक हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यानंतर आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात त्यांच्या विजय झाल्याची माहिती समोर आली

  • 18 Jan 2021 07:55 PM (IST)

    उस्मानाबाद : ग्रामपंचायत सदस्यांचे प्रशिक्षण शिबिर घेणार, शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांची घोषणा

    उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनासह महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. महाविकास आघाडीतून निवडून आलेल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यऱ्यांना आगामी काळात ग्रामपंचायतीचा विकास करण्यासाठी कारभार कसा चालवावा आणि सर्व शासकीय योजनांची माहिती होण्यासाठी प्रशिक्षण घेणार असल्याचे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जाहीर केले आहे.

    निवडून आलेल्यांमध्ये अनेक सदस्य हे नवीन आणि पहिल्यांदा निवडून आले आहेत. त्यांना कारभार कळावा यासाठी हे प्रशिक्षण दिले जाणार असून या माध्यमातून गावचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची आर्थिक मागासलेपणाची ओळख पुसली जाणार आहे. सिंचनासह अन्य मुद्यांवर भर देणार असल्याचे खासदार ओमराजे यांनी सांगितले.

  • 18 Jan 2021 07:47 PM (IST)

    अहमदनगर जिल्ह्याची सविस्तर आकडेवारी, कोणत्या तालुक्यात कुणी बाजी मारली ?

    अहमदनगर पक्षानिहाय संख्याबळ :

    भाजप 185 शिवसेना- 125 राष्ट्रवादी -277 स्थानिक आघाडी -33 काँग्रेस -147 एकूण -767

    अहमदनगर जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी, कोणत्या तालुक्यात कुणी बाजी मारली ?

    राहाता - एकुण जागा 25

    भाजप 24, स्थानिक आघाडी 01

    संगमनेर - एकुण 94 कॉग्रेस - 84 , भाजप - 10

    अकोले ‌- एकुण 52 , भाजप 32 , राष्ट्रवादी 12 , शिवसेना - 08

    राहुरी ‌- एकुण 44 राष्ट्रवादी - 35 , भाजप 09

    नेवासा - एकुण 59, शिवसेना - 52 , भाजप - 4 , राष्ट्रवादी - 3

    कोपरगाव - एकुण 29 भाजप 19 , कॉग्रेस - 1 , राष्ट्रवादी 09

    श्रीरामपुर - एकुण जागा 27 महाविकास आघाडी - 09 स्थानिक आघाडी - 20 ( भाजप + राष्ट्रवादी )

    अहमदनगर तालुकानिहाय आकडेवारी - नगर - 59 राष्ट्रवादी - भाजप - शिवसेना - काँग्रेस -

    पारनेर - 88 राष्ट्रवादी - 70 भाजप - 2 शिवसेना - 10 काँग्रेस -0 स्थानिक आघाडी - 6

    श्रीगोंदा - 59 राष्ट्रवादी - भाजप - शिवसेना - काँग्रेस -

    कर्जत - 56 राष्ट्रवादी - 33 भाजप - 7 शिवसेना - 03 काँग्रेस - 12 स्थानिक आघाडी - 1

    जामखेड - 49 राष्ट्रवादी - 40 भाजप - 09

    पाथर्डी - 78 राष्ट्रवादी - 22 भाजप - 45 शिवसेना - 02 मनसे - 02 स्थानिक आघाडी - 05

    शेवगाव - 48 राष्ट्रवादी - भाजप - शिवसेना - काँग्रेस -

  • 18 Jan 2021 07:42 PM (IST)

    जळगावात भाजप 216 तर शिवसेनेची 184 ग्रामपंचायतींवर बाजी, राष्ट्रवादीचीही मुसंडी, पक्षानिहाय संख्याबळ किती?

    जळगावात भाजप 216 तर शिवसेनेची 184 ग्रामपंचायतींवर बाजी, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसनेही 192 जागांवर मुसंडी मारली आहे.

    पक्षानिहाय संख्याबळ :

    भाजप 216 शिवसेना 184 राष्ट्रवादी काँग्रेस 192 स्थानिक आघाडी 174 काँग्रेस 14 एकूण 780

  • 18 Jan 2021 07:30 PM (IST)

    गिरीश महाजन प्रथमच मुक्ताईनगरमध्ये

    गिरीश महाजन प्रथमच मुक्ताईनगरमध्ये, साठ ते सत्तर टक्के जिल्ह्यात ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात आली असल्याचा महाजनांचा दावा, एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगर ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल पार पडला आणि संध्याकाळच्या सुमारास गिरीश महाजन मुक्ताईनगर मध्ये दाखल झाले, समाज कल्याण सभापती यांच्या मुलाच्या वाढदिवसाला आले असल्याचे गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले

  • 18 Jan 2021 07:01 PM (IST)

    गोंदियात भाजपचा सर्वाधिक 68 ग्रामपंचायतींवर विजय

    गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात १८९ पैकी १८१ ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी झाली. 7 ठिकाणी बिनविरोध निवडून आले तर १ ठिकाणी निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात आले होते.

    भाजपचा सर्वाधिक विजय

    १) भाजपा :- ६८ २) राष्ट्रवादी कॉग्रेस :- ५६ ३) काँग्रेस :- २९ ४) महा विकास आघाडी :- ११ ५ ) अपक्ष जागा १० ६ ) गोंदिया अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांचा चाबी प्यानल :- १४ जागा

  • 18 Jan 2021 06:49 PM (IST)

    रायगडमध्ये भाजप 17, तर शिवसेनेचा 11 आणि राष्ट्रवादीचा 19 ग्रामपतींवर विजय

    रायगड जिल्ह्यात 88 ग्रामपंचायत निकाल जाहीर

    शिवसेना - 11 राष्ट्रवादी 19 शेकाप - 23 भाजपा - 17 स्थानिक आघाडी - 10 महाविकास आघाडी - 6 त्रिशंकु - 1

    (पनवेल मध्ये मित्र पक्ष आघाडी. पनवेल तालुका 22 ग्रामपचांयती निवडणुका झाल्या. 13 भाजपा आणि मित्र पक्ष. 11 शेकाप आणि इतर स्थानिक आघाडी)

  • 18 Jan 2021 06:43 PM (IST)

    सोलापुरात राष्ट्रवादी अव्वल, 213 ग्रामपंचायतींवर मुसंडी!

    सोलापुरात राष्ट्रवादी अव्वल, 213 ग्रामपंचायतींवर मुसंडी

    भाजप -१७५

    शिवसेना -९७

    काँग्रेस -५०

    राष्ट्रवादी -२१३

    स्थानिक आघाडी -८७

    आरपीआय -१

    शेकाप -३०

    रा स प -१

  • 18 Jan 2021 06:39 PM (IST)

    चंद्रपुरात ईश्वर चिठ्ठीने उमेदवार विजयी

    चंद्रपूर : गोंडपीपरी तालुक्यातील विहिरगांव ग्रामपंचायतीत ईश्वर चिठ्ठीने उमेदवार विजयी झाला. वार्ड क्र. 3 मधील उमेदवारी अनुसूचित जमाती महिलाकरिता आरक्षित होती. कल्पना मडावी आणि आशा मडावी या आमने-सामने होत्या. या वार्डात एकून 117 इतके मतदान झाले. यापैकी दोघांनाही प्रत्येकी 58 मत मिळाले तर एक मत नोटावर पडले. शेवटी ईश्वरचिठीने निकाल देण्याचे ठरले. यात आशा मडावी या भाग्यवान ठरल्या.

  • 18 Jan 2021 06:35 PM (IST)

    परभणीत राष्ट्रवादीची बाजी, 168 ग्रामपंचायतींवर मजल!

    परभणी :  एकूण ग्रामपंचायत निवडणूक जाहीर 566

    मतदान प्रक्रिया घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत 498

    निकाल जाहीर 498

    काँग्रेस - 32 राष्ट्रवादी - 168 शिवसेना - 65 भाजप - 99 स्थानिक आघाडी - 128

    बिनविरोध ग्रामपंचायत 68

  • 18 Jan 2021 06:28 PM (IST)

    अशोख चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे एकहाती वर्चस्व, 151 पैकी 124 ग्रामपंचायतींमध्येे काँग्रेसचे पॅनल विजयी

    सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे एकहाती वर्चस्व, मतदारसंघातील एकूण १५१ पैकी १२४ ग्रामपंचायतींमध्येे काँग्रेसचे पॅनल विजयी

    तालुकानिहाय निकाल: भोकर ५०/६३ मुदखेड ३७/४५ अर्धापूर ३७/४३ एकूण १२४/१५१

  • 18 Jan 2021 06:26 PM (IST)

    सोलापुरात भाजप अव्वल, 140 ग्रामपंचायतींवर विजय

    सोलापूर (658 पैकी 357 )

    भाजप -140

    शिवसेना -35

    काँग्रेस -50

    राष्ट्रवादी - 87

    स्थानिक आघाडी - 44

    आरपीआय - 1

  • 18 Jan 2021 06:23 PM (IST)

    ठाण्यात भाजप 65 तर शिवसेनेला 39 ग्रामपंचायतींवर विजय

    ठाणे जिल्ह्यात 158 ग्रामपंचायती. यापैकी 143 ग्रामपंचायतीत प्रत्यक्ष मतदान

    143/143 ( जाहीर निकाल/एकूण ग्रा.पंचायती ) काँग्रेस - 01 राष्ट्रवादी - 08 शिवसेना - 39 भाजप- 65 मनसे - 01 स्थानिक आघाडी - 16 महाविकास आघाडी -19 श्रमजीवी -02 एकूण = 151+2 अंशतः बिनविरोध + 5 ग्रामपंचायतींवर बहिष्कार = एकूण = 158

  • 18 Jan 2021 06:20 PM (IST)

    'भाजप सहा हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर विजयी होईल', चंद्रकांत पाटलांचा दावा

    "14 हजार 164 गावांमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकींचे निम्मे निकाल आता समोर आले आहेत. उशिरापर्यंत निकाल येत राहतील. आतापर्यंत आलेल्या निकालांपैकी 1907 गावांमध्ये भाजपचे पूर्ण पॅनल विजयी झाले आहेत. या गावांमध्ये भाजपचा सरपंच विजयी होईल. भाजप सहा हजार पेक्षा जास्त गावांमध्ये विजयी होईल, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे", असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

    चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले?

    महाराष्ट्रात 1665 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या. यापैकी 564 ग्रामपंचायतींवर भाजपचं पूर्ण पॅनल आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदारसंघात 629 ग्रामपंचायतींपैकी 348 ग्रामपंचायतींवर भाजपने विजय मिळवला आहे. आमदार विखे पाटलांच्या मतदारसंघात 25 पैकी 24 जागा भाजपने जिंकल्या आहेत. खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 70 पैकी 50 जागांवर भाजपला यश आलं आहे.

    शरद पवारांनी दत्तक घेतलेल्या इन्कूळ गावात 9 पैकी 6 जागा भाजपने जिंकल्या. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या तळोदे ग्रामपंचायत भाजपने जिंकली. आदित्य ठाकरे यांच्या जिल्हापरिषद गटातील अंगर भाजपने जिंकली.

    जयंत पाटील यांची सासुरवाडी म्हैसाळ ग्रामपंचायत जिंकली

    कराडमध्ये अतुल बाबा भोसले यांच्या नेतृत्वात 52 पैकी 40 गाव जिंकले

    नाथाभाऊंच्या गावची ग्रामपंचायतही भाजपच्या ताब्यात

    यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात 66 पैकी 53 ठिकाणी भाजपा विजयी

    कोरोनाकाळात केलेल काम हे लोकांना भांडवल

    महाविकास आघाडीनं काहीच दिलं नाही याचा राग लोकांच्या मनात होता

    महाराष्ट्राच्या जनतेचे आभार

    पदवीधर मतदार संघात सत्तेचा दुरूपयोग झाला हे दोन दिवसात सांगेल. याबाबतचे पुरावे देणार

  • 18 Jan 2021 06:03 PM (IST)

    उस्मानाबादेतील 428 ग्रामपंचायतींपैकी 107 ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सरशी

    उस्मानाबादमधील 428 ग्रामपंचायतींपैकी 107 ग्रामपंचायतींवर शिवसेनेची सरशी, तर 144 जागांवर स्थानिक आघाडी

    शिवसेना 107 काँग्रेस 64 भाजप 63 राष्ट्रवादी 53 स्थानिक आघाडी 141

  • 18 Jan 2021 05:59 PM (IST)

    बीडमध्ये राष्ट्रवादीने गड राखला, धनंजय मुंडेंना मोठं यश

    बीड जिल्ह्यातील 139 ग्रामपंचायती साठी निवडणूक झाली. या निवडणुकीचा निकाल आता समोर आला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी बीड जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीला 39 जागांवर विजय मिलाला आहे.

    राष्ट्रवादी- 39 शिवसेना- 31 भाजप- 32 मनसे- 01 मविआ- 04 स्था.आ- 22

    एकूण ग्रामपंचायत- 129

  • 18 Jan 2021 05:14 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात काँग्रेस अव्वल

    सांगली जिल्ह्यात एकूण 152 ग्रामपंचायतची निवडणूक होती, सांगली जिल्ह्यात आजचे निकाल आणि अगोदर बिनविरोध झालेल्या मिळून एकून लागलेला निकाल, सांगली जिल्ह्यात काँग्रेस पहिल्या क्रमांकावर,

    काँग्रेस पॅनल - 49

    राष्ट्रवादी पॅनल - 34

    स्थानिक आघाडी - 34

    भाजपा पॅनल - 20

    शिवसेना पॅनल - 15

    स्थानिक आघाड्या ह्या मिश्र असल्याने प्रत्येक पक्ष यावर दावा करत आहे.

