AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Actress Life : ‘ती मला मिळूच शकत नाही म्हणून..’ 1500 रुपयांत चाहत्याने खरेदी केलेली प्रसिद्ध अभिनेत्रीची बिकिनी, त्यानंतर घरात घुसला अन्…

Actress Life : 'ती मला मिळूच शकत नाही म्हणून..', बॉलिवूडचे अनेक असे किस्से आहेत, जे समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसतो. एका चाहत्याने लिलावामध्ये एका अभिनेत्रीची बिकिनी 1500 रुपयांत विकत घेतली होती. एवढंच नाही तर, तो पुरुष अभिनेत्रीच्या घरात देखील घुसला. जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं.

Actress Life : 'ती मला मिळूच शकत नाही म्हणून..' 1500 रुपयांत चाहत्याने खरेदी केलेली प्रसिद्ध अभिनेत्रीची बिकिनी, त्यानंतर घरात घुसला अन्...
Pooja Bedi
| Updated on: Nov 14, 2026 | 1:16 PM
Share

Actress Life : सेलिब्रिटी फक्त त्यांच्या सिनेमांमुळे आणि अभिनयामुळेच नाही तर, खासगी आयुष्यात होणाऱ्या अनेक प्रसंगांमुळे देखील चर्चेत असतात. आता सोशल मीडिया असल्यामुळे चाहत्यांना आपल्या आवडत्या सेलिब्रिटींना पाहण्यासाठी फार प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण एक काळ असा होता जेव्हा सेलिब्रिटी चाहत्यांना भेटण्यासाठी सर्व मर्यादा पार करायचे. असंच काही अभिनेत्री पूजा बेदी हिच्यासोबत देखील झालं आहे. पूजाच्या एका चाहत्याने तर लिलावामध्ये 1500 रुपयांमध्ये अभिनेत्रीची बिकिनी खरेदी केलेली. एवढंच नाही तर, तो पूजाच्या घरात देखील घुसलेला.

सांगायचं झालं तर, ‘लुटेरे’ सिनेमात पूजा बेदी हिने एक बिकीनी घातली होती. तिच बिकीनी एका व्यक्तीने 1500 रुपयांत खरेदी केली. त्यावेळी 1500 रुपये म्हणजे देखील फार मोठी रक्कम होती. रिपोर्टनुसार, 1993 मध्ये सेलिब्रिटीच्या वस्तूंच्या लिलावासाठी एका कर्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सामाजिक कार्यासाठी पैसे जमवण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

कार्यक्रमाच्या होस्टची जबाबदारी अभिनेत्री अर्चना पुरन सिंग यांच्यावर होती. तर पूजा बेदी हिची बिकिनी खरेदी केल्यानंतर त्या पुरुषाने मोठं वक्तव्य केलं होतं. तो म्हणालेला, ‘मी तिला तर मिळवू शकत नाही. अशात तिची बिकिनी मिळाली तरी खूप आहे…’ ती व्यक्ती एवढ्यावरच थांबली नाही तर, ती पूजाच्या घरी देखील पोहोचली.

यावर पूजा म्हणालेली, तो मला दिवसाला 10 हजार फोन करायची. रक्तने पत्र लिहिलायचा. मी त्या व्यक्तीबद्दल माहिती मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण त्याच्याबद्दल मला काही कळलंच नाही. मी त्याला विचारलं देखील की, तू बिकिनी का विकत घेतली. यावर तो म्हणालेला, ‘मी त्याच्यासोबत शांततेत बसले आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्याने मला खूप त्रास दिला. हे सर्वकाही माझं लग्न होईपर्यंत सुरु होतं.’

पूजा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘जो जीता वही सिकंदर’ सिनेमामुळे प्रसिद्धी झोतात आलेली पूजा अनेक कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली. पूजा हिने 1991 पासून 1995 पर्यंत बॉलिवूडमध्ये काम केलं. पण अभिनेत्री तिच्या वादग्रस्त प्रकरणं आणि अफेअर्समुळे चर्चेत राहिली.

Follow Us
विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; नेमकं काय..
Sanjay Raut On NCP Merger : विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; असं काय म्हणाले?
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट,
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट, अजित गव्हाणेंचा गंभीर आरोप!
मालाडमध्ये छठपूजेचा उत्साह! मनसे नेत्यांकडून जय्यत तयारी...
मालाडमध्ये छठपूजेचा उत्साह! मनसेच्या सुरेखा परब यांच्याकडून जय्यत तयारी, जोरदार बॅनरबाजी
मुंबईनंतर पुण्यातही मफलरवाला पोस्टर; अजितदादांचा अपघात की घातपात?
Ajit Pawar Poster Controversy : मुंबईनंतर पुण्यातही मफलरवाला पोस्टर; अजितदादांचा अपघात की घातपात? राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादांचा अपघात की घातपात? मुंबईत मफलर असलेलं पोस्टर झळकलं....
Ajit Pawar : अजितदादांचा अपघात की घातपात? मुंबईत मफलर असलेलं पोस्टर झळकलं; 16 नोव्हेंबरला रोहित पवार मोठा खुलासा करणार?
भावासोबत पुढे जायचं होतं पण...; आता काय चर्चा करायची? चर्चांना....
Supriya Sule On NCP Merger : भावासोबत पुढे जायचं होतं पण...; आता काय चर्चा करायची? चर्चांना पूर्णविराम!
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव नाही; पटेल भेटीवर...
Supriya Sule On Praful Patel Meeting : अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून कोणताही प्रस्ताव नाही; प्रफुल्ल पटेल भेटीवर सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण
विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी...; सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण
Supriya Sule On NCP Merger : विलीनीकरणाचा विषय आमच्यासाठी...; सुप्रिया सुळेंचं मोठं स्पष्टीकरण, राष्ट्रवादीच्या चर्चांना पूर्णविराम?
ओम राजेंच्या प्रश्नावर एका वाक्यात दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर; म्हणाले
Aaditya Thackeray : ओम राजेंच्या प्रश्नावर एका वाक्यात दिलं आदित्य ठाकरेंनी उत्तर; म्हणाले...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा म्हणजे....; राऊत नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा म्हणजे....; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?