AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी!, शहराला पाणीपुरवठा करणारी धरणं फुल्ल…

शहराला पाणीपुरवठा करणारी धरणांमध्ये 90 टक्के जलसाठा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी!, शहराला पाणीपुरवठा करणारी धरणं फुल्ल...
Image Credit source: dnaindia.com
| Edited By: | Updated on: Aug 07, 2022 | 7:50 AM
Share

मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai City) आनंदाची बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी धरणं फुल्ल झालीत. त्यामुळ येत्या काळातील पाणीप्रश्न मिटला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत (Mumbai Dam) पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे सर्वच तलाव तुडुंब भरले असून वर्षभर आवश्यक असणाऱ्या पाण्यापैकी 90 टक्के कोटा फुल झाला आहे. तलावांत सध्या 1302775 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झालाय. हे पाणी 338 दिवस म्हणजेच जुलै महिन्यापर्यंत पुरणारं आहे. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणातून मुंबईला दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. या वर्षी संपूर्ण जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने एकूण जलसाठा 11 टक्क्यांपर्यंत खाली गेल्याने 28 जूनपासून दहा टक्के पाणीकपात करण्यात आली होती. मात्र जुलैच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस होत असल्याने तलावांत 25 टक्के पाणी जमा झाल्यानंतर 12दिवसांतच पाणीकपात मागे घेण्यात आली. दरम्यान, जुलैअखेर पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याने पाणीसाठा वाढत नव्हता. मात्र आता तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत असल्याने मुंबईकरांसाठी वर्षभरासाठीचे पाणी जमा होत आहे.

या सगळ्या धरणांंध्ये एकूण 1302775 दशलक्ष लिटर पाणी  आहे. हा जलसाठा मुंबईकरांना जुलै महिन्यापर्यंत पाणीपुरवठा करू शकतो. मागच्या तीन वर्षांतील हा सर्वाधिक जलसाठा आहे. तलावांमध्ये 6 ऑगस्ट रोजी 1302775 दशलक्ष लिटर म्हणजेच 90.01 टक्के पाणी जमा आहे. 2021 मध्ये याच दिवशी सातही तलावांत 1157161 दशलक्ष लिटर म्हणजेच 79.95 टक्के पाणीसाठा जमा होता. 2020 मध्ये तर याच दिवशी केवळ 600156 दशलक्ष लिटर म्हणजेच केवळ 41.47 टक्के पाणी जमा झाले होते.

कुठल्या धरणात किती पाणी?

अप्पर वैतरणा 189890 दशलक्ष लिटर

मोडक सागर 125761 दशलक्ष लिटर

तानसा 144063 दशलक्ष लिटर

मध्य वैतरणा 144899 दशलक्ष लिटर

भातसा 628431 दशलक्ष लिटर

विहार 216884 दशलक्ष

लिटर तुळशी 8046 दशलक्ष लिटर

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणातून मुंबईला दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. या वर्षी संपूर्ण जूनमध्ये पावसाने ओढ दिल्याने एकूण जलसाठा 11 टक्क्यांपर्यंत खाली गेल्याने 28 जूनपासून दहा टक्के पाणीकपात करण्यात आली होती. मात्र जुलैच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस होत असल्याने तलावांत 25 टक्के पाणी जमा झाल्यानंतर 12दिवसांतच पाणीकपात मागे घेण्यात आली. दरम्यान, जुलैअखेर पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याने पाणीसाठा वाढत नव्हता. मात्र आता तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस होत असल्याने मुंबईकरांसाठी वर्षभरासाठीचे पाणी जमा होत आहे.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.