  • 18 Jan 2021 04:50 PM (IST)

    1949 पासून गाव बिनविरोध, पहिल्यांच निवडणूक, भाजपचा 7 पैकी 7 जागांवर विजय

    यवतमाळ- स्व. वसंतराव नाईक आणि स्व. सुधाकरराव नाईक या महाराष्ट्राच्या दोन मुख्यमंत्र्यांचे गाव, १९४९ पासून बिनविरोध असलेल्या गहुली या गावी प्रथमच होऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपने ७ पैकी ७ जागा जिंकल्या, गहुली ग्रामपंचायत आमदार निलय नाईक यांच्या ताब्यात ..!

  • 18 Jan 2021 04:14 PM (IST)

    लातूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : ग्रामपंचायतीसाठी काँग्रेस आणि भाजपाच्या निलंगेकर कुटुंबीयांमध्ये पुन्हा चुरस

    लातूर - निलंगा विधानसभा क्षेत्रातल्या निलंगा, देवणी आणि शिरुर अनंतपाळ तालुक्यातल्या ग्रामपंचायतीसाठी काँग्रेस आणि भाजपाच्या निलंगेकर कुटुंबीयांमध्ये पुन्हा चुरस, अरविंद निलंगेकर या निलंगेकर कुटुंबातल्या नव्या चेहऱ्याने खेचून आणल्या ग्राम पंचायती

  • 18 Jan 2021 04:06 PM (IST)

    इचलकरंजी ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकरांनी यड्राव ग्रामपंचायतमध्ये राखला गड

    इचलकरंजी - शिरोळ तालुक्यात यड्राव ग्रामपंचायतमध्ये आणली एकहाती सत्ता, आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकरांनी यड्राव ग्रामपंचायतमध्ये राखला गड, 15 पैकी 10 उमेदवार झाले विजयी, यड्रावमध्ये गटातताचे राजकारण असूनही यड्राव गट पुढे

  • 18 Jan 2021 04:02 PM (IST)

    परभणी ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : बोरी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेल विजयी

    परभणी - जिंतूर तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेल विजयी, 17 पैकी 14 जागा जिंकत , सत्ता केली हस्तगत, भाजप पुरस्कृत आघाडीला 3 जागा

  • 18 Jan 2021 04:00 PM (IST)

    सोलापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : नरखेड ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या उमेश पाटील गटाचा झेंडा

    सोलापूर - मोहोळ तालुक्यातील नरखेड ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या उमेश पाटील गटाचा झेंडा, 13 पैकी 12 जागांवर वर्चस्व तर एका प्रभागात सर्वात जास्त मतदान "नोटा"ला झाले, नरखेडमध्ये राष्ट्रवादीच्याच दोन्ही नेत्यांमध्ये होती चुरस, माजी आमदार राजन पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांच्या गटात होती लढत, चुरशीच्या लढतीत उमेश पाटील यांचा एक हाती विजय

  • 18 Jan 2021 03:59 PM (IST)

    रत्नागिरी ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : खेड तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतीवर माजी आमदार संजय कदम यांचे वर्चस्व

    रत्नागिरी - खेड तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतीवर माजी आमदार संजय कदम यांचे वर्चस्व, चिंचघर ग्रामपंचायतीत 11 पैकी 9 जागांवर कदम यांचे पॅनल विजयी, माजी आमदार संजय कदम यांचे गाव चिंचघर 11 सदस्यांची चिंचघर ग्रामपंचायत 2 जागांवर संजय कदम गटाच्या विरोधी पॅनलवर विजय

  • 18 Jan 2021 03:57 PM (IST)

    नांदेड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : कंधार तालुक्यात 3 पैकी 7 जागांवर चिखलीकर गट विजयी

    नांदेड - कंधार तालुक्यात आमदार शामसुंदर शिंदे व खासदार प्रताप पाटील चिखलीकर या दाजी-भावजी यांच्या राजकारणात हळदा ग्रामपंचायतीत 13 पैकी 7 जागांवर चिखलीकर गट विजयी

  • 18 Jan 2021 03:57 PM (IST)

    Kagal Gram Panchayat result : कागल तालुक्यातील प्रत्येक गावाचा निकाल

    कागल तालुका गाववार निकाल  

    केनवडे - महाआघाडी - 06, राजे - 03 सावर्डे बुद्रुक महाआघाडी - 04, राजे - मुश्रीफ - 06, इतर - 01 वाळवे खुर्द - मांडलिक, राजे - 05, महाआघाडी - 04 म्हाकवे - संजय घाडगे, राजे, मुश्रीफ - 07, मंडलिक, मुश्रीफ - 06 पिंपळगाव बुद्रुक - महाआघाडी - 06, राजे - 03 सोनाली - मंडलिक, राजे, संजय घाडगे - 08, मुश्रीफ - 03, बिद्री - महाआघाडी - 08, राजे - 03 उंदरवाडी - महाआघाडी - 08, इतर - 01 कुरणी - मंडलिक, राजे - 05, मुश्रीफ, संजय घाडगे, प्रवीण पाटील - 04 भडगाव - महा आघाडी - 09, राजे - 00 मळगे बुद्रुक - महाआघाडी - 07, राजे - 02 बानगे - महा आघाडी - 07, राजे व इतर - 04 कौलगे - महाआघाडी - 09, राजे - 02 चिखली - महाआघाडी - 12, राजे - 01 बस्तवडे - महाआघाडी - 09, राजे - 00 यमगे- महाआघाडी - 06, राजे, मंडलिक -05 शिंदेवाडी - राजे, मंडलिक - 08, मुश्रीफ - 01 बेनिक्रे - समविचारी आघाडी - 05, मंडलिक, मुश्रीफ - 04 खडकेवाडा - महाआघाडी -09, अपक्ष - 02 लिंगनूर कापशि - महाआघाडी - 08, राजे - 01 अर्जुनी - महाआघाडी - 09, राजे - 00 गलगले - महाआघाडी - 09, राजे - 00 मेतके - महाआघाडी - 07, राजे - 00 हळदी - अपक्ष - 05, राजे - 01, महा आघाडी - 05 करंजिवणे - महाआघाडी -07, राजे, रणजीत पाटील -02 हळदवडे - महा आघाडी - 04, मंडलिक, मुश्रीफ - 03 बेलेवाडी मासा - महाआघाडी - 08, अपक्ष - 01 बोळावीवाडी - महाआघाडी - 07, इतर - 00 मांगनूर - महाआघाडी - 09, इतर - 00 हसुर खुर्द - महाआघाडी - 09, इतर - 00 कासारी - बिनविरोध - 05, महाआघाडी - 02 आलाबाद - महाआघाडी - 08, बिनविरोध - 01 तमनाकवाडा - महाआघाडी - 07, राजे - 02 माध्याळ - महाआघाडी - 08, राजे - 03

  • 18 Jan 2021 03:56 PM (IST)

    सातारा ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : दत्तक घेतलेल्या काेंडवे ग्रामपंचायतीतच उदयनराजेंना फक्त 3 जागा

    सातारा - खासदार उदयनराजेंना माेठा धक्का, सातारा शहरालगत असलेल्या उदयनराजेंनी दत्तक घेतलेल्या काेंडवे ग्रामपंचायतीत उदयनराजे गटाला 13 पैकी केवळ 3 जागा, तर आमदार शिवेंद्रराजे गटाला 10 जागेवर विजय

  • 18 Jan 2021 03:53 PM (IST)

    औरंगाबाद ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : पती-पत्नी हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव दारुण पराभव

    औरंगाबाद - हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव पतीपत्नीचा दारुण पराभव, पिशोर ग्रामपंचायतीत झाला दारुण पराभव, 17 पैकी हर्षवर्धन जाधव यांना 4 जागा तर संजना जाधव यांना मिळाल्या 2 जागा, तर महाविकास आघाडीने मिळवला 9 जागांवर विजय, तर दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी मिळवला विजय

  • 18 Jan 2021 03:51 PM (IST)

    हिंगोली ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : 11 पैकी 9 जागेवर भाजप विजयी

    हिंगोली - वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील ग्रामपंच्यात निवडणुकीत महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती, माजी सहकार मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचं हे गाव आहे, डॉ. जयप्रकाश मुंदडा यांनी येथे स्वतः मतदान केले होतं, वसमत राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार राजू नवघरे आणि शिवसेनेचे माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचा भाजपचे जिल्हा परिषद सदस्य अवधूत शिंदे यांच्या पॅनलने पराभूत केल आहे, 11 पैकी 9 जागा भाजपच्या आल्या,  तर महाविकास आघाडीला केवळ दोन जागेवर समाधान मानावं लागलं आहे

  • 18 Jan 2021 03:47 PM (IST)

    अमरावती ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात काँग्रेसचा निसटचा विजय

    अमरावती - महिला व बालकल्याण मंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात काँग्रेसला धक्का, 29 ग्रामपंचायतींपैकी केवळ 7 ग्रामपंचायतीवर काँग्रेसची सत्ता, यशोमती ठाकूर यांच्या मोझरी गावात काँग्रेसचा निसटचा विजय, तिवसा तालुक्यातील स्थानिक आघाडीचा विजय, यशोमती ठाकूर यांच्या तिवसा मतदारसंघात पक्षीय बलाबल

    काँग्रेस -7

    स्थानिक आघाडी-16

    भाजप-3

    राष्ट्रवादी-1

    शिवसेना-2

  • 18 Jan 2021 03:44 PM (IST)

    पुणे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : 54 पैकी 30 ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसकडे, राष्ट्रवादीचा दावा

    पुणे - पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील सर्व 54 ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर, 8 ग्रामपंचायती झाल्या बिनविरोध,54 पैकी 30 ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसकडे, राष्ट्रवादीचा दावा, तर तीन ग्रामपंचायतीची एकहाती सत्ता शिवसेनेच्या हाती, संपूर्ण निकाल जाहीर, भाजपला हवेली तालूक्यात धोबीपछाड, काही ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा झेंडा

  • 18 Jan 2021 03:42 PM (IST)

    कोल्हापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : मतदानाची टक्केवारी 86 पर्यंत पोहोचली, हसन मुश्रीफांची माहिती 

    कोल्हापूर - शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची बेरीज, तीन तृतीयांश जागा, स्थानिक आघाड्यांमध्ये ही महाविकास आघाडी, महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय पचणी पडले आहेत, मतदानाची टक्केवारी 86 पर्यंत पोहोचली, एकाच प्रभागात रस्सीखेच व्हायची, पण सरपंचपदाचा आरक्षण निवडणूक निकालानंतर असल्यानं टक्केवारी वाढली, हसन मुश्रीफांची माहिती

  • 18 Jan 2021 03:39 PM (IST)

    हर्षवर्धन जाधवांच्या मुलाची आईविरुद्ध लढत, औरंगाबादच्या लढतीचा निकाल जाहीर

    औरंगाबाद : हर्षवर्धन जाधव आणि संजना जाधव पती पत्नीचा दारुण पराभव, पिशोर ग्रामपंचायतीत झाला दारुण पराभव, 17 पैकी हर्षवर्धन जाधव यांना 4 जागा तर संजना जाधव यांना मिळाल्या 2 जागा, तर महाविकास आघाडीने मिळवला 9 जागांवर विजय, तर दोन जागांवर अपक्ष उमेदवारांनी मिळवला विजय

  • 18 Jan 2021 03:37 PM (IST)

    मालेगाव ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : कृषिमंत्री दादा भुसेंच्या मतदार संघात शिवसेनेचा भगवा

    मालेगाव - कृषिमंत्री दादा भुसेंच्या मतदार संघात शिवसेनेचा भगवा फडकला, मालेगाव बाह्य मतदार संघातील 59 ग्रामपंचायतिच्या निवडणुकीत आतापर्यंत 50 ग्रामपंचायतिचे निकाल झाले जाहीर, त्यात 42 ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता

  • 18 Jan 2021 03:35 PM (IST)

    नांदेड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : कंधार तामुक्यात 11 पैकी 9 जागांवर राष्ट्रवादी विजयी

    राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले यांच्या पानभोसी गावात राष्ट्रवादीचा विजय, 11 पैकी 9 जागांवर राष्ट्रवादी विजयी

  • 18 Jan 2021 03:32 PM (IST)

    पुणे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : आमदार अशोक पवार यांना स्वतःच्या गावात धक्का, एनसीपीला फक्त तीन जागा

    शिरुर तालुक्याचे आमदार अशोक पवार यांना स्वतःच्या गावात धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या फक्त 15 पैकी 03 जागा, तर स्थानिक जनसंघर्ष पॅनलला 15 पैकी 12 जगांवर यश, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांचे शिरुर तालुक्यातील वडगांव रासाई हे गाव

  • 18 Jan 2021 03:27 PM (IST)

    चंद्रपुरात एकट्या काँग्रेसला 65 टक्के जागा, वडेट्टीवारांचा दावा

    चंद्रपूर जिल्ह्यात एकट्या काँग्रेसने 65 टक्के, तर महाविकास आघाडीच्या मिळून 75 टक्के ग्रामपंचायतीत विजय मिळाल्याचा दावा राज्याचे मदत व पुनर्वसन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलाय. आज जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल धीम्यागतीने येत आहेत. पूर्ण चित्र अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. त्यापूर्वीच वडेट्टीवार यांनी आघाडीला 75 टक्के यश मिळाल्याचा दावा केलाय. हा दावा करतानाच हा निकाल म्हणजे जनतेने महाविकास आघाडीच्या कारभाराला दिलेली पसंती आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

  • 18 Jan 2021 03:22 PM (IST)

