माटुंगा-मुलुंड, पनवेल-वाशी मार्गावर मेगाब्लॉक घोषित, पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉग नाही, वाचा सविस्तर…

| Updated on: Aug 07, 2022 | 8:46 AM

आज मेगाब्लॉक, कुठे? वाचा...

माटुंगा-मुलुंड, पनवेल-वाशी मार्गावर मेगाब्लॉक घोषित, पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉग नाही, वाचा सविस्तर...
मुंबई लोकल
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आज रविवार आहे. त्यामुळे मुंबई लोकलचा (Mumbai Local) मेगाब्लॉक आहे. काही मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आलाय. तर काही मार्गांवर वाहतूक सुरळीतपणे सुरु असणार आहे. मध्य रेल्वेवर आज मेगाब्लॉक (Megablock) असणार आहे. तशी घोषणा रेल्वेकडून करण्यात आली आहे. माटुंगा ते मुलुंड आणि पनवेल-वाशी या मार्गांवर मेगाब्लॉक असेल. मध्य रेल्वेने तश्या सूचना जारी केल्या आहेत. तर ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी, ठाणे-वाशी/नेरुळ, बेलापूर/नेरुळ-खारकोपर दरम्यान लोकल फेऱ्या उपलब्ध राहणार आहेत. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावरून चालवण्यात येतील. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या सुमारे15 मिनिटे विलंबाने धावणार आहेत. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीतपणए चालणार आहे. वसई रोड यार्डासाठी दिवा मार्गावर शनिवारी मध्यरात्री ब्लॉक असल्याने रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही.

आज मेगाब्लॉग

आज रविवार आहे. त्यामुळे मुंबई लोकलचा मेगाब्लॉक आहे. काही मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आलाय. तर काही मार्गांवर वाहतूक सुरळीतपणे सुरु असणार आहे. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक असणार आहे. तशी घोषणा रेल्वेकडून करण्यात आली आहे.

माटुंगा ते मुलुंड आणि पनवेल-वाशी या मार्गांवर मेगाब्लॉक असेल. मध्य रेल्वेने तश्या सूचना जारी केल्या आहेत. तर ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी, ठाणे-वाशी/नेरुळ, बेलापूर/नेरुळ-खारकोपर दरम्यान लोकल फेऱ्या उपलब्ध राहणार आहेत. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावरून चालवण्यात येतील. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या सुमारे 15 मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

हे सुद्धा वाचा

प. रेल्वेवर ब्लॉक नाही!

पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीतपणए चालणार आहे. वसई रोड यार्डासाठी दिवा मार्गावर शनिवारी मध्यरात्री ब्लॉक असल्याने रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही.