NCP विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान सुनेत्रा पवार अन् CM फडणवीसांची 2 तास बैठक, काय चर्चा झाली?
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेमुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय. या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्वाची बैठक झाली.

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून सुनील तटकरे यांच्यासहित इतर नेत्यांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. अजितदादांसोबतच्या बैठकीत विलीनीकरणाचं तारीख ठरल्याचं सांगण्यात आलं आहे. या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्या.दोन्ही नेत्यांमध्ये जळपास दोन तास चर्चा झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