    नांदेड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : लोहा आणि कंधार तालुक्यातील ग्राम पंचायतीवर भाजपाचा वरचष्मा

    नांदेड - लोहा आणि कंधार तालुक्यातील ग्राम पंचायतीवर भाजपाचा वरचष्मा, कंधार तालुक्यातील 12 तर लोहा तालुक्यातील 20 ग्राम पंचायातीवर भाजपचे वर्चस्व, वर्चस्व राखन्यात खासदार चिखलीकर यांना यश

  • 18 Jan 2021 03:19 PM (IST)

    नाशिक ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला लक्षणीय यश, सर्वाधिक 175 जागा

    नाशिक

    - ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला लक्षणीय यश

    - महाविकास आघाडीला 387 जागा

    - तर भाजपला 109

    - माकपला आपला गड राखण्यात यश

    - जिल्ह्यात 621 ग्रामपंचायत निवडणूक

    - यातील उमराणे ग्रामपंचायत निवडणूक रद्द

    पक्षीय बलाबल -

    राष्ट्रवादी - 164 + 11 = 175

    काँग्रेस - 50 + 5 = 55

    शिवसेना - 143 + 14 = 157

    भाजप - 109 + 7 = 116

    माकप - 8

    इतर - 98 + 11 = 109

  • 18 Jan 2021 03:16 PM (IST)

    चंद्रपूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : जिल्ह्यात एकट्या काँग्रेसचा 65 टक्के जागांवर विजय, वडेट्टीवारांचा दावा

    चंद्रपूर जिल्ह्यात एकट्या काँग्रेसचा 65 टक्के, तर महाविकास आघाडीच्या मिळून 75 टक्के ग्रामपंचायतीत विजय मिळाल्याचा दावा, राज्याचे मदत व पुनर्वसन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केला, आज जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल धीम्या गतीने येत आहेत, पूर्ण चित्र अद्याप स्पष्ट व्हायचे आहे, त्यापूर्वीच वडेट्टीवार यांनी आघाडीला 75 टक्के यश मिळाल्याचा दावा केला, हा दावा करतानाच हा निकाल म्हणजे जनतेने महाविकास आघाडीच्या कारभाराला दिलेली पसंती आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली,

  • 18 Jan 2021 03:13 PM (IST)

    औरंगाबाद ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : काँग्रेसच्या गडावर अब्दुल सत्तार यांची धडक, पालोद ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा

    काँग्रेसच्या गडावर अब्दुल सत्तार यांची धडक, पालोद ग्रामपंचायतीवर फडकला शिवसेनेचा झेंडा, काँग्रेसचे नेते प्रभाकर पालोदकर यांच्या पॅनेलचा दारुण पराभव, आमदार अब्दुल सत्तार आणि प्रभाकर पालोदकर एकमेकांचे हाडवैरी, आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला धूळ चारत ग्रामपंचायत घेतली ताब्यात

  • 18 Jan 2021 03:06 PM (IST)

    नाशिक ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : 565 ग्रामपंचायत सगळे निकाल जाहीर, 164 जागांवर राष्ट्रवादीचा झेंडा

    नाशिक जिल्हा

    565 ग्रामपंचायत सगळे निकाल जाहीर

    पक्षीय निकाल

    राष्ट्रवादी - 164

    काँग्रेस - 50

    शिवसेना - 143

    भाजप - 109

    मनसे - 0

    पक्षविरहित - 98

    टाय - 1

  • 18 Jan 2021 03:05 PM (IST)

    ठाणे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : ठाण्यात भाजपचं सर्चस्व, 44 पैकी 26 जागांवर विजय

    जिल्हा ठाणे

    मुरबाड ग्रामपंचाय जाहीर निकाल - 44

    बिनविरोध - 5

    काँग्रेस -00

    राष्ट्रवादी - 00

    शिवसेना - 00

    भाजप - 26

    मनसे -00

    स्थानिक आघाडी - 00

    महाविकास आघाडी- 13

  • 18 Jan 2021 03:00 PM (IST)

    पुणे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : मावळात भाजपचा बालेकिल्ला उधळून लावण्यात महाविकास आघाडीला यश

    मावळात भाजपचा बालेकिल्ला उधळून लावण्यात महाविकास आघाडीला यश, 57 पैकी 45 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची निर्विवाद सत्ता

  • 18 Jan 2021 02:57 PM (IST)

    हवेली ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : सोरतापवडी ग्रामपंचायतमध्ये भाजपला मोठा धक्का, राष्ट्रवादीची बाजी

    पुर्व हवेली ग्रामपंचायत अपडेट, हवेली तालुक्याच्या सोरतापवडी ग्रामपंचायतमध्ये भाजपला मोठा धक्का, राष्ट्रवादीची बाजी, विद्यमान सरपंचांच्या पॅनलचे सात उमेदवार विजयी, तर विरोधी पॅनलला आठ जागा.

  • 18 Jan 2021 02:51 PM (IST)

    नाशिक ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : लासलगाव ग्रामपंचायती पुन्हा होळकर-पाटील यांची सत्ता

    लासलगाव ग्रामपंचायतीचे सर्व 17 जागांचे निकाल जाहीर, ग्रामविकासाच्या होळकर गटाला 10 तर माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या परिवर्तन शहर विकासला 7 जागा, होळकर-पाटील यांची सत्ता लासलगाव ग्रामपंचायती पुन्हा आली

  • 18 Jan 2021 02:48 PM (IST)

    नाशिक ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : लासलगावात परिवर्तनचे संतोष पलोड विजयी

    लासलगावच्या वार्ड क्रमांक 5 मध्ये अपक्ष उमेदवार आणि परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांना 399 समान मते, एका लहान मुलीच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली, परिवर्तनचे संतोष पलोड विजयी

  • 18 Jan 2021 02:46 PM (IST)

    गोंदिया ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : 189 पैकी 90 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर

    गोंदिया जिल्हा

    एकूण ग्रामपंचायत - 189

    निकाल जाहीर- 90 ग्रामपंचायत निकाल जाहीर

    काँग्रेस - 101

    राष्ट्रवादी - 40

    शिवसेना - 20

    भाजप - 80

    मनसे - 01

    स्थानिक आघाडी - 15

  • 18 Jan 2021 02:45 PM (IST)

    नागपूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : काँग्रेस 53 जागांवर विजयी

    जिल्हा - नागपूर

    एकूण ग्रामपंचायत - 127

    काँग्रेस - 53

    राष्ट्रवादी - 21

    शिवसेना- 02

    भाजप - 29

    मनसे - 00

  • 18 Jan 2021 02:42 PM (IST)

    अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : जिल्ह्यात 767 पैकी 394 ग्रामपंचायत भाजपकडे

    अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यात 767 पैकी 394 ग्रामपंचायत भाजपकडे, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांचा दावा

  • 18 Jan 2021 02:40 PM (IST)

    भाची विरुद्ध मामी, सासू विरुद्ध सून, जाऊ विरुद्ध जाऊ, कोण जिंकलं, कोण हरलं?

    कल्याण तालुक्यातील खडवली ग्रामपंचायतीमध्ये एका प्रभागात भाची विरुद्ध मामी अशी लढत होती. या निवडणुकीत मामीला पराभूत करून भाची प्रियंका राजेश भोईर यांनी विजय मिळवला.

    धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनेक चुरशीच्या लढती होत्या परंतु शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे सासू आणि सून यांच्यात लढत पाहायला मिळाली. एकूणच तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांना या निकालाची उत्सुकता होती. आज निकाल लागल्यानंतर स्मिता चव्हाण सासूचा विजय झाला असून, त्यांना एकूण 286 मतं मिळाली आहेत. सून सुनंदा चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला. त्यांना 285 इतकी मतं पडली आहेत.

    धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातील दहिवद इथेच दोन जाऊबाईंमध्ये लढत होती. आशा रवींद्र पाटील या मोठ्या जाऊचा विजय झाला असून त्यांना एकूण 364 मत मिळाली आहेत. वृषाली पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यांना 267 इतकी मतं पडली आहेत.

    नांदेड : ग्रामपंचायत निवडणुकीत सासूबाईंनी सूनबाईंना पराभवाची धूळ चारली. सासू-सुनेच्या लढाईत सासूबाई रेखा दादजवार यांनी बाजी मारली. विशेष म्हणजे सासूबाई अवघ्या चार मतांनी वरचढ ठरल्या. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील दाभड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सासू-सून एकमेकींच्या विरोधात उभ्या ठाकल्या होत्या.

  • 18 Jan 2021 02:39 PM (IST)

    वाशिम ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : काटा ग्रामपंचायत 11 पैकी शिवसेना-काँग्रेसला 5 जागा

    वाशिम - काटा ग्रामपंचायत 11 पैकी शिवसेना 5 तर काँग्रेस 5, चार वार्डमध्ये एका जागेसाठी टाय, राजुरानंतर काटा पुन्हा दुसरी ग्रामपंचायत ईश्वर चिट्ठी विजयी होणार

  • 18 Jan 2021 02:34 PM (IST)

    सोलापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : भाजप खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या गौडगावात काँग्रेसची सत्ता

    सोलापूर- भाजप खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या गौडगावात काँग्रेसची सत्ता, सात पैकी पाच जागांवर काँग्रेसला विजय, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या गटाने मिळविला विजय

  • 18 Jan 2021 02:31 PM (IST)

    कल्याण ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : संगोडा कोढेरी ग्रामपंचायतीत दोन उमेदवारांना समसमान मते

    कल्याण - संगोडा कोढेरी ग्रामपंचायतीत दोन उमेदवारांना समसमान मते, दोघांना 184 मते,

    भरत जयराम केने - शिवसेना

    कल्पेश पाटील - भाजप

  • 18 Jan 2021 02:29 PM (IST)

    अमरावती ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : चांदुर रेल्वे तालुक्यात भाजपचे विद्यमान आमदार प्रताप अडसळ यांना धक्का

    चांदुर रेल्वे तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व, भाजपचे विद्यमान आमदार प्रताप अडसळ यांना धक्का, तालुक्यातील 29 ग्रामपंचायतींपैकी 16 ग्रामपंचायतीवर काँग्रेस विजय, भाजपणे तालुक्यात जिंकल्या 12 ग्रामपंचायती, तालुक्यातील येरड ग्रामपंचायत बिनविरोध

  • 18 Jan 2021 02:27 PM (IST)

    बुलडाणा ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : शिवसेनेचा सर्वाधिक 54 जागांवर विजय

    बुलडाणा जिल्हा

    एकूण ग्रामपंचायत - 498

    निकाल जाहीर- 187 ग्रामपंचायत निकाल जाहीर

    काँग्रेस - 26

    राष्ट्रवादी - 31

    शिवसेना - 54

    भाजप - 24

    मनसे - 02

    स्थानिक आघाडी - 22

  • 18 Jan 2021 02:25 PM (IST)

    बीड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : माजलगावात राष्ट्रवादीला धक्का, चार ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व

    बीड : माजलगावात राष्ट्रवादीला हाबाडा, चार ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व, राष्ट्रवादीच्या ताब्यात एकही ग्रामपंचायत नाही, आमदार प्रकाश सोळंके यांना धक्का

  • 18 Jan 2021 02:24 PM (IST)

    सिंधुदुर्ग ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : सावंतवाडी मतदार संघातही भाजपची मुसंडी

    सिंधुदुर्ग - सावंतवाडी मतदार संघातही भाजपची मुसंडी, 16 ग्रामपंचाती पैकी भाजपकडे 10 ग्रामपंचायती मधे सत्ता, तर शिवसेनेकडे फक्त 06 ग्रामपंचायतीत विजय, माजी राज्यमंत्री दिपक केसरकर यांना भाजपने दिला धोबीपछाड.

  • 18 Jan 2021 02:20 PM (IST)

    नंदुरबार ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : 35 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचं वर्चस्व

    नंदुरबार जिल्ह्यातील निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायत 87

    निकाल जाहीर झालेल्या ग्रामपंचायत 86/86

    निवडणूक रद्द झालेली ग्रामपंचायत - 01

    शिवसेना - 18

    काँग्रेस - 35

    राष्ट्रवादी - 10

    भाजपा - 21

    स्थानिक आघाडी- 02

    ग्रपांचायात पंचायत निवडणुकीत 35 ग्रामपंचायत जिंकत काँग्रेसने आपल वर्चस्व दाखवून दिले आहे.

  • 18 Jan 2021 02:18 PM (IST)

    नांदेड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : शिवसेना नेते गंगाधर पाटील चाभरेकर यांच्या पॅनलचा पराभव

    नांदेड : जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते गंगाधर पाटील चाभरेकर यांच्या पॅनलचा पराभव; काँग्रेसचे हदगाव तालुकाध्यक्ष आनंदराव भंडारे यांच्या पॅनल 13 पैकी 8 जागा, तर चाभरेकर गटाला 5 जागा

  • 18 Jan 2021 02:16 PM (IST)

    धुळे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे मोठ्या जावेचा विजय

    धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनेक चुरशीच्या लढती होत्या, परंतु शिरपूर तालुक्यातील दहिवद येथे दोन जावांमध्ये लढत पाहायला मिळाली, एकूणच तालुक्यासह जिल्ह्यातील नागरिकांना या निकालाची उत्सुकता होती, आज निकाल लागल्यानंतर आशा रविंद्र पाटील या मोठ्या जाऊचा विजय झाला असून त्यांना एकूण 364 मत मिळाली आहेत, वृषाली पाटील यांचा पराभव झाला आहे तर त्यांना 267 इतकी मत पडली आहेत,

  • 18 Jan 2021 02:15 PM (IST)

    बुलडाणा ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : प्रजानगरमध्ये जनतेकडून कदम यांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा संधी

    बुलडाणा - सिंदखेड लपाली येथील कदम परिवाराने राखला गड, स्मार्ट ग्राम सिंदखेड लपाली अर्थात प्रजानगरमध्ये जनतेने कदम यांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा संधी, 9 पैकी 9 जागा त्यांच्या पॅनलला मिळाल्या, कोव्हिड काळात कदम परिवाराने केलेल्या चांगल्या कामाचे लोकांनी मते देऊन कौतुक केल्याचे या निकालातून सिद्ध होत आहे, 6 सीट यापूर्वीच अविरोध झालेल्या आहेत, तीन जागांसाठी निवडणूक झाली होती.

  • 18 Jan 2021 02:12 PM (IST)

    बीड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : मनसेने खाते उघडलं, जिल्ह्यात एका ग्रामपंचायतवर मनसेचे वर्चस्व

    बीड : बीड जिल्ह्यात मनसेने खातं उघडलं, जिल्ह्यात एका ग्रामपंचायतवर मनसेचे वर्चस्व, जिल्हाप्रमुख सुमंत धस यांच्या ताब्यातील नारेवाडीत मनसेचा झेंडा, 7 पैकी 5 जागांवर मनसेचे वर्चस्व

  • 18 Jan 2021 02:10 PM (IST)

    चंद्रपूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात असलेल्या तालुक्यात भाजपला चांगलं यश

    चंद्रपूर : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात असलेल्या सावली तालुक्यात भाजपला चांगलं यश, आतापर्यंत घोषित झालेल्या 21 पैकी 11 जागी भाजपचे तर 10 जागी काँग्रेस समर्थीत पॅनलचे वर्चस्व

  • 18 Jan 2021 02:09 PM (IST)

    पंढरपूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : आशिया खंडातील सर्वात मोठ्या अकलुज ग्रामपंचायतीवर भाजपचे विजयसिंह मोहिते पाटील गटाची सत्ता कायम

    पंढरपूर - आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या अकलुज ग्रामपंचायतीवर भाजपचे विजयसिंह मोहिते पाटील गटाची सत्ता कायम, 17 जागे पैकी एक जागा झाली होती बिनविरोध, 16 पैकी 13 जागावर विजयसिंह मोहिते पाटील गटाचा झेंडा, या निवडणुकीत जनसेवा संघटनेचे नेते धवलसिह मोहिते पाटील विरुध्द माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील अशी झाली होती लढत, 16 जागा पैकी 14 जागा विजयसिंह मोहिते गटाला तर 3 जागा धवलसिह मोहिते पाटील गटाला

  • 18 Jan 2021 02:07 PM (IST)

    वाशिम ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : राजुरा ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही पॅनलला प्रत्येकी 4 समसमान जागा

    वाशिम : मालेगाव तालुक्यातील राजुरा ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही पॅनलला प्रत्येकी 4 समसमान जागा, वार्ड तीनमधील एका जागेसाठी दोन्ही उमेदवारांना समान मते, ईश्र्वर चिठ्ठीने होणार निकाल

  • 18 Jan 2021 02:06 PM (IST)

    अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : राहुरी तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का, विखे गटाकडून पराभव

    राहुरी तालुक्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का, सात्रळ गावची सत्ता गमावली, विखे गटाने केला राष्ट्रवादीच्या गटाचा पराभव, सात्रळ गावची सत्ता भाजपाच्या विखे गटाकडे, राष्ट्रवादीच्या अरूण कडू यांच्या मंडळाचा पराभव, अरुण कडू हे विखे पाटलांचे ‌कट्टर विरोधक, तसेच रयतचे माजी उपाध्यक्ष, विखेंची घोडदौड सुरूच

  • 18 Jan 2021 02:04 PM (IST)

    बीड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : सर्वात महत्त्वाची पालवन ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात

    बीड : सर्वात महत्त्वाची पालवन ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात, आमदार संदीप क्षीरसागर आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्यात चुरस होती, पालवन ग्रामपंचायतमध्ये 7 पैकी 5 जागांवर भाजपचे वर्चस्व

  • 18 Jan 2021 02:02 PM (IST)

    हिंगोली ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : काँग्रेसच्या साई ग्रामविकास पॅनलची बाजी

    हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील आखाडा, बाळापुर ग्रामपंचायत काँग्रेसच्या ताब्यात, आखाडा बाळापूर ग्रामपंचायत निवडणूक निकालत काँग्रेसच्या साई ग्रामविकास पॅनलने बाजी मारली, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे यांच्या पॅनेलने 13 जागा मिळवत एक हाती सत्ता प्राप्त केली, तर शिवसेनेच्या पॅनेलला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागत आहे.

  • 18 Jan 2021 02:00 PM (IST)

    नंदुरबार ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : काकाविरोधात पुतण्या, काका अंकुश पाटील विजयी

    नंदुरबार : कढरें ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर, शिवसेना पुरस्कृत पॅनलला पाच जागा, तर भाजपला अवघ्या दोन जागा, कढरें ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये काका विरोधात पुतण्या, या रंगतदार लढाईत काका अंकुश पाटील विजयी, पुतण्या नागेश पाटील पराभूत

  • 18 Jan 2021 01:58 PM (IST)

    यवतमाळ ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : गहुली गावात भाजपचे आमदार निलय नाईक याचे वर्चस्व

    राज्याला 2 मुख्यमंत्री देणाऱ्या गहुली गावात भाजपचे आमदार निलय नाईक याचे वर्चस्व, याआधी 6 जागा झाल्या होत्या बिनविरोध, 1 जागी मतदान तिथेही निलंय नाईक समर्थक विजयी

  • 18 Jan 2021 01:55 PM (IST)

    हिंगोली ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : दत्ता माने यांच्या पॅनेलला केवळ दोन जागा

    हिंगोली-कळमनुरी कान्हेगावात माजी खासदार शिवाजी माने यांच्या पुतणे दत्ता माने यांच्या पॅनेलला केवळ दोन जागा, तर श्रीकांत वाघमारे यांच्या पॅनेलचा पाच जागांवर विजय, पंचवीस ते तीस वर्षांपासूनची सत्ता बदलली

  • 18 Jan 2021 01:53 PM (IST)

    नांदेड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : पळसपूर आणि हदगाव तालुक्यातील रुई गावात राष्ट्रवादीचा झेंडा

    नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर आणि हदगाव तालुक्यातील रुई गावात राष्ट्रवादीची सत्ता, दोन्ही गावातील नऊ पैकी नऊ जागी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी

  • 18 Jan 2021 01:50 PM (IST)

    भादली ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निकाल, तृतीयपंथी उमेदवार अंजली पाटीलवर गुलाल

    जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वार्ड क्र. चार मधून अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवार विजयी .

    ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली पाटील हिने उमेदवारी अर्ज दाखल करताना नावापुढे लिंगाचा उल्लेख इतर असा उल्लेख केल्याने तिला उमेदवारी नाकारण्यात आली होती.

    याबाबत अंजली पाटील हिने आपल्या उमेदवारीसाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली , न्यायालयाने अंजली पाटील यांच्या बाजूने निकाल देत हिच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिला होता.

  • 18 Jan 2021 01:49 PM (IST)

    चंद्रपूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : ग्रामविकास परिवर्तन आघाडीला 11 पैकी 5 जागा

    चंद्रपूर : पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचं मूळ गाव असलेल्या गोंडपिंपरी तालुक्यातील करंजी येथे काँग्रेस समर्थीत करंजी ग्रामविकास परिवर्तन आघाडीला 11 पैकी 5 जागा तर अपक्ष 6 जागी विजयी

  • 18 Jan 2021 01:47 PM (IST)

    इंदापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : निमगाव केतकी येथे 17 जागांपैकी 12 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी

    इंदापूर तालुक्यातील महत्त्वाचे ग्रामपंचायत असलेल्या निमगाव केतकी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे गटाचे वर्चस्व, 17 जागांपैकी 12 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना धक्का

  • 18 Jan 2021 01:45 PM (IST)

    भिवंडी ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : शिवसेना सर्वाधिक 20 जागांवर विजय

    भिवंडी ग्रामपंचायत निकाल -

    एकूण ग्रामपंचायत - 56

    बिनविरोध - 03

    शिवसेना - 20

    भाजपा - 14

    राष्ट्रवादी काँग्रेस - 03

    काँग्रेस - 01

    श्रमजिवी संघटना - 02

    ग्राम विकास समिती - 16

  • 18 Jan 2021 01:43 PM (IST)

    इंदापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : गलांडवाडी नंबर एक आणि नरुटवाडी ग्रुप ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व

    इंदापूर - गलांडवाडी नंबर एक आणि नरुटवाडी ग्रुप ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप गटाचे वर्चस्व, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे गटाच्या दारुन पराभव, भाजप ने तीन जागा अगोदर बिनविरोध केल्या होत्या

  • 18 Jan 2021 01:40 PM (IST)

    नांदेड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : महाविकास आघाडीने तामसा ग्रामपंचायत राखली, 17 पैकी 13 जागी महाविकास आघाडी

    नांदेड : महाविकास आघाडीने तामसा ग्रामपंचायत राखली, 17 पैकी 13 जागी महाविकास आघाडी तर चार जागेवर बंडखोर कदम समर्थक विजयी, काँग्रेसच्या आजी सह सेनेच्या माजी आमदाराने लावली होती मोठी ताकत, शिवसेना बंडखोर बाबूराव कदम यांनी दिली चांगली लढत.

  • 18 Jan 2021 01:33 PM (IST)

    अकोला ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : आ. अमोल मिटकरींच्या गावात ग्रामविकास पॅनलने उधळला गुलाल

    राष्ट्रवादीचेविधान परिषदेचे आमदार यांच्या अकोट तालुक्यातील कुटासा येथील ग्रामपंचायत निवडणूकीत ग्रामस्वराज्य पॅनलचे एकून सोळा उमेदवार आपले नशिब आजमावत होते. नुकत्याच हाती आलेल्या निकालानुसार आमदार मिटकरी यामच्या गावातील 13 पैकी 10 जागा मिटकरी समर्थकांनी राखल्या असल्याची माहिती समोर येत आहे.

  • 18 Jan 2021 01:27 PM (IST)

    अकलूज ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील पॅनलचे संग्रामसिंह मोहिते पाटील पराभूत

    अकलूज ग्रामपंचायतीत धक्कादायक निकाल

    माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील पॅनलचे संग्रामसिंह मोहिते पाटील पराभूत

    डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील पॅनलचे गिरीराज माने पाटील यांनी केला पराभव

    तर ज्योती कुंभार यांनी उमा शेटे यांना केले पराभूत

    अकलूज ग्रामपंचायतीतील पहिला बिनविरोध निकाल धवलसिंह यांच्या बाजूने गेल्या नंतर आता मतमोजणीत सुध्दा दोन उमेदवार विजयी होऊन आघाडी

    माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना धक्का

  • 18 Jan 2021 01:16 PM (IST)

    नांदेड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : नांदेडमध्ये शिवसेनेचा अशोक चव्हाणांना धक्का

    पालकमंत्री अशोक चव्हाण यांना जोरदार धक्का, भोकर मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बारड मध्ये सेनेची सत्ता, शिवसेनेचे 17 पैकी 16 सदस्य झाले विजयी

  • 18 Jan 2021 01:05 PM (IST)

    सातारा ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : पाटण तालुक्यात शंभूराजे देसाईंचा बोलबाला, 63 पैकी 42 जागांवर भगवा

    पाटण तालुक्यात ग्रामपंचायतीवर शिवसेना शंभूराज देसाई गटाचे वर्चस्व 63 पैकी 42 जागा शिवसेना शंभूराज देसाई गटाने मिळवल्या असून 18 जागेवर राष्ट्रवादी पक्षाला विजय मिळाला आहे.

  • 18 Jan 2021 01:00 PM (IST)

    नंदुरबार ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : 14 पैकी 9 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा

    नंदुरबार नवापूर तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल जाहीर, 14 पैकी 9 ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा, तर उर्वरित ठिकाणी स्थानिक आघाडी विजय, नवापूर तालुक्यात काँग्रेसचा दबदबा कायम, माजी मंत्री स्वरुपसिंग नाईक यांचे चिरंजीव आमदार शिरीष नाईक यांच्या निवडणूक रणनीतीला यश

  • 18 Jan 2021 12:58 PM (IST)

    सोलापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : सोलापूरमध्ये कोण हरलं, कोण जिंकलं?

    ग्रामपंचायत सोलापुर निकाल

    द.सोलापुर: मुस्ती- नागराज पाटील गटाला 14 जागा; मुस्तीत सत्तांतर

    बीबीदारफळ - ननवरे गट विजयीऔराद - संदीप टेळे पॅनल मधील सर्वच उमेदवार विजयी

    होटगी स्टेशन- सुभाष पाटोळे यांना तीन तर जगन्नाथ गायकवाड यांना पाच जागा

    कोर्सेगाव (द.सोलापुर)- राम आरवत पॅनलचे नऊ पैकी आठ उमेदवार विजयी

    अक्कलकोट तालुका- गळोरगी,कर्जाळ,लिंबीचिंचोळी,खैराट,भुरीकठे बोरोळ, पंचायतीत भाजपची सत्ता मात्र कारकल मध्ये महाविकास आघाडी विजय.

    द.सोलापुर: गुंजेगाव- शिवसेनेचे दिलीप माने गटाला आघाडी: हसापुरे गटाचा सर्व जागांवर पराभव

    बार्शी: मळेगाव,शिरपूर(ता. मोहोळ) पंचयतीवर आघाडीचा झेंडा.

    पंढरपुरातील 24 पैकी 17 ग्रामपंचायतीत आमदार प्रशांत परिचारक गटाचा विजय विजय

    जेऊर काशिलिंग- (अक्कलकोट.ता.) मधील सर्वच १६ जागेवर जिल्हा परिषद सभापती मलिकार्जुन पाटील यांचा पॅनल विजयी.

  • 18 Jan 2021 12:57 PM (IST)

    चाळीसगाव ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : राष्ट्रवादीच्या अभय सोनवणे यांच्या पॅनलला 10 जागा

    चाळीसगाव जिल्हाअध्यक्षांच्या गावात भाजपाचा धुव्वा, राष्ट्रवादीच्या अभय सोनवणे यांच्या पॅनलला 10 जागा, भाजपा जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे, पोपट भोळे यांच्या पॅनेलला चार जागा, संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या वाघळी गावात राष्ट्रवादीची सरशी,,

  • 18 Jan 2021 12:54 PM (IST)

    उस्मानाबाद ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : भाजप आ. सुजितसिंह ठाकूरांच्या गावात सत्तापालट, 9 पैकी 7 जागांवर महाविकास आघाडीचा बोलबाला

    भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या परंडा तालुक्यातील दत्तक लोणी गावात सत्तापालट

    9 पैकी 7 जागेवर महाविकास आघाडीचा विजय त्यात शिवसेनेच्या 5 तर राष्ट्रवादीच्या 2 जागा विजयी झाल्या तर 2 जागेवर भाजपचा विजय

  • 18 Jan 2021 12:54 PM (IST)

    पुणे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : निमगाव केतकी ग्रामपंचायतीत हर्षवर्धन पाटील यांना झटका

    पुणे - इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी ग्रामपंचायतीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना झटका, तर भिगवण मध्ये विद्यमान मंत्री दत्तात्रय भरणे यांना झटका

  • 18 Jan 2021 12:53 PM (IST)

    सोलापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : गुलाल उधळणाऱ्या, गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांचा चोप

    सोलापूर गुलाल उधळणाऱ्या तसेच गोंधळ करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी दिला चोप, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील मतमोजणी केंद्रावर, जिल्हाधिकारी यांचे आदेश डावलून गुलाल उधळणाऱ्या अति उत्साही करकर्त्यांना पोलिसांनी चोप दिला, वारंवार ध्वनिक्षेपकावरुन पोलिसांनी समक्ष सांगूनही केंद्राच्या आवारात गुलाल उधळणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चोप दिला

  • 18 Jan 2021 12:51 PM (IST)

    उस्मानाबाद ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : सेनेचे माजी आमदार तानाजी सावंत यांनी गड राखला, 7 पैकी 7 जागांवर सेनेचा भगवा

    परंडा तालुक्यातील मुगाव येथे शिवसेनेचे आमदार तथा माजी मंत्री तानाजीराव सावंत यांच्या गावात 7 पैकी 7 जागेवर शिवसेनेची सत्ता

    या गावात सेनेच्या 2 पॅनल मध्ये लढत होती त्यातील एक पॅनलचे 4 तर दुसऱ्या पॅनलचे 3 निवडून आले..

  • 18 Jan 2021 12:50 PM (IST)

    बारामती ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : सांगवी ग्रामपंचायतीत ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांना धक्का

    बारामती : सांगवी ग्रामपंचायतीत ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांना धक्का, 10 जागांवर राष्ट्रवादीच्या पॅनलचा विजय, तर चंद्रराव तावरे यांच्या गटाला केवळ 5 जागा,

  • 18 Jan 2021 12:48 PM (IST)

    नांदेड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : हदगाव तालुक्यातील डोरली गावावर 'महिलाराज', 9 पैकी 6 जागांवर महिलांचे पॅनल विजयी

    हदगाव तालुक्यातील डोरली गावावर 'महिलाराज', 9 पैकी 6 जागांवर महिलांचे पॅनल विजयी

  • 18 Jan 2021 12:47 PM (IST)

    महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झालाय, मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

    ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालातून पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झालाय, मंत्री आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

  • 18 Jan 2021 12:46 PM (IST)

    मोहोळ ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : तांबोळे गावचे राजकारण त्रिशंकू

    मोहोळ तालुक्यातील तांबोळे ग्रामपंचायतीचा असाही विचित्र निकाल, या ग्रामपंचायत निवडणुकीत तीन वेगवेगळे स्वतंत्र पॅनल उभे राहिले, विशेष धक्कादायक बाब म्हणजे तीन वेगवेगळ्या प्रभागात तीन वेगवेगळ्या पॅनलचे प्रत्येकी तीन उमेदवार निवडून आले आहेत, त्यामुळे गावचे राजकारण त्रिशंकू झाल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे

  • 18 Jan 2021 12:44 PM (IST)

    अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : राहाता तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींवर विखे गटाचा झेंडा

    विखे पाटलांनी आपला गड राखला ... मात्र लोणी खुर्द ग्रामपंचायत विरोधकांच्या ताब्यात... राहाता तालुक्यातील 25 पैकी 24 ग्रामपंचायतवर विखेंची सत्ता.... भाजपाच्या विखे पाटील गटाचा दणदणीत विजय... विखे पाटलांनी आपला गड राखला... फक्त एकाच ग्रामपंचायतवर विखे गटाचा पराभव... राहाता तालुक्यातील 24 ग्रामपंचायतवर विखे गटाचा झेंडा... राहाता तालुक्यातील मतमोजणी संपली...

  • 18 Jan 2021 12:39 PM (IST)

    नायगाव ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : भाजप आमदार राजेश पवार यांना त्यांच्याच गावात पराभवाचा धक्का

    नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेश पवार यांना त्यांच्याच गावात आपल्या गटाचा पराभव बघावा लागला आहे.

    ९ पैकी केवळ ३ जागा आ. राजेश पवार गटाला जिंकता आल्या तर शिवाजी पवार गटाने तब्बल ६ जागा जिंकत आ. राजेश पवार गटाचा दारुण पराभव केलाय...

  • 18 Jan 2021 12:37 PM (IST)

    जुन्नर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : ओतुर ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा

    जुन्नर तालुक्यातील 17 सदस्य असणारी आणि तालुक्याच्या राजकारणात प्रतिषठेची समजली जाणारी ओतुर ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा, शिवसेनेच्या ताब्यात असलेली ग्रामपंचायत राष्ट्रवादीने हिसकवली, राष्ट्रवादी 14 तर शिवसेना 3, अशा मोठ्या फरकाने विजय

  • 18 Jan 2021 12:36 PM (IST)

    सिंधुदुर्ग ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : "राणेंना धक्का देणारा अजून जन्मला नाही, जन्मणारही नाही"

    सिंधुदुर्ग : राणेंना धक्का देणारा अजूनपर्यंत जन्माला आलेला नाही आणि येणार पण नाही, 70 पैकी 55 ग्रामपंचायती आम्ही म्हणजेच भाजपने जिंकल्या,आमदार नितेश राणेंचा दावा.

  • 18 Jan 2021 12:35 PM (IST)

    जळगाव ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलला सात जागांवर विजय

    जळगाव जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या वडोदा ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल, बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात वर्चस्व सिद्ध करता आले नाही, वडोदा येथे प्रत्येकी भाजप महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलला सात जागांवर विजय

  • 18 Jan 2021 12:35 PM (IST)

    रायगड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : मंत्री आदिती तटकरेंच्या मतदारसंघातली सर्वात मोठी ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे

    मंत्री आदिती तटकरेंच्या मतदारसंघातली सर्वात मोठी ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे

  • 18 Jan 2021 12:30 PM (IST)

    बीड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व

    बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे वर्चस्व

    पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात शिवसेनाचा मोठा विजय

    जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचा दावा

    राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा दणदणीत विजय

    ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पिछाडीवर

  • 18 Jan 2021 12:29 PM (IST)

    औरंगाबाद ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : लासूर स्टेशन ग्रामपंचायतवर आमदार प्रशांत बंब यांचं पॅनल विजयी

    लासूर स्टेशन ग्रामपंचायतवर आमदार प्रशांत बंब यांचं पॅनल विजयी, सलग पाचव्यांदा प्रशांत बंब यांनी मिळवला विजय, 17 पैकी 16 सदस्य प्रशांत बंब गटाचे विजयी, सलग पाचव्यांदा प्रशांत बंब गटाने मिळवला विजय, गेल्या 20 वर्षणापासून लासुर ग्रामपंचायत प्रशांत बंब यांच्या ताब्यात

  • 18 Jan 2021 12:28 PM (IST)

    दक्षिण सोलापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : भाजप जिल्हापरिषद पक्षनेते आणाराव बाराचारे आणि शिरीष पाटील गट विजयी

    दक्षिण सोलापुरातील कुंभारी ग्रामपंचायतमध्ये भाजप जिल्हापरिषद पक्षनेते आणाराव बाराचारे आणि शिरीष पाटील गट विजयी, 17 पैकी 13 जागांवर भाजपचा विजय, तर पंचायत समितीचे माजी उपसभापती आप्पासाहेब बिराजदार यांना 4 जागा स्वतः अप्पासाहेब बिराजदार पराभूत

  • 18 Jan 2021 12:26 PM (IST)

    उस्मानाबाद ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : ओमराजे यांचे वर्चस्व मात्र महाविकास आघाडी असताना 3 जागा गमावल्या

    ओमराजे यांचे वर्चस्व मात्र महाविकास आघाडी असताना 3 जागा गमावल्या, भाजपने 3 जागा जिंकल्या, राणा पाटील गटाचा ग्रामपंचायतीमध्ये प्रवेश

    ओम राजे यांच्यासाठी चिंतेची बाब... गावातच तीव्र सत्ता संघर्ष

  • 18 Jan 2021 12:21 PM (IST)

    पुणे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : जुन्नरमध्ये सेना-राष्ट्रवादीला संमिश्र यश, भोरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी जोरा, तर शिरुरमध्ये माजी आमदार पाचर्णेंना अनेक ठिकाणी धक्के

    जुन्नर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची समजली जाणारी 17 सदस्य असणा-या आळेगाव ग्रामपंचायतवर शिवसेना आणी राष्ट्रवादी पक्षाला समिश्र यश....

    भोर 4 थ्या फेरी पर्यत कॉग्रेस , राष्ट्रीवादी कॉग्रेस पक्षाला यश मिळाल्याचे दिसून येत आहे शिवसेना पदाधिका-या स्वतःच्याच गावात अपयश आल्याचे दिसून येते.

    शिरूर तालुक्यातील उरळगांव, करंदी ग्रामपंचायत राष्ट्रवादी काँग्रेस च्या ताब्यात.... आमदार अशोक पवार यांच्या निकटवर्तींचा विजयी... भाजप चे माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या पॅनेल चा दारूण पराभव.

  • 18 Jan 2021 12:21 PM (IST)

    सातारा ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : पाटणमध्ये शंभूराज देसाई यांची बाजी तर राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाची पिछाडी

    पाटणमध्ये शंभूराज देसाई यांची बाजी तर राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाची पिछाडी, पाटण तालुक्यात 50 ग्रामपंचायती 29 शिवसेना देसाई, तर राष्ट्रवादी पाटणकर गटाकडे 18 ग्रामपंचायती आणि 3 ग्रामपंचायत समान निकाल

  • 18 Jan 2021 12:20 PM (IST)

    उस्मानाबाद ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : देव धानोरा येथे शिवसेनेचा मोठा विजय, 9 पैकी 9 जागांवर विजय

    शिवसेना आमदार कैलास पाटील यांचे मूळ गाव असलेल्या कळंब तालुक्यातील देव धानोरा येथे मोठा विजय, 9 पैकी 9 जागांवर शिवसेना विजयी, उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद - कळंब मतदार संघाचे आमदार पाटील, राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी लढत होती त्यात सेनेची बाजी सर्व जागा विजयी

  • 18 Jan 2021 12:17 PM (IST)

    अमरावती ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : अमरावतीत काँग्रेसच्या विरेंद्र जगताप, माजी जि.प.अध्यक्ष गोंडाने यांना धक्का

    अमरावती जिल्ह्यातील चांदूर तालुक्यातील काँग्रेसचे माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष नितिन गोंडाने यांना जबर धक्का,

    9 जागा मिळवत भाजपचा विजय, तर काँग्रेसला केवळ 2 जागा

  • 18 Jan 2021 12:15 PM (IST)

    गिरगांव ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : सतेज पाटील गट आणि ग्रामविकास आघाडीची सत्ता

    कोल्हापूर : गिरगांव ग्रामपंचायतीवर सतेज पाटील गट आणि ग्रामविकास आघाडीची सत्ता, सर्व 11 जागा जिंकल्या

  • 18 Jan 2021 12:15 PM (IST)

    अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : राळेगणसिद्धी ग्रामविकास पॅनलकडे 5 जागा

    अहमदनगर राळेगणसिद्धी ग्रामपंचायत निवडणूक, अण्णा हजारे यांच्या विचाराच्या राळेगणसिद्धी ग्रामविकास पॅनलकडे 5 जागा, एकूण जागा 9, 2 बिनविरोध, 5 राळेगणसिद्धी ग्रामविकास पॅनलला

    विजयी उमेदवार - 

    1) जयसिंग मापारी

    2) मंगल पठारे

    3) मंगल मापारी

    4) लाभेष औटी

    5) सुनीता गजरे

  • 18 Jan 2021 12:12 PM (IST)

    नंदुरबार ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : शिवसेनेची जोरदार मुसंडी, 22 पैकी 14 ग्रामपंचायती सेनेच्या ताब्यात

    नंदुरबार तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर, 23 पैकी 15 ग्रामपंचायती झाल्या होत्या बिनविरोध, नंदुरबार तालुक्यात शिवसेनेची जोरदार मुसंडी, नंदुरबार तालुक्यातील 22 पैकी 14 ग्रामपंचायती सेनेच्या ताब्यात, भाजपाला 6 ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात, दोन ग्रामपंचायती बिनविरोध करताना आडीच आडीच वर्ष सत्ता विभागणी, कोपरली आणि भालेर ग्रामपंचायतीत सेना नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मोठा झटका

  • 18 Jan 2021 12:09 PM (IST)

    पालघर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : पालघर जिल्ह्यातील 3 ग्रामपंचायती 3 पक्षाकडे

    पालघर जिल्ह्यातील 3 ग्रामपंचायत 3 पक्षाकडे

    01.वसई ताल्युक्यातील सत्पाला ग्राम पंचायतमध्ये मनसेची इन्ट्री

    मनसे, आदिवासी एकता परिषद आणि निर्भय च्या ग्राम समृद्धी पॅनल चे 11 पैकी 9 उमेदवार विजय तर बहुजन विकास आघाडी ला फक्त 2 जागा

    02. पाली ग्राम पंचायत मध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व

    7 पैकी 6 उमेदवार बविआ कडे तर 1 जागा शिवसेने कडे

    03.पालघर ताल्युक्यातील सांगावे ग्रामपंचायत वर शिवसेनेचे वर्चस्व

    शिवसेना प्रणीत ग्राम विकास पेनल विजयी, 7 पैकी 4 जागा ग्राम विकास पॅनल कडे तर 3 जागा स्थानिक युवा पॅनल कडे

  • 18 Jan 2021 12:07 PM (IST)

    पुणे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : सर्व 6 जागा जिंकत स्थानिक पॅनल विजयी

    खेड शिवापूर जवळील आर्वी ग्रामपंचायत निवडणुकीत सर्व 6 जागा जिंकत स्थानिक पॅनल विजयी

  • 18 Jan 2021 12:07 PM (IST)

    अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : कोपरगावात राष्ट्रवादीला धक्का, काकडी गावची सत्ता गमावली

    राष्ट्रवादीला कोपरगावात धक्का... काकडी गावची सत्ता गमावली... भाजपाच्या गटाने मिळवली सत्ता... राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आषुतोष काळे गटाचा पराभव... भाजपाच्या स्नेहलता कोल्हे यांच्या गटाचा विजय... 11 पैकी 8 जागेवर मिळवला विजय... गेल्या दहा वर्षापासून होती काळे गटाची सत्ता.... 29 पैकी 19 ग्रामपंचायतवर भाजपाची सरशी....

  • 18 Jan 2021 12:06 PM (IST)

    पुणे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : 11 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलचा विजय

    पुणे जिल्ह्यातील डोणजे ग्रामपंचायत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे, सर्व 11 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनेलचा विजय

  • 18 Jan 2021 12:05 PM (IST)

    पुणे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : भैरवनाथ पॅनेलचा सर्व 9 जागांवर विजय

    पुणे जिल्ह्यातील आंबी ग्रामपंचायत, भैरवनाथ पॅनेलचा सर्व 9 जागांवर विजय, हे पॅनेल सर्वपक्षीय होते

  • 18 Jan 2021 12:04 PM (IST)

    पुणे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : तरडे गावावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता

    तरडे गावावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता, नऊ पैकी सात जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत भैरवनाथ पॅनेलचा विजय

  • 18 Jan 2021 12:04 PM (IST)

    सिंधुदुर्ग ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : मालवणमध्ये शिवसेनेला धक्का, 6 पैकी 5 ग्रामपंचायती भाजपकडे

    मालवणमध्ये शिवसेनेसह आमदार वैभव नाईक यांना भाजपचा मोठा धक्का

    मालवणमधील 6 पैकी 5 ग्रामपंचायत वर भाजपचे वर्चस्व

    चिंदर , पेंडुर, गोळवन, कुंकवळे, मसदे ग्रामपंचायतवर भाजपची सत्ता तर आडवली ग्रामपंचायत वर सेनेचा झेंडा.....

    आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेनेलामोठा धक्का

  • 18 Jan 2021 12:01 PM (IST)

    जळगाव ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : कोथळी ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा, भाजपचे 6 उमेदवार विजयी

    कोथळी ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा, भाजपचे 6 उमेदवार विजयी विजयी उमेदवार उमेश राणे, अनुराधा योगेश चौधरी, नारायण चौधरी, मीराबाई शामराव पाटील, वंदना विजय चौधरी, राखी गणेश राणे विजयी उमेदवारांचा जल्लोष

  • 18 Jan 2021 12:00 PM (IST)

    पुणे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : श्रीरामनगर ग्रामपंचायतीमधे महाविकास आघाडी पॅनल विजयी

    पुणे जिल्ह्यातील श्रीरामनगर ग्रामपंचायतीमधे महाविकास आघाडी पॅनल विजयी, 9 उमेदवारांपैकी 7 बिनविरोध 2 लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी, श्रीरामनगरची ग्रामपंचायत महाविकास आघाडीच्या हाती

  • 18 Jan 2021 11:59 AM (IST)

    मुक्ताईनगर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : कोथळी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात, खासदार रक्षा खडसे यांचा दावा

    मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वात महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या कोथळी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आल्याचा भाजप खासदार रक्षा खडसे यांचा दावा, 11 जागांपैकी 2 जागा बिनविरोध, 9 पैकी 6 जागांवर भाजपचे पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजयी, मागील वेळी कोथळी ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचे सरपंच होते, मात्र आता भाजपचा सरपंच होणार, या निवडणुकीत राजकीय झालेल्या बदलामुळे मोठी जबाबदारी माझावर, पहिल्यांदा मी बारकाईने या निवडणुकीत लक्ष घातले असून त्यात मला यश मिळाले असल्याचे भाजपा खासदार रक्षा खडसे यांनी म्हटले

  • 18 Jan 2021 11:59 AM (IST)

    धुळे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : शिरपूरमध्ये 28 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा, भाजप आमदार अमरीश पटेल यांची जादू कायम

    शिरपूर तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर. विधानपरिषदेचे आमदार अमरीश पटेल यांचा सिलसिला कायम.... 28 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा.... महाविकास आघाडीला उत्तर महाराष्ट्रातून मोठा धक्का

  • 18 Jan 2021 11:56 AM (IST)

    जामनेर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : गिरीश महाजन सुस्साट, जामनेरच्या 90 टक्के ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

    गिरीश महाजन सुस्साट, जामनेर तालुक्यातील 90 टक्के ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा

  • 18 Jan 2021 11:54 AM (IST)

    रत्नागिरी ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : गोळप ग्रामपंचायतीत शिवसेना पुरस्कृत पॅनलची बाजी

    रत्नागिरी तालुक्यातील गोळप ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना पुरस्कृत पॅनलची बाजी, गोळप ग्रामपंचायत निवडणूक शिवसेनेने केली होती प्रतिष्ठेची, 15 पैकी 13 जागांवर शिवसेना पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजयी, या निवडणुकीसाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उतरावं लागलं होतं मैदानात

  • 18 Jan 2021 11:53 AM (IST)

    सांगली ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या सासरवाडीत राष्ट्रवादीला मोठा धक्का, 17 पैकी फक्त 2 जागा राष्ट्रवादीला

    जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सासरवाडीत राष्ट्रवादीला मोठा धक्का...

    जयंत पाटलांचे यांचे मेव्हणे मनोज शिंदे यांची लागली होती प्रतिष्ठा पणाला.

    म्हैसाळ ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर, भाजपची आली सत्ता...

    म्हैसाळ ग्रामपंचायतमध्ये भाजपा 15 तर राष्ट्रवादी फक्त 2 जागेवर विजयी.

    जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची सासरवाडी असलेल्या म्हैसाळ ग्रामपंचायत भाजपचा एकतर्फी विजय

    जयंत पाटील यांचा लहान मेव्हणा, मोठ्या मेव्हण्याची पत्नी आणि मेव्हण्याची मुलगी पराभूत

  • 18 Jan 2021 11:50 AM (IST)

    पुणे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : हिंजवडीत म्हातोबा परिवर्तन पॅनलचे 13 विजयी

    मुळशी तालुका हिंजवडी ग्रामपंचायत 17 पैकी 4 बिनविरोध 13 जागांसाठी मतमोजणी, म्हातोबा परिवर्तन पॅनल (राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना) - 13 विजयी,  3 बिनविरोध, म्हातोबा ग्रामविकास पॅनल (राष्ट्रवादी, शिवसेना ) - 4 विजयी, 1 बिनविरोध

  • 18 Jan 2021 11:46 AM (IST)

    बीड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : परळीत धनंजय मुंडेंचा दणदणीत विजय, 8 पैकी 6 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा वर्चस्व

    बीड : परळीत धनंजय मुंडेंचा दणदणीत विजय, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव, 8 पैकी 6 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा वर्चस्व

  • 18 Jan 2021 11:45 AM (IST)

    मोहोळ ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादीची बाजी, राष्ट्रवादीच्या राजन पाटलांचं वर्चस्व सिद्ध

    मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादीची बाजी, राष्ट्रवादीच्या राजन पाटलांचं वर्चस्व सिद्ध....

  • 18 Jan 2021 11:44 AM (IST)

    रत्नागिरी ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : 9 पैकी 9 जागांवरती शेखर निकम यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी

    रत्नागिरी-सावर्डे ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांचे निर्विवाद वर्चस्व, 9 पैकी 9 जागांवरती शेखर निकम यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी, 17 ग्रामपंचायत उमेदवारांपैकी 8 आज जागा झाले होते बिनविरोध, सावर्डे ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार शेखर निकम यांची प्रतिष्ठा पणाला

  • 18 Jan 2021 11:44 AM (IST)

    मनमाड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : चुलत भावाने चारली चुलत भावाला धूळ

    मनमाड :- न्यायडोंगरी ग्रामपालिकेच्या निवडणुकीत चुलत भावाने चारली चुलत भावाला धूळ

    काँग्रेसच्या माजी आमदार अनिल आहेर यांच्या परिवर्तन पॅनल ने 17 पैकी 12 जागांवर विजयी मिळवत चुलत भाऊ विलास आहेर यांच्या नम्रता पॅनलचा उधवला धुव्वा

  • 18 Jan 2021 11:42 AM (IST)

    पुणे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : जुन्नरमध्ये 2 ठिकाणी टाय, दोन्ही उमेदवारांना 175 मतं

    जुन्नर ग्रामपंचायत निवडणुकीत दोन ठिकाणी झाली टाय. बस्ती आणि हिवरे खुर्द येथे उमेदवारांमध्ये झाली टाय. हिवरे खुर्द येथे वायकर कमल विनायक आणि वायकर सोनल सिताराम या दोन उमेदवारांमध्ये झाली टाय. दोन्ही उमेदवारांना पडली १७५ मते.यामधे वायकर सोनल विजयी

  • 18 Jan 2021 11:42 AM (IST)

    कुडाळ ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : वैभव नाईक यांच्या मतदारसंघात भाजपची मुसंडी

    सिंधुदुर्ग:- कुडाळ मालवणमध्ये शिवसेनेला मोठा धक्का, एकूण 15 ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेकडे 06 ग्रामपंचायती, तर भाजपचा 09 ग्रामपंचायतीत मोठा विजय, शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघात भाजपची मुसंडी

  • 18 Jan 2021 11:41 AM (IST)

    परभणी ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : चुडावा ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात

    परभणी पूर्णा तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत चुडावा, चुडावा ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात, राष्ट्रवादीचे 9 उमेदवार आले निवडून, विरोधी पॅनेलला 2 दोन जागेवर मानावे लागणार समाधान

  • 18 Jan 2021 11:39 AM (IST)

    उस्मानाबाद ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : गोवर्धनवाडीत ओमराजेंची घोडदौड, शिवसेनेचा 9-6 ने विजय

    उस्मानाबाद तालुका गोवर्धनवाडी - शिवसेनेचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचे गाव आहे, एकूण जागा: ९ शिवसेना विरूध्द भाजपमध्ये सामना, 9 पैकी 6 जागांवर शिवसेना विजयी, 3 जागांवर भाजप विजयी , भाजप आमदार राणा पाटील यांचा पराभव

  • 18 Jan 2021 11:38 AM (IST)

    परळी ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : परळीत धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय

    परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय

    1 वंजारवाडी बिनविरोध ncp

    2 रेवली बिनविरोध ncp

    3 सरफराजपुर ncp निकाल

    4 मोहा ncp निकाल

  • 18 Jan 2021 11:36 AM (IST)

    मुक्ताईनगर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंनी भाजपला धूळ चारली

    मुक्ताईनगर तालुक्यात 47 ग्रामपंचायत निवडणुका पैकी 9 गावांवर महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलचाचा विजयी

    एकनाथ खडसे समर्थक व शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील समर्थकांकडून आमने-सामने जल्लोष

    तालुक्यात भाजपाचा धुरळा...

  • 18 Jan 2021 11:35 AM (IST)

    मुक्ताईनगर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : एकनाथ खडसेंचा धमाका, मुक्ताईनगरात भाजपचा धुव्वा

    मुक्ताईनगर तालुक्यात 47 ग्रामपंचायतींपैकी 9 गावांवर महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलचाचा विजयी, एकनाथ खडसे समर्थक आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील समर्थकांचा आमने-सामने जल्लोष, मुक्ताईनगरात भाजपाचा खुर्दा

  • 18 Jan 2021 11:33 AM (IST)

    नागपूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : काटोल-नरखेड तालुक्यात गृहमंत्री अनिल देशमुखांचे निर्विवाद वर्चस्व

    काटोल आणि नरखेड तालुक्यात गृहमंत्री अनिल देशमुखांचे निर्विवाद वर्चस्व

    - आतापर्यंत ०७ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

    - सलील अनिल देशमुख यांच्या योग्य नियोजनाचे यश

  • 18 Jan 2021 11:32 AM (IST)

    अमरावती ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोझरी गावात काँग्रेसची एकहाती सत्ता

    महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या मोझरी गावात काँग्रेसची एकहाती सत्ता....

    यशोमती ठाकूर यांचं आपल्या गावात अविरत वर्चस्व कायम...

    13 पैकी 8 जागा यशोमती ठाकूर यांच्या पॅनलच्या विजयी...

    विरोधी गटाचा मोझरीत धुव्वा....

    यशोमती ठाकूर यांच्या पॅनलचे विजयी उमेदवार...

  • 18 Jan 2021 11:30 AM (IST)

    नाशिक ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : खडक सुकेनात जल्लोष, राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्व जागांवर विजय

    दिंडोरी तालुक्यातील खडक सुकेना मध्य जल्लोष राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्व जागांवर विजय

    शिवसेना संपर्कप्रमुख पांडुरंग गनोरे यांचा दारुण पराभव

  • 18 Jan 2021 11:28 AM (IST)

    औरंगाबाद ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : पाचोड ग्रामपंचायीतवर शिवसेना नेते, मंत्री संदीपान भुमरे यांची सत्ता कायम

    पाचोड ग्रामपंचायतवर शिवसेना मंत्री संदीपान भुमरे यांची सत्ता कायम

    पाचोड ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेचे 17 सदस्य विजयी

    3 सदस्य बिनविरोध तर 14 सदस्य मोठ्या फरकाने झाले विजयी

    भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येऊन उभारले होते पॅनल

    तिन्ही पक्षांना चारी मुंड्या चित कर भुमरे यांचं पॅनल विजयी

  • 18 Jan 2021 11:27 AM (IST)

    अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : विखे पाटलांचा थोरातांना दे धक्का, कनोली ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर

    संगमनेर तालुक्यातील कनोली ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर... विखे पाटलांचा थोरातांना दे धक्का... थोरात गटाचा पराभव करत विखे गटाचा विजय... 11 सदस्य असलेल्या कनोली ग्रामपंचायतीत विखे गटाचे 6 तर थोरात गटाचे 5 उमेदवार विजयी.. 14 पैकी 1 ग्रामपंचायत थोरात तर 1 ग्रामपंचायत विखे गटाकडे अजून 12 ग्रामपंचायत निकालाकडे लक्ष....

  • 18 Jan 2021 11:26 AM (IST)

    सोलापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : अक्कलकोट तालुक्यातील बादोले आणि बबलाद ग्रामपंचायतीत कॉंग्रेसची सत्ता

    अक्कलकोट तालुक्यातील बादोले आणि बबलाद ग्रामपंचायतीत कॉंग्रेसची सत्ता, बबलाद ग्रामपंचायतीत राजकुमार लकबशेट्टी यांच्या पॅनलला 9 पैकी 6 जागा, बादोले ग्रामपंचायतीत कॉंग्रेसच्या माणिक धायगोडे यांची निर्विवाद सत्ता, बादोलेतील 11 च्या 11 जागांवर धायगोडे गटाचे उमेदवार विजयी, अक्कलकोटमध्ये भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मोठा धक्का, कॉंग्रेसचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांची आघाडी

  • 18 Jan 2021 11:25 AM (IST)

    पुणे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : इंदापुरात पोलीस अधिक्षकांचा आदेश झुगारुन गुलाल उधळत विजय साजरा

    इंदापुरात पोलीस अधिक्षकांचा आदेश झुगारुन गुलाल उधळत विजय साजरा, इंदापूर शहरातील बाबा चौकात धिंगाणा, 144 कलमचा फज्जा

  • 18 Jan 2021 11:23 AM (IST)

    नाशिक ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : दोनवाडी ग्रामपंचायतमध्ये 7 जागांपैकी 4 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या

    दोनवाडी ग्रामपंचायतमध्ये 7 जागांपैकी 4 जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीची सत्ता येण्याची शक्यता, इतर 3 जागांचा कल ही राष्ट्रवादीकडे

  • 18 Jan 2021 11:22 AM (IST)

    सोलापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : 11 पैकी 9 जागांवर नर्मदेश्वर विकास आघाडीचा विजय

    बार्शी तालुक्यातील मळेगावमध्ये 45 वर्षानंतर पहिल्यांदा निवडणूक, निवडणुकीत विद्यमान सरपंचाचे नर्मदेश्वर विकास आघाडीचा विजय, 11 पैकी 9 जागांवर नर्मदेश्वर विकास आघाडीचा विजय

  • 18 Jan 2021 11:19 AM (IST)

    अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : रोहित पवारांचा राम शिंदेंना धक्का

    रोहित पवारांचा राम शिंदेंना धक्का

    चौंडी ग्रामपंचायत 9 पैकी 7 जागा रोहित पवार तर 2 जागा राम शिंदे गटाला

  • 18 Jan 2021 11:18 AM (IST)

    कराड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : उंब्रज व पेरले ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

    कराड उत्तर मधील मोठी ग्रामपंचायत असणारी उंब्रज व पेरले ग्रामपंचायतीमध्ये सहकार मंत्री बाळासाहेब पाटील तथा राष्ट्रवादीचा झेंडा

  • 18 Jan 2021 11:18 AM (IST)

    पंढरपूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : 26 पैकी 22 ग्रामपंचायतींवर भाजपच्या मोहिते पाटील गटाची सत्ता कायम

    माळशिरस तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर, 26 पैकी 22 ग्रामपंचायतींवर भाजपच्या मोहिते पाटील गटाची सत्ता कायम, ग्रामीण भागात भाजपची घोडदौड कायम, अकलूज ग्रामपंचायतीचा विजयी गुलाला आमचाच, भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

  • 18 Jan 2021 11:17 AM (IST)

    धुळे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : निमडाळे ग्रामपंचायत 13 पैकी 8 जागावर परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी

    धुळे तालुक्यातील पहिल्या ग्रामपंचायतीचा निकाल हाती, निमडाळे ग्रामपंचायत 13 पैकी 8 जागावर परिवर्तन पॅनलचे 8 उमेदवार विजयी, भाजपा पुरस्कृत पॅनल, धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटलांच्या जवाहार गटाला धक्का

  • 18 Jan 2021 11:16 AM (IST)

    बीड ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : संदीप क्षीरसागर यांना काका जयदत्त क्षीरसागर यांचा धक्का

    बीड: राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांना धक्का, वासनवाडी ग्रामपंचायत काका आणि शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात, बीडच्या दोन ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा ताबा

  • 18 Jan 2021 11:15 AM (IST)

    पुणे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : आयटी नगरी हिंजवडीत राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का

    आयटी नगरी हिंजवडीत राष्ट्रवादी ला पराभवाचा धक्का राष्ट्रवादी च्या माजी सभापती कोमल सागर साखरे( बुचडे)यांचे पती सागर साखरे हे दोन वॉर्डात उभे होते. दोन्ही ठिकाणी त्यांचा दारुण पराभव

    सर्वपक्षीय म्हातोबा परिवर्तन पॅनल ची विजयाकडे वाटचाल

  • 18 Jan 2021 11:14 AM (IST)

    औरंगाबाद ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

  • 18 Jan 2021 11:12 AM (IST)

    पुणे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : मुळशी चाले गावातील उमेदवारांमध्ये टाय, चिट्ठी काढून विजयी उमेदवार ठरला

    मुळशी चाले गावातील प्रभाग 2 मधील दोन उमेदवारांमध्ये टाय, दोघींना 176 अशी समान मतं, चिट्ठी काढून विजयी उमेदवार ठरला, त्यानुसार लहान मुलींच्या हस्ते चिट्ठी उचलण्यात आली, यामध्ये दहिभाते सीमा श्रीरंग विजयी तर दहिभाते रंजना अशोक पराभूत

  • 18 Jan 2021 11:11 AM (IST)

    अमरावती ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : भाजप आमदार प्रताप अड्सड यांना धक्का, काँग्रेसच्या सातही उमेदवारांचा विजय

    भाजपा आमदार प्रताप अड्सड यांना धक्का,सावंगा विठोबा येथे काँग्रेसचे अमोल होले प्रणित पॅनल 7 पैकी 7 जागी विजयी

  • 18 Jan 2021 11:09 AM (IST)

    सोलापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयानंतर उमेदवारांचा जल्लोष, प्रशासनाच्या आदेशाला हरताळ

    सोलापूर प्रशासनाच्या आदेशाला नागरिकांचा हरताळ, ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयानंतर उमेदवारांचा जल्लोष, सोशल डिस्टन्सिंगचा सुद्धा उडाला फज्जा, कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर सुद्धा जल्लोष करण्याचे सत्र सुरुच

  • 18 Jan 2021 11:07 AM (IST)

    नागपूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : जलालखेडा ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

    नरखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जलालखेडा ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा.. दिपक चौधरी यांच्या गटाचा विजय...

    काटोल तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

    नरखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या थडीपवनी ग्रामपंचायत व राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा.

    गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कट्टर समर्थक बंडोपंत उमरकर यांच्या गटाच्या नवही उमेदवाराचा विजय.

  • 18 Jan 2021 11:06 AM (IST)

    कोरेगाव ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : वाठार (किरोली) ग्रामपंचायत दहा वर्षानंतर सत्तांतर

    कोरेगाव तालुका वाठार (किरोली) ग्रामपंचायत दहा वर्षानंतर सत्तांतर, भीमराव पाटील यांच्याकडे 10 जागा, संभाजीराव गायकवाड गटाला 3 जागा

  • 18 Jan 2021 11:05 AM (IST)

    लातूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : लातूरच्या धनेगावात काँग्रेसची हवा, 9 पैकी 9 जागा जिंकल्या

    लातूरच्या धनेगावात काँग्रेसची हवा, 9 पैकी 9 जागा जिंकल्या

  • 18 Jan 2021 11:05 AM (IST)

    नितेश राणेंच्या मतदारसंघात शिवसेनेचा दबदबा

    सिंधुदुर्ग- कणकवली तालुक्यातील एकूण तीन ग्रामपंचायतींपैकी दोन शिवसेनेकडे तर एक भाजप कडे, कणकवली हा नितेश राणेंचा मतदारसंघ. तालुक्यातील भिरवंडे आणि गांधीनगर ग्रामपंचायत शिवसेनेकडे, तर तोंडवली-बावशी ग्रामपंचायत भाजपकडे

  • 18 Jan 2021 11:03 AM (IST)

    नागपूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : चंद्रशेखर बावनकुळेंनी कोराडीचा गड राखला, 17 पैकी 12 सदस्य विजयी

    - कोराडीचा गड भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी राखला

    - कोराडी ग्रामपंचायतीत १७ पैकी १२ भाजप समर्थित आदर्श ग्राम विकास आघाडीकडे

    - तर महाविकास आघाडी समर्थित परिवर्तन पॅनलकडे ०५ जागा

  • 18 Jan 2021 11:01 AM (IST)

    जळगाव ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : एकनाथ खडसे यांच्या कोथळी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल

    महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या एकनाथ खडसे यांच्या कोथळी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल

    कोथळी पहिला फेरीला सुरुवात

    कोथडी ग्रामपंचायत मध्ये 11 पैकी शिवसेनेचे पुरस्कृत महाविकास आघाडीचे पाच उमेदवार कोथळी गावातून विजयी शिवसेनेने केला दावा

    पहिली फेरी होऊनही तहसीलदार यांच्याकडून अद्याप अधिकृत घोषणा नाही

    तहसीलदार संचेती यांच्या कडून अध्याप घोषणा नाही नाही

    मुक्ताईनगर येथे असुरक्षित मतमोजणी सुरू सोशल डिस्टंसिंग फज्जा

  • 18 Jan 2021 10:58 AM (IST)

    धुळे ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : परिवर्तन पॅनलचे 8 उमेदवार विजयी

    धुळे तालुक्यातील पहिल्या ग्रामपंचायतचा निकाल हाती, निमदाळे ग्रामपंचायत 13 पैकी 8 जागावर, परिवर्तन पॅनलचे 8 उमेदवार विजयी, भाजपा पुरस्कृत पॅनल

  • 18 Jan 2021 10:58 AM (IST)

    नागपूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : गृहमंत्र्यांचे कट्टर समर्थक बंडोपंत उमरकरांच्या गटाच्या नवही उमेदवाराचा विजय

    नरखेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या फळी पाहणी ग्रामपंचायत व राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा. गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कट्टर समर्थक बंडोपंत उमरकर यांच्या गटाच्या नवही उमेदवाराचा विजय.

  • 18 Jan 2021 10:57 AM (IST)

    अमरावती ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : भाजपाच्या पॅनलचे 9 उमेदवार विजयी

    अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यात सातेफळ ग्रामपंचायतमध्ये माजी आमदार वीरेंद्र जगताप यांना धक्का, या ठिकाणी भाजपाच्या पॅनलचे 9 उमेदवार विजयी

  • 18 Jan 2021 10:55 AM (IST)

    अमरावती ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस प्रदीप राऊत गटाचे वर्चस्व

    अमरावती ग्रामपंचायत निवडणूकीत धक्कादायक निकाल, राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस प्रदीप राऊत गटाचे वर्चस्व, काँग्रेसच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष छायाताई दंडाळे गटाचा दारुण पराभव, सुरवाडीत ग्रामविकास पॅनेलचा दणदणीत विजय

  • 18 Jan 2021 10:54 AM (IST)

    कोल्हापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटलांना धक्का, खानापूर ग्रामपंचायतीत पराभव

    कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटलांना धक्का, खानापूर ग्रामपंचायतीत पराभव, शिवसेनेच्या प्रकाश आबिटकर पॅनेलचा विजय

  • 18 Jan 2021 10:52 AM (IST)

    रत्नागिरी ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : पाली ग्रामपंचायतीत उदय सामंत यांची बाजी

    रत्नागिरी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राखली प्रतिष्ठा, पाली ग्रामपंचायतीत उदय सामंत यांची बाजी, 11 च्या 11 जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी, दहा जागांसाठी झाली बिनविरोध निवड, एका जागेवर सुद्धा सेनेच्या उमेदवाराची बाजी

  • 18 Jan 2021 10:52 AM (IST)

    जळगाव ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : जामनेर गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा विजय

    जामनेर गिरीश महाजन यांच्या बालेकिल्ल्यात भाजप चा विजय

    महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी होती सरळ लढत

    एकूण 59 जागा भाजपाचे 11 भाजपपुढे विकास आघाडी चा धुवा

  • 18 Jan 2021 10:51 AM (IST)

    पंढरपूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : 13 ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर

    पंढरपूर माढा तालुक्यातील 82 ग्रामपंचायतींची निवडणूक, यापैकी 8 बिनविरोध, 30 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर, 13 ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर तर उर्वरित 17 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व

  • 18 Jan 2021 10:50 AM (IST)

    सिंधुदुर्ग ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : शिवसेनेची घोडदौड सुरुच, नितेश राणेंना आणखी एक धक्का

    सिंधुदुर्ग : शिवसेनेची घोडदौड सुरुच, नितेश राणेंना आणखी एक धक्का, नितेश राणेंच्या मतदारसंघातील वैभववाडी तालुक्यातील सोनाळी ग्रामपंचायतीवर परिवर्तन, सात पैकी पाच सदस्य शिवसेनेचे

  • 18 Jan 2021 10:47 AM (IST)

    नागपूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : जलालखेडा ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

    नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जलालखेडा ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा, दीपक चौधरी यांच्या गटाचा विजय

  • 18 Jan 2021 10:47 AM (IST)

    नागपूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : जलालखेडा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

    नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या जलालखेडा ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा..

    दिपक चौधरी यांच्या गटाचा विजय...

  • 18 Jan 2021 10:46 AM (IST)

    पंढरपूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : सांगोल्यात शेकापला जोरदार धक्का, 50 वर्षांच्या सत्तेला सुरुंग

    पंढरपूर सांगोल्यात शेकापला जोरदार धक्का, 50 वर्षांच्या शेकापच्या सत्तेला सुरुंग, वासुद अकोला ग्रामपंचायतीत सत्तांतर भाजपने ग्रामपंचायतवर फडकवला झेंडा, 11 जागांपैकी 7 जागावर भाजपाचा झेंडा, भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार गटाचा विजय

  • 18 Jan 2021 10:43 AM (IST)

    ग्रामपंचायत निवडणूक निकाल - सकाळी 10.30 वाजेपर्यंतच चित्र

    ग्रामपंचायत निवडणूक निकाल - सकाळी 10.30 वाजेपर्यंतच चित्र

    काँग्रेस - १४७ राष्ट्रवादी - २२१ शिवसेना - ३३१ भाजप-२६६ मनसे-05 स्था आघाडी - ५२१

  • 18 Jan 2021 10:42 AM (IST)

    सातारा ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : माण तालुक्यात भाजप आमदार जयकुमार गोरेंची सरशी

    सातारा: माण तालुक्यात भाजपचे आ.जयकुमार गोरे यांची सरशी

    पिंगळी खु.:- आमदार गट-७, विरोधक-0

    हिंगणी:- आमदार गट-८, अपक्ष-3

    मोगराळे:- आमदार गट:-४, विरोधक-3

    हिंगणे:- आमदार गट-९, विरोधक-२

    शिरवली:- आमदार गट-२, विरोधक-५

    कारखेल:- आमदार गट-८, राष्ट्रवादी-१

    राणंद:- आमदार गट-११, विरोधक-0

  • 18 Jan 2021 10:41 AM (IST)

    नाशिक ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : पालखेड ग्रामपंचायतमध्ये भाजपाची आघाडी

    पालखेड ग्रामपंचायतमध्ये भाजपाची आघाडी, शिवसेनेची सत्ता असलेल्या पालखेडमध्ये भाजपाची मुसंडी, 15 वर्षांपासून पालखेड ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता

  • 18 Jan 2021 10:39 AM (IST)

    औरंगाबाद ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : ढाकेफळ गावात महिलांचा विक्रम, गावातील 9 पैकी 9 जागांवर महिला विजयी

    औरंगाबाद जिल्ह्यातील ढाकेफळ गावत महिलांनी केला विक्रम

    गावातील 9 पैकी 9 जागांवर फक्त महिलाच झाल्या विजयी

    औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात आहे ढाकेफळ ग्रामपंचायत

    गावकऱ्यांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात महिलांना दिली होती संधी

    गावातील सर्वच जागांवर महिलांनी मारली बाजी

  • 18 Jan 2021 10:38 AM (IST)

    वर्धा ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : आष्टी तालुक्यातील अंतोरा ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा

    वर्धा आष्टी तालुक्यातील अंतोरा येथील ग्रामपंचायतीत काँग्रेस समर्थीत पॅनलचा एकतर्फी विजय, भाजपा आमदार दादाराव केचे यांच्या गटातील पॅनलचा पराभव, सातही सदस्य काँग्रेसचे

  • 18 Jan 2021 10:37 AM (IST)

    सिद्धनेर्ली ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : भाजपची सत्ता गेली, राष्ट्रवादीचा विजय

    कोल्हापूर : कागलच्या सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा, भाजपची सत्ता उलटवून १५ पैकी ११ जागा जिंकल्या

  • 18 Jan 2021 10:35 AM (IST)

    अहमदनगर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : विखे पाटलांना धक्का, राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात सत्तांतर

    विखे पाटील यांना मोठा धक्का राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात सत्तांतर... भाजपाच्या राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का... लोणी खुर्द गावात 20 वर्षानंतर सत्तांतर... 17 पैकी 13 जागा जिंकत जनार्दन घोगरे यांच्या परिवर्तन पॅनलचा विजय... 20 वर्षानंतर सत्तांतर...

  • 18 Jan 2021 10:33 AM (IST)

    पंढरपूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : माळशिरससोबतच पंढरपूर-सांगोल्यात भाजपची घोडदौड कायम

    माळशिरस तालुक्यातील विझोरी ग्रामपंचायतीवर भाजपच्या मोहिते-पाटील गटाची सत्ता कायम, विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून 7 पैकी 7 जागांवर भाजपचा विजयसिंह मोहिते-पाटील गटाने आपला झेंडा फडकविला, यानंतर विजयी उमेदवारांनी रॅली काढण्यात आपला आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि भाजपचे कार्यकर्ते आता जल्लोष साजरा करु लागले, माळशिरससोबतच पंढरपूर-सांगोल्यात भाजपची घोडदौड कायम आहे

  • 18 Jan 2021 10:33 AM (IST)

    खानापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : चंद्रकांत पाटील यांच्या गावात शिवसेना आघाडीवर

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावात शिवसेना आघाडीवर, खानापुरात शिवसेनेला तीन जागा

  • 18 Jan 2021 10:33 AM (IST)

    औरंगाबाद ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : आदर्श सरपंच पेरे पाटील यांना धक्का, पाटोदा ग्रामपंचायतीत मुलीचा पराभव

    औरंगाबादचे आदर्श सरपंच पेरे पाटील यांना धक्का, पाटोदा ग्रामपंचायतीत पेरे पाटलांच्या मुलीचा पराभव, अनुराधा पेरे पाटील यांचा झाला पराभव, भास्कर पेरे पाटलांच्या पूर्ण पॅनलचा धुवा, आदर्श गावात आदर्श सारपंचाच झाला पराभव, मुलीसह तीन जागी पेरे पाटलांचे उमेदवार पराभूत, तर उर्वरित 8 जागा विरोधी पॅनलने आधीच मिळवल्या होत्या बिनविरोध, गावातील 11 जागांवर कपिंद्र पेरे पाटील यांनी मिळवला विजय, 30 वर्षानंतर भास्कर पेरे पाटील गावाच्या राजकारणातून झाले बाद

  • 18 Jan 2021 10:31 AM (IST)

    सातारा ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : पाटणमध्ये शंभूराजे देसाईंची हवा, 18 पैकी 13 ग्रामपंचायतीवर भगवा

    पाटण तालुक्यातील आतापर्यंत जाहीर झालेल्या 18 ग्रामपंचायतींपैकी 13 ग्रामपंचायती शिवसेनेकडे 8 ग्रामपंचायती राष्ट्रवादी

    पाटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे शंभूराजे देसाई यांची बाजी

  • 18 Jan 2021 10:28 AM (IST)

    उस्मानाबाद ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : तुळजापुरात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सरशी

    तुळजापूर तालुक्यात माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची सरशी

    किलज ग्राम 11 पैकी 11 काँग्रेस गंधोरा 9 पैकी 9 काँग्रेस वडगाव 9 पैकी 8 काँग्रेस 1 भाजप येवती 9 पैकी 7 कॉंग्रेस 2 भाजप दिंडेगाव 9 पैकी 6 काँग्रेस 3 भाजप दहिवडी 9 पैकी 7 काँग्रेस 3 भाजप

  • 18 Jan 2021 10:27 AM (IST)

    रत्नागिरी ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला

    रत्नागिरी 360 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणीला सुरुवात, थोड्याच वेळात येणार पहिला निकाल, शिवसेनेच्या बालेकिल्यात शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला, 2009 जागांचा निकाल लवकरच मिळणार, खेडमध्ये 62 तर चिपळूणमध्ये 61 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पाली ग्रामपंचायतीकडे लक्ष, एकाच प्रभागासाठी मतदान, 11 सदस्य असलेली पाली ग्रामपंचायत

  • 18 Jan 2021 10:25 AM (IST)

    सातारा ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर, मविआ 82 तर भाजपकडे 81 ग्रामपंचायतींची सत्ता

    सातारा: महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर.....

    आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये महाविकास आघाडीकडे 82 तर भाजपकडे 81 ग्रामपंचायतींची सत्ता

  • 18 Jan 2021 10:24 AM (IST)

    औरंगाबाद ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांना धक्का, स्वत:च्या गावात पराभव

    शिवसेना आमदार उदयसिंग राजपूत यांना धक्का

    उदय सिंग राजपूत यांच्या गावात शिवसेनेचा पराभव

    नागद ग्रामपंचायतमध्ये उदयसिंग राजपूत यांच्या पॅनलचा उडाला धुव्वा

    सर्वच्या सर्व जागेवर उमेदवार झाले पराभूत

    मात्र कन्नड तालुक्यात शिवसेनेला चांगली आघाडी

  • 18 Jan 2021 10:24 AM (IST)

    सातारा ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर

    साताऱ्यात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार टक्कर, आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये महाविकास आघाडीकडे 82 तर भाजपकडे 81 ग्रामपंचायतींची सत्ता

  • 18 Jan 2021 10:22 AM (IST)

    यवतमाळ ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : नाकापारडी गावात युवकाचा पॅनल विजयी

    यवतमाळ तालुक्यातील नाकापारडी गावात ग्राम विकास पॅनल विजयी, 21 वर्षीय शीतल गुप्ता, 20 वर्षीय प्रेम धुर्वे विजयी, विजयी नाकापारडी गावात युवकाचा पॅनल विजयी

  • 18 Jan 2021 10:21 AM (IST)

    नाशिक ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : जिल्ह्यातील पहिला निकाल जाहीर, रामदास बाळासाहेब उगले विजयी

    नाशिक जिल्ह्यातील पहिला निकाल जाहीर, मुंगसरा ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर, रामदास बाळासाहेब उगले विजयी

  • 18 Jan 2021 10:20 AM (IST)

    अक्कलकोट ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : गोगाव, गळोरगी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा

    अक्कलकोटमध्ये पहिल्या फेरीतील 15 ग्रामपंचायत निवडणूक निकाल हाती, दुसऱ्या फेरीला सुरूवात, अक्कलकोट तालुक्यातील गोगाव, गळोरगी ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा, अक्कलकोट साफळा ग्रामपंचायत कांग्रेसचा झेंडा

  • 18 Jan 2021 10:19 AM (IST)

    उस्मानाबाद ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : पळसप येथे महाविकास आघाडी विजयी

    उस्मानाबाद तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या मूळ गावी पळसप येथे महाविकास आघाडीविरूध्द भाजपात थेट लढत, एकूण जागा 13, 8 जागा बिनविरोध होत्या 5 जागांसाठी मतदान, महाविकास आघाडी विजयी

    राष्ट्रवादी 7

    शिवसेना 5

    अपक्ष 1  बंडखोर शिवसेना

  • 18 Jan 2021 10:19 AM (IST)

    सोलापूर ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates : होटगीत भाजपची सत्ता, 15 पैकी 10 जागांवर विजयी

    दक्षिण सोलापुरातील महत्वाची ग्रामपंचायत असलेल्या होटगीत भाजपची सत्ता

    15 पैकी 10 जागांवर भाजप विजयी, तर विरोधी काँग्रेसला 5 जागांवर मानावं लागलं समाधान

    भाजप तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी आणि काँग्रेस तालुकाध्यक्ष हरीश पाटील यांच्यात होती चुरश

Published On - Jan 18,2021 10:51 PM

Follow us
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